कालच्या भागात आपण प्रधानमंत्री जन-धन योजनेची पार्शवभूमी, स्वरूप व लाभांसंबंधी माहिती घेतली. आजच्या भागात आपण या योजनेसाठीची पात्रता निकष, खाते उघडण्याची प्रक्रिया व बँकांच्या नियमांची माहिती घेऊ.
पंतप्रधान जन-धन योजनेसाठी पात्रता निकष-
जन-धन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी आवश्यकता आहेत त्यांना त्याचे फायदे मिळतील याची खात्री होते. प्रधानमंत्री जन धन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी पुढील पात्रता निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- भारतीय नागरिकत्व
- आपण राज्य किंवा केंद्र सरकारकडे नोकरी करत असाल तर आपण आणि आपले कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास समर्थ नाहीत.
- आयकर भरणारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब पीएम जन-धन योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- आम आदमी बीमा योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेतून तुम्हाला फायदा होऊ शकत नाही. जर आपल्याला जन धन खाते लाभ मिळावायचे असतील तर आम आदमी बीमा योजनेच त्याग करून मिळवू शकता.
जन-धन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-
- रहिवासी पुरावा-
- पासपोर्ट किंवा आधार कार्ड:- (आधार कार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज करू करावा लागेल व त्यानंतरच आपण या योजनेसाठी पात्र असाल. आपल्याकडे रहिवाशी पुरावा नसल्यास, ज्या बँकेशी तुम्ही संपर्क साधला आहे ती बँक १२ महिन्यांसाठी कमी जोखीम (लो रीस्क) उमेदवार घोषित आपल्याला अर्ज करण्यास पत्र ठरवते. दरम्यान आपण आधार पुरावा म्हणून अर्ज करू शकता आणि सबमिट करू शकता.)
- ओळख पुरावा:-
- दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आपल्याकडे वरील कागदपत्रे नसल्यास, कोणत्याही राजपत्रित अधिकार्याद्वारे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा देणारे अधिकृत पत्र सादर करू शकता.
प्रधान मंत्री जन-धन योजना फॉर्म-
जन-धन योजना फॉर्मला ‘वित्तीय समावेशन खाते’ उघडण्याचा फॉर्म असे म्हणतात. योजनेसाठी अर्ज करताना हा फॉर्म भरणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे.
प्रत्येक विभाग योग्य माहितीसह भरणे आवश्यक आहे. तथापि, हा फॉर्म भरणे अतिशय सोपे आहे व सर्वसामान्यांना भरायला जमेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. प्रत्येक विभागाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. या विभागांची माहिती पुढीलप्रमाणे-
१. बँक तपशीलः- ज्या बँकेत तुम्हाला जन-धन बँक खाते सुरू करायचे आहे त्या बँकेच्या संबंधित सर्व माहिती पुरवणे गरजेचे आहे. आपल्या बँकेच्या शाखेचे नाव, आपल्या शहराचे नाव, आपले उपजिल्हा आणि विभागाचे नाव, आपला जिल्हा, आपला राज्य, एसएसए कोड, गाव कोड आणि टाउन कोड विषयी माहिती भरा.
२. अर्जदाराचे तपशीलः- या विभागात आपल्याला स्वतःविषयी सर्व वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे. यात आपले पूर्ण नाव, वैवाहिक स्थिती, वडिलांचे नाव/पती/पत्नी, पत्ता, पिन कोड, दूरध्वनी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मनरेगा जॉब कार्ड नंबर, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, आश्रित व्यक्तींची संख्या, मालमत्ता तपशील, वैयक्तिक माहिती समाविष्ट करणे समाविष्ट आहे. बँक खाते क्रमांक आणि किसान क्रेडिट कार्ड तपशीलही द्यावा लागतो.
३. नॉमिनीची तपशील:- आपण निवडण्यासाठी इच्छुक असलेल्या नॉमिनीबद्दल तपशील प्रदान करण्यासाठी या विभागात माहिती भरणं आपल्याला आहे. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, नातेसंबंध, वय, जन्मतारीख आणि नामनिर्देशित व्यक्तीच्या मृत्यूनंतर निधी प्राप्त करण्यासाठी अधिकृत व्यक्तीचे तपशील काळजीपूर्वक भरा.
जन धन खाते फायदे देणारी बँकांची यादी
सरकारी बँक:- भारतीय स्टेट बँक (आणि तिचे संलग्न बँक), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इलाहाबाद बँक, विजया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, डेना बँक, भारतीय महिला बँक, पंजाब आणि सिंध बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, भारतीय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, आयडीबीआय बँक, सिंडिकेट बँक
खाजगी बँक:- एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, यस बँक, कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक, एक्सिस बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, इंडसँड बँक, आयएनजी व्यास बँक.
आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय? , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना? , प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.