पंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY)
पंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY: Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana) भारत सरकारच्या वतीने १ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये बँकेमध्येच भेटवस्तू खरेदी करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे. या भेटवस्तू कोणत्या? त्यांची किंमत काय? त्याचा फायदा काय? यासंदर्भात सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
हे नक्की वाचा: काय आहे आरोग्य संजीवनी योजना?
पंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY)– बँकेत विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या तीन भेटवस्तू कोणत्या?
- आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देणं हे सर्वात कठीण काम असत. पण पंतप्रधान स्नेह बंधन योजना बँकेमध्येच भेटवस्तू खरेदी करण्याची सुविधा देते.
- या तीन भेटवस्तू म्हणजे रु. २०१, रु. ३५१ व रु. ५००१ अशी तीन प्रकारची बँक इन्स्ट्रुमेंट विशेष म्हणजे या तिन्ही इन्स्ट्रुमेंट सोबत जीवन विमा तसेच मुदत ठेव योजनेची सुविधा अंतर्भूत केलेली असेल.
- या भेटवस्तू केवळ रक्षाबंधनाच्या निमित्तानेच नव्हे तर इतर सण, सामाजिक उत्सव आणि विवाह उत्सव अशा कोणत्याही विशेष प्रसंगासाठी खरेदी करता येतील.
- या भेटवस्तू गिफ्ट कार्ड किंवा बँकर्स चेक स्वरूपात असतील व या जेव्हा बँकेत जमा होतील तेव्हा संबंधित बँकेमध्ये एक नवीन खाते उघडले जाईल.
पंतप्रधान स्नेह बंधन योजना भेटवस्तू रु २०१ –
- ही भेटवस्तू आयुर्विमा आणि निश्चित ठेवीमध्ये विभागली जाईल.
- यामध्ये रू.१२ पहिल्या वर्षाच्या आयुर्विम्याच्या प्रीमियमसाठी त्वरित भरले जातील आणि दुसर्या वर्षाचा प्रीमियम बचत खात्यात ठेवण्यात येतील
- उर्वरित रक्कम रु. १७७ ही मुदत ठेवीमध्ये १० वर्षांच्या मुदतीसाठी ठेवण्यात येईल. त्यावर ८% व्याजदराने व्याज मिळेल.
- मुदत ठेवींमध्ये मिळणारे व्याज आयुर्विम्याच्या उर्वरित प्रीमियमसाठी वापरण्यात येईल.
पंतप्रधान स्नेह बंधन योजना भेटवस्तू रु ३५१-
- यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु. १२ तर, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ३३० रुपये जमा करण्यात येतील
- उर्वरित रक्कम रु. ९ बचत खात्यामध्ये जमा करण्यात येईल व त्यावर दरवर्षी ८% दराने व्याज मिळणार आहे.
- ही रक्कम मुदत ठेवीमध्ये जमा केली जाणार नाही. तसेच, भविष्यातील वरील दोन्ही विमा योजनांच्या प्रीमियमची रक्कम लाभार्थ्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागेल.
पंतप्रधान स्नेह बंधन योजना भेटवस्तू रु ५००१-
- यामध्ये रु. ३४२ पहिल्या ५ वर्षांसाठीच विमा प्रीमियमसाठी रु. ३४२ पुढील वर्षाच्या प्रीमियमसाठी बचत खात्यामध्ये ठेवण्यात येईल.
- उर्वरित रक्कम ४३१७ रुपये ८% व्याजदराने ५ किंवा १० वर्षांच्या मुदत ठेव योजनेमध्ये ठेवण्यात येईल व त्यावरील व्याज आयुर्विम्याच्या उर्वरित प्रीमियमसाठी वापरण्यात येईल.
विशेष लेख: तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?
पंतप्रधान स्नेह बंधन योजना (PMSBY)– वैशिष्ट्ये
- स्नेहा बंधन योजना ही भेटवस्तू कार्ड किंवा बँकेच्या धनादेशाच्या धर्तीवर आहे.
- या भेटवस्तूच्या प्राप्तकर्त्याला संबंधित रक्कम त्याच्या वैयक्तिक बँक खात्यामध्येही जमा करता येते. तसेच कोणत्याही बँकेत जन धन योजनेअंतर्गत “झिरो बॅलन्स अकाउंट” उघडून तिथेही जमा करता येते.
- ही भेटकार्ड प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या सरकारी योजनांशी जोडले जातील व उर्वरित शिल्लक रक्कम मुदत ठेव म्हणून जमा केली जाईल.
- या योजनेच्या लाभार्थीला विमा योजनांचे प्रीमियम भरणे आवश्यक आहे. तसेच, मुदतीच्या ठेवीवर प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार व्याजदर व टीडीएस ची वजावट लागू होईल.
- १८ ते ५० वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. प्राप्तकर्त्याचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त किंवा १८ वर्षापेक्षा कमी असेल तर तो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री स्वास्थ विमा योजनेची पात्रता १८ ते ७० वर्षां दरम्यान आहे.
नागरिकांना भेटवस्तूद्वारे आर्थिक नियोजनास काही अंशी प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान स्नेह बंधन योजना ही महत्वपूर्ण पायरी आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि जन- धन योजनेचे फायदे अगदी चांगल्या प्रकारे समाविष्ट केले आहेत.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: PMSBY Marathi Mahiti, PMSBY in Marathi, PMSBY Marathi, Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana Marathi Mahiti, Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana Marathi, Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana in Marathi