Bitcoin currency
Reading Time: 4 minutes

Bitcoin currency 

बिटकॉईन करन्सी (Bitcoin currency) हा विषय नीट समजण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी समजणे आवश्यक असल्याने एक मोठा लेख न लिहिता तो तीन भागात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्वांनी मी लिहिलेलं आवडीने वाचले, नवीन विषय सुचवले त्यामुळे मला अधिकाधिक माहिती मिळवून ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आले. अनेकांनी बिटकॉईनवर सोप्या भाषेत सर्वाना समजेल अशा लेखाची मागणी केल्याने या विषयावर लिहिण्याचे धाडस मी करत आहे.

मी या विषयातील तज्ज्ञ नाही. तरीही मला जे काही समजलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. यासंदर्भात नेहमी आपण वापरत असलेले इंग्रजी त्याला कंसात ठेऊन त्याला मराठी शब्दपर्याय दिला आहे. यातील कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असल्यास त्या विचाराव्या, त्यातील सर्वाना महत्वाच्या आणि उपयोगी शंकाचे समाधान मी स्वतंत्रपणे करेन. माझ्या स्वताच्याही याबद्दल शंका असून मी त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतोय. 

हे नक्की वाचा: Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

Bitcoin: बिटकॉइन 

  • आपण ज्यांना मूल्याधारीत गुंतवणूकतील गुरू समजतो त्या वॉरेन बफे आणि बिल मीलर याची बिटकॉईन विषयीची मते 100% परस्परविरोधी आहेत. 
  • बिटकॉईन सर्वात प्रथम निर्माण झालेली क्रेप्टोकरन्सी आणि ग्लोबल पेमेंट सिस्टीम असून त्याच्या विशेष रचनेमुळे त्याचे नियमितपणे व्यवहार जगभरात कुठूनही तात्काळ करता येणे शक्य आहे.
  • अस्तीत्वात असलेल्या जगभरातील कोणत्याही अन्य चलनात ते बदलता येते व त्याची खरेदी विक्री करता येते. 
  • त्याचा साठा मर्यादित असून त्यामुळे निर्माण झालेल्या कमतरतेने, तसेच त्याचे फायदे लक्षात आल्याने आणि मोठया प्रमाणात जगभरातील लोकांनी त्याचा स्वीकार केल्याने त्याच्या मागणीत वाढ होत आहे. 
  • त्यांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात वाढ सातत्याने होत असते जी गुंतवणूकदारांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे त्याच्या दिवसभरातील बाजारभावात खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असल्याने भावातील फरकाने ट्रेडिंगच्या आकर्षक संधी उपलब्ध होतात.
  • यात  जगभरात त्याचे सातत्याने व्यवहार होत असून अन्य चलनाच्या भावाच्या तुलनेत त्याच्या भावात खूप मोठा फरक पडतो. याचप्रमाणे त्याचे फ्युचर ऑपशन्समध्ये ही व्यवहार होतात. 
  • सन 2009  मध्ये बिटकॉईन अस्तित्वात आले, त्याच सुमारास जागतिक मंदी असल्याने लोकांना प्रस्थापित चलनास सुयोग्य पर्यायाची आवश्यकता होती. 
  • जेव्हा जेव्हा अर्थव्यवसस्थेत मंदी येते तेव्हा लोक अधिकाधिक परतावा मिळवणाऱ्या अन्य पर्यायाचा शोध घेतात, आतापर्यंत त्यास सोने आणि स्थावर मालमता हे पर्याय होते त्यातील सोने या पर्यायाने महागाईवर मात करणारा परतावा दिला आहे. त्यास मोठा इतिहास आहे. 
  • स्थावर मालमत्ता हाही काही वर्षांपूर्वी आकर्षक पर्याय होता परंतू सध्याच्या परिस्थितीत हा पर्याय आजमवण्याचा प्रयत्न केल्यास तो पूर्वीसारखा फायदेशीर न ठरता त्यामुळे तोटा होण्याची शक्यता अधिक असल्याने रिटस, इनव्हीट यासारखे अनोखे व सुरक्षित पर्याय उपलब्ध होत आहेत. 
  • सन 2020 हे वर्ष बिटकॉईनच्या दृष्टीने आकर्षक रिटर्न देणारे वर्ष ठरले. क्रेप्टोकरन्सी प्रकारचे हे चलन  ही ग्लोबल डिजिटल पेमेंट स्वरूपात वापरता येते. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते. 

विशेष लेख: Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

Bitcoin: केंद्रीकृत आणि विकेंद्रित बँकिंग (Centralize and decentralized banking)

  • कोणत्याही चलनाचे मूल्य ठरते ते त्यावरील विश्वासाने. प्रत्येक देशाची स्वताची अशी चलनव्यवस्था असते. 
  • देशातील मनीमार्केट आणि कॅपिटल मार्केट याहून अधिक जबादारी असलेली अशी सर्वोच्च पातळीवरील सेन्ट्रल बँक असते. 
  • इतर बँका या नफा मिळवणे या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात तर सेन्ट्रल बँक ही देशाचा आर्थिक विचार करते. 
  • देशातील मनी मार्केट व कॅपिटल मार्केटवर नियंत्रण ठेवते. आवश्यक चलनाची निर्मिती करते. परकीय चलनावर नियंत्रण ठेवते. 
  • देशातील बँक व्यवसाय प्रगती करेल यासाठी लक्ष देते. विकासासाठी उपयुक्त वातावरण निर्मिती करते. 
  • आपल्या देशात ही जबाबदारी भारतीय रिझर्व बँक करते म्हणून तिला बँकांची बँक, सेंट्रल बँक असे म्हणतात. 
  • प्रत्येक देशाची स्वताची अशी सेंट्रल बँक असून ती त्या देशाचा विचार करून योग्य ते निर्णय घेत असते ते त्या देशातील सर्वच बँकांना मान्य करावे लागतात.
  • थोड्या फार फरकाने प्रत्येक देशात अशी व्यवस्था असून या संस्थेचे संचालक मंडळ आणि तज्ज्ञ सल्लागार असतात. 

सेन्ट्रल बँकेस म्हणजे आपल्या देशात रिझर्व बँकेस अनेक कामे करावी लागतात. उदा-

  • नोटा निर्मिती आणि प्रसारण, बाद नोटा नष्ट करणे.
  • केंद्र राज्य यांच्यातील आर्थिक व्यवहार. कर्जाचे व्यवस्थापन.
  • गव्हमेंट बॉण्ड, ट्रेझरी बिल्स, परदेशी चलन यांची खरेदी विक्री.
  • विनिमय व्यवहारावर नियंत्रण.
  • बॉण्ड्सचे एक्सचेंजवरील व्यवहार.
  • बँकांना परवाने, त्याचे ऑडिट, त्याच्यावर कारवाई. बँकेतर वित्तीय संस्थावर नियंत्रण.
  • आर्थिक धोरण ठरवणे, कर्जे आणि ठेवी यावरील व्याजदर निश्चित करणे.
  • चलनावरील विश्वास वाढवणे, महागाईवर नियंत्रण ठेवणे. 

ही यादी खूप मोठी आहे यात काही प्रशासासकीय कामे आहेत.

महत्वाचा लेख: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान

अर्थव्यवस्था आणि चलन 

  • जोपर्यंत आपली अर्थव्यवस्था सोन्याच्या साठ्यावर आधारित होती तोपर्यंत सर्व ठीक होतं असं म्हणता येईल. 
  • जेव्हा आपण असे करणे सोडून दिले तेव्हापासून महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असे म्हणता येईल. यासाठी रिझर्व बँकेकडून प्रयत्न केले जातात. परंतू, त्यात राजकीय हस्तक्षेप झाला तर त्यामुळे घेतलेले निर्णय हे काही विशिष्ट हेतूने आणि नाईलाजाने घेतले जातात. 
  • जगात सर्वत्र  प्रत्येक राज्यकर्ते मग ते कोणत्याही देशातील असोत, अर्थव्यवस्थेवर आपलेच नियंत्रण राहावे यासाठी प्रयत्न करीत असतात. त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. मोठ्या प्रमाणावर महागाई वाढते त्यामुळेच लोक त्यावर मात करण्यासाठी विविध पर्याय शोधू लागतात. त्यामुळेच सर्वच व्यवहार पारदर्शक व नियंत्रण मुक्त असावेत असे अनेकांना वाटते. 
  • आपल्या चलनाचे मूल्य वाढून त्याचे मालमत्तेत रूपांतर व्हावे आणि त्यातून चांगला परतावा (Return) मिळावा असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. ही गरज क्रेप्टोकरन्सी पूर्ण करते. 
  • क्रेप्टोकरन्सी ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्यास ब्लॉकचेन असे म्हणतात. यामुळे व्यवहार खात्रीशीर होईल परंतू तो कुणा एकाच्या नियंत्रणात (Centralized) नसेल, तर त्याचे विकेंद्रीकरण (Decentralized) झाले असल्याने ते अनेकांकडून मान्य केले जाईल.
  • आपली फसलेली नोटांबंदी तसेच करोना नंतरच्या काळात सर्वच देशांनी मोठ्या प्रमाणात केलेली नोटांची छपाई आणि वाढलेल्या महागाईवर कृत्रिमरित्या नियंत्रित ठेवलेले व्याजदर या पार्श्वभूमीवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या चलनाची (currency) गरज निर्माण झाली आहे

गेले पाच वर्षे मी दर आठवड्याला किमान एका नवीन विषयावर लिहीत आहे. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मला खूप काही माहिती असल्याचा माझा समज होता. पण प्रत्यक्षात लेखनासाठी संदर्भ शोधताना जी माहिती मिळाली ती इतकी प्रचंड होती त्यापुढे मला माहिती असलेली माहिती अगदीच किरकोळ होती. मुळात या  विषयाची आवड असणारे लोक कमी, त्यात मी विषय थोडा सोपा करून सांगत असेल तरी तो रंजक करणे मला अजून जमलंय असं वाटत नाही.

क्रमशः:

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Bitcoin in Marathi, Bitcoin Marathi Mahiti, Bitcoin mhanje kay?, Bitcoin Marathi, Bitcoin currency in Marathi, Bitcoin currency Marathi Mahiti, Bitcoin currency in Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…