Arthasakshar Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाल
Reading Time: 3 minutes

Rakesh Jhunjhunwala

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) म्हणजे शेअर बाजारातील एक मोठं नाव. झुनझुनवाला यांच्या यशाची कहाणीदेखील मोठी रंजक आहे.

घरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो. अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

पार्श्वभूमी – (Rakesh Jhunjhunwala)

  • १९६० साली मुंबईमध्ये एका सामान्य गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि सोबतच त्यांना शेअर मार्केट मध्येदेखील पैसे गुंतवण्याची आवड होती.
  • मोठे झाल्यावर जेव्हा राकेश भाईंनी त्यांच्या वडिलांकडे शेअर मार्केट मध्येच करिअर करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी नीट शिक्षण घेण्याचा सल्ला दिला म्हणजे नंतर शेअर मार्केटमध्ये नीट जम नाही बसला तरी हातात ठोस काहीतरी पैसे कमावण्याचे साधन राहील. 
  • त्यानुसार त्यांनी १९८५ साली चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा राकेश भाईंनी त्यांचा वडिलांजवळ शेअर मार्केटमध्येच करिअर करायचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हवे ते करिअर करण्याबद्दल सांगितले परंतु आपण कोणतीही आर्थिक मदत करणार नाही असे स्पष्ट सांगितले.
  • अशा प्रकारे १९८५ – ८६ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्सच्या व्यवसायास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी शेअर्स बाजारात गुंतवणुकीस प्रारंभ केला तेव्हा सेन्सेक्स १५० पॉईंट्स इतका होता (आता सेन्सेक्सचे मूल्य ३५००० पॉईंट्स इतके आहे).
  • राकेश भाईंकडे गुंतवण्यासाठी फक्त ५००० रुपये होते आणि एवढ्याशा पैशांमध्ये त्यांना फार काही लाभ होऊ शकणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या एका मित्राकडून फिक्स डिपॉझिट मधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळवून देण्याच्या शब्दावर अडीच लाख रुपये मिळवले. 
  • १९८६ मध्ये त्यांना शेअर्स मधून चांगला नफा झाला. त्यांनी टाटा टी कंपनीचे ५००० शेअर्स प्रत्येकी ४३ रुपयांना विकत घेतले व ते १४३ रुपये प्रति शेअर्स या किमतीला विकले. त्यानंतर मग त्यांच्या शेअर्स मधील गुंतवणुकीवरील नफ्याचा आलेख वाढतच गेला.

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

यशाचा प्रवास –

  • राकेशजींना १९८६ ते १९८९ या कालावधीमध्ये साधारण २० ते २५ लाखांपर्यंतचा नफा झाला.
  • त्याचप्रमाणे टाटा पॉवर लि. मध्ये त्यांनी केलेल्या २० लाखांच्या गुंतवणुकीत त्यांना दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे जवळजवळ ५०.५ लाखांएवढा लाभ झाला आणि इथूनच त्यांच्या शेअर्स मार्केट मधील करिअरला खरी गती प्राप्त झाली. 
  • सुरुवातीला राकेशजींनी केलेल्या काही महत्वाच्या गुंतवणुकींमध्ये सेसा गोवाचे त्यांनी ४ लक्ष शेअर्स त्यांनी आधी ६५ रुपये प्रति शेअर्स आणि दुसऱ्या भागात १५० रुपये प्रति शेअर्स या किमतींना घेतले ज्यांची किंमत नंतर २२०० रुपये प्रति शेअर्स इतकी झाली आणि त्यातून त्यांना चांगला डिव्हीडेंटही मिळाला. 
  • यानंतर प्राज इंडस्ट्रीज लि. मध्ये त्यांनी जास्त काळासाठी पैसे गुंतवले. जेव्हा त्यांनी यातले शेअर्स घेतले तेव्हा त्यांची किंमत ५५०० पॉईंट्स इतकी होती आणि जेव्हा हे शेअर्स त्यांनी विकले तेव्हा याच शेअर्सची किंमत १२००० पॉईंट्स इतकी झाली होती. म्हणजेच त्यांनी जवळ जवळ २५० पट्टींनी यामध्ये नफा कमावला. 
  • यानंतर त्यांना कधीच त्यांच्या शेअर्स बाजारातील करिअर मध्ये मागे वळून पाहण्याची गरज नाही पडली.
  • २००२-०३ सलालमध्ये राकेशजींनी टायटन कम्पनी लिमिटेडया टाटाच्याच घड्याळाच्या ब्रँडमध्ये पैसे गुंतवले ज्यांची त्या वेळची किंमत साधारण ३ रुपये प्रति शेअर्स इतकी होती आज त्याच शेअर्सची किंमत साधारण ८१७ रुपये प्रति शेअर्स इतकी आहे. आजही हे शेअर्स त्यांच्याकडे आहेत ज्यामुळे त्यांचा टायटन कंपनीमध्ये ८.४५% वाटा आहे. 

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

  • आज राकेश झुनझुनवाला यांची स्वतःची “रारे एन्टरप्राइजेस” (Rare Enterprises) नावाची कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांनी स्वतःच्या नावामधील आद्याक्षर ‘रा’ (Rakesh Jhunjhunwala) व त्यांची पत्नी सौ. रेखा (Rekha) यांच्या नावामधील अक्षरे आद्याक्षर ‘रे’ असे एकत्र करून ठेवले आहे. 
  • या सर्व प्रवासात आपल्या कुटुंबाचे आपल्याला कशा प्रकारे सहकार्य लाभले हे सांगताना ते आवर्जून सांगतात की आई-वडील, भाऊ यांच्यासोबतच त्यांची पत्नी त्यांच्या या सर्व वाटचालीत कायम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती. त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की घरातील प्रत्येक पुरुषमागे एका स्त्रीचे पाठबळ असल्यास तो नक्की यशस्वी होतो. 
  • जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवणे जास्त लाभ मिळवून देते की कमी कालावधीतील गुंतवणुकीत जास्त नफा होतो असे विचारले असता राकेशजी सांगतात, “कमी कालावधीतील गुंतवणूक कमी कालावधीत लाभ मिळवून देते आणि जास्त कालावधीतील गुंतवणूक ही जास्त कालावधीतील भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायी ठरते. माझ्या गुंतवणुकींमधील मूल्यांमुळे मला तांत्रिक विश्लेषण करून त्यानुसार गुंतवणूक नक्की कशामध्ये करायची हे ठरवणे शक्य होते. या दोन्ही प्रकारातील गुंतवणूक एकमेकांच्या साहाय्याने तुम्हाला चांगला लाभ मिळवून देते परंतु हे दोन्ही परस्पर भिन्न प्रकार आहेत.”
  • श्री. राकेश झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार ज्याला शेअर्स बाजाराबद्दल विशेष आकर्षण आणि रुची असेल त्याला शेअरबाजारात नक्की लाभच होईल कारण तुम्हाला ज्या ही क्षेत्रात विशेष रुची असेल त्या क्षेत्रात तुम्ही कधीही मागे पडत नाही, त्यात तुमची कधीही अधोगती होत नाही.

इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

अशा प्रकारे फक्त ५००० रुपयांनी आपल्या शेअर बाजारातील करिअर ची सुरुवात करणाऱ्या श्री. राकेश झुनझुनवाला यांचे मूल्य २०१७ च्या फोर्ब्स ने केलेल्या मूल्यांकनानुसार १९००० करोड इतके असून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीमध्ये त्यांनी  ५४ वे स्थान प्राप्त केले आहे.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Rakesh Jhunjhunwal in marathi, Who is  Rakesh Jhunjhunwal Marathi info, Rakesh Jhunjhunwal in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…