Relationship crisis
Reading Time: 3 minutes

Relationship crisis

आजकाल नातेसंबंधांमध्ये दुरावा (Relationship crisis) येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो. 

हे नक्की वाचा: आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

नातेसंबंधांमध्ये दुरावा (Relationship crisis): दोन उदाहरणे 

उदाहरण १:

रिया आणि रोहन एक सुखवस्तू जोडपं. दोघांचेही महिन्याला लाखाच्या घरात जाणारे उत्पन्न, शहरातील मध्यवर्ती भागात चार बेडरूमचा मोठा ‘लॅविश’ फ्लॅट, लक्झरी गाडी, शहराबाहेर नव्यानेच होणाऱ्या एका आलिशान सोसायटीमध्ये बुक केलेलं रो-हाऊस शिवाय ठिकठिकाणी केलेल्या दोघांच्याही वैयक्तिक गुंतवणुका कशाचीच कमी नव्हती. दोघांचेही आई वडील चांगल्या पोस्टवरून रिटायर्ड झालेले असल्यामुळे तशी कोणाची जबाबदारीही नव्हती. पण तरीही दोघांमध्ये वाद होत होते. वादाचं कारण होतं रोहनचा बिनधास्त स्वभाव. 

रोहन बिनधास्तपणे कोणत्याही आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय मोठ मोठ्या रकमेची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करत असे तर रिया मात्र गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांना पसंती देत असे. या दोन्ही गोष्टींवरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. 

उदाहरण २:

समीर आणि सोनाली एक मध्यमवर्गीय जोडपं दोघांचीही तशी चांगल्या पगाराची नोकरी. समीरच्या वडिलांच्या स्वतःच्या मालकीच्या घरातच त्याच्या आई वडिलांसह समीर व सोनाली राहत होती. एकत्र कुटुंब म्हटलं की थोड्याफार कुरबुरी आल्याच. पण समीर घरातला एकुलता एक मुलगा असल्याने आई वडील नवीन पिढीशी मिळतं – जुळतं घेत होते. त्यामुळे बाकी सगळं ठीक चाललं होतं. मुख्य म्हणजे घराचं भाडं किंवा गृहकर्ज हप्ता भरावा लागत नसल्यामुळे पगाराच्या मानाने दोघांची बचतही चांगली होत होती. पण हे सगळं वरवरचं होतं. सोनालीच्या मनात मात्र वेगळं राहायचा विचार डोकावत होता. त्या दृष्टीने तिचे सगळे प्रयत्न चालू होते. तिच्या या इच्छेमुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी पाडायला सुरुवात झाली होती. 

सोनालीची इच्छा चूक नसली तरी काहीशी भावनिक होती. त्यासाठी ती अति व्यावहारिक वागत होती. सोनालीचं प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवणं, साध्या साध्या गोष्टीतही पैशांचा विचार करणं समीरला खटकत असे. तर आई वडिलांसाठी सतत खर्च करणे, नातेवाईंकांच्या लग्नात महागड्या भेटी देणे यामुळे सोनाली नाराज होती. काही दिवसांनी त्यांच्या दोघांमधलं हे शीतयुद्ध वाकयुद्धात बदललं. 

ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे. जवळपास प्रत्येकाच्या घरातच या किंवा अशा प्रकारच्या आर्थिक वादांनी शिरकाव केलेला असतोच. कुटुंबाचा भक्कम पाया डळमळीत करणारे आर्थिक घटक व ते सोडविण्याचे मार्ग याबद्दलची चर्चा आपण या लेखात करणार आहोत. 

रोहनची शेअर मार्केटमधली गुंतवणूक रियासाठी मोठी डोकेदुखी ठरू लागली होती तर त्याची ऑनलाईन शॉपिंगची आवड आणि क्रेडिट कार्डचा दर बिलाच्या वेळी वाढत जाणारा आकडा आगीत तेल ओतण्याचे काम करत होता. 

दुसरीकडे, सोनालीचा प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवणे पै न पै वाचविण्यासाठी चालत जाणे समीरला पटत नव्हते. तर आई वडिलांसाठी खर्च करण्याच्या कारणावरून सोनाली समिरवर नाराज होत होती.

विशेष लेख: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन 

Relationship crisis: पैसा हाच मूळ मुद्दा 

दोन्ही उदाहरणांमध्ये पैसा हा वादाचा मूळ मुद्दा आहे. इकॉनामिक टाइम्सने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणानुसार ५५% जोडप्यांमध्ये पैशांवरून भांडणे होतात. या सर्व्हेमध्ये ५५० लोकांनी भाग घेतला होता. यामध्ये निदर्शनात आलेली भांडणाची कारणे व त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे-

  • जोडीदाराचा खर्चिक स्वभाव – ४१. ३%
  • अतिकाटकसर – ३७.१%
  • नातेवाईकांना मदत – ३२.८%
  • आर्थिक व्यवहार लपवणे – २५.७%
  • गुंतवणुकीच्या पर्यायांची निवड -२२.८%

वरील आकडे बघितल्यावर असे लक्षात येते की ‘पैसा’ या एका कारणामुळे ५०% हुन जास्त संसारामध्ये वादविवाद होत असतात. हे आकडे अगदी सहज कमी करता येण्यासारखे आहेत. गरज आहे ती दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची. एकमेकांची मते जाणून घेऊन त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. परंतु नेमकं इथेच तर घोडं अडतंय ना! 

Relationship crisis: जोडीदारांसोबतची भांडणे कशी आटोकाट आणाल?

१. व्यस्त जीवनशैली:

  • व्यस्त जीवनशैली म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं तर ‘बिझी लाईफस्टाईल’ ही आजकालची वस्तुस्थिती म्हणण्यापेक्षा फॅशन झाली आहे. 
  • भारताने  अजून एका गोष्टीत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे तो म्हणजे सोशल मीडियावर सक्रिय राहण्यात. भारतीय लोक सरासरी आठवड्यचे १७ तास सोशल मीडियावर घालवतात. (संदर्भ: इंडियाटाइम्स.कॉम : http://bit.ly/IT_News_survey
  • जर यामधला निम्मा वेळ जरी जोडीदाराला किंवा कुटुंबाला दिला तर विविध प्रश्न सोडवता येतील आणि नात्यातला सामंजसपणा आणि गोडवा खूप छान वाढेल.
  • अनेकदा मोठ मोठे प्रश्न छोट्याशा चर्चेने सुटतात. गुंतवणूक, कर्ज, क्रेडिट कार्डचा वापर अशा मुद्द्यांवरून होणारे वाद शांतपणे चर्चा केल्यास मिटू शकतात. 

२. स्वभाव:

  • अति खर्चिकपणा आणि अति काटकसर हे एक प्रकारचे मानसिक रोग आहेत. अनेकदा कळत असतं आपण चुकतोय पण स्वतःला थांबवता येत नाही. 
  • अनेकदा निव्वळ दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहींना काही खर्च केला जातो तर गरज नसताना मन मारून काटकसर केली जाते. 
  • स्वतःचा स्वभाव स्वीकारून जर त्याबद्दल जोडीदारासोबत चर्चा केली अथवा जोडीदाराला समजून घेऊन त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली तर बरेचसे आर्थिक तसेच कौटुंबिक प्रश्न सुटतील. 

३. नातेवाईक व आर्थिक व्यवहार:

  • अनेकदा नातेवाईकांच्या आर्थिक बाबतीत केलेल्या हस्तक्षेपामुळे अथवा त्यांना केलेल्या मदतीमुळे जोडीदारासोबत वाद होतात. 
  • काही नातेवाईक जाणीवपूर्वक आर्थिक हस्तक्षेप करतात. 
  • अशावेळी आरोप प्रत्यारोप न करता एकमेकांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. शक्यतो कोणाकडून कर्ज घेऊ नये आणि कोणाला कर्ज देऊ नये. या कामासाठी बँका आहेत. अगदीच गरज असेल तर नातेवाईकांना मदत जरूर करा पण जोडीदाराशी विचार विनिमय करूनच योग्य ते पाऊल उचलावं.
  • आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जोडीदारासोबत लपवाछपवी अजिबात करू नका. 

महत्वाचा लेख: डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

आपल्या जोडीदाराला / कुटुंबाला नेहमी प्रथम प्राधान्य द्या. पैसा हा आयुष्यातील आवश्यक घटक आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे जरी खरं असलं तरी तुमच्या जोडीदाराशिवाय तुम्ही अपूर्ण आहात. त्यामुळे गरजेपुरता आणि गरजेसाठी खर्च नक्की करा. आपले आर्थिक नियोजन एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण करा. “जीओ जी भर के…”

 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Relationship crisis in Marathi, Relationship crisis Marathi Mahiti, How to resolve Relationship crisis, How to resolve Relationship crisis in Marathi, How to resolve Relationship crisis Marathi Mahiti

Share this article on :
You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –