Reading Time: 2 minutes
आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा
RBI – loan moratorium extension
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा :
रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात :
- बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
- ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.
कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !…
ईएमआय मोराटोरीयम: (RBI –EMI Moratorium)
- याआधीच मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने ईएमआय मोराटोरीयम जाहीर केला गेला होता. (EMI Moratorium)
- आजच्या घोषणेनुसार आणखी ३ महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जदारांची ईएमआय (EMI) मधून सुटका होईल.
- कर्जाचे परतफेडीसाठी अधिक कालावधी मिळाला असला, तरी व्याज मात्र द्यावे लागणार आहे.
- उद्योग व व्यापारी कर्जदारांना मिळत असलेल्या कैश क्रेडिट कर्जाबाबत प्रवर्तकांचे स्वतःचे भांडवल किती असावे याबाबत दिलासा देणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.
- एकूण ६ महिने कर्ज मुद्दल व व्याज परतफेड करण्याची सवलत आरबीआयने दिली आहे. यामुळे एखादे कर्ज खाते या सवलतीच्या ६ महिन्याच्या कालावधीत एन.पी.ए. होणार नाही.
- कर्ज एन.पी.ए. होणे म्हणजे ते कर्ज बँकेसाठी अनुत्पादक मालमत्ता म्हणून गणली जाते. (NPA = Non Performing Asset) कर्जदाराचे कर्जखाते एन.पी.ए. झाले असता त्याच्या सिबिल स्कोअरवर अत्यंत विपरीत परिणाम होतो.
कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?…
इतर महत्वाचे :
- करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले आहे. यात अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटींची मदत दिली आहे.
- आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जीडीपीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी दर शून्याखाली जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
- आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याने कृषी क्षेत्राला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
ईएमआय मोराटोरीयम (RBI -EMI Moratorium), रेपो दरात कपात यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणारे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
web search: RBI updates Marathi, RBI News Marathi, Repo Rate Marathi , RBI loan moratorium extension Marathi, RBI aani karjmudat marathi, RbI guidelines Marathi, RBi announcements Marathi
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :