शेअर बाजार नियम
https://bit.ly/3q1wDOY
Reading Time: 3 minutes

शेअर बाजार: संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

शेअर बाजारात संपत्ती मिळविण्यासाठी गुंतवणुकीच्या काही मुलभूत तत्त्वांचे पालन करून योग्य नियोजन करता येते. शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ५ मूलभूत नियम कोणते आहेत, याबद्दल आपण आज माहिती घेऊया.

शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेनेच नवा गुंतवणुकदार सुखावतो. कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासही त्याला वाटत असतो. खरंतर गुंतवणूकदार अल्प काळातही चांगला परतावा मिळवू शकतात, मात्र अस्थिर इक्विटी बाजारात सतत व्यापार केल्याने कमी परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. 

गुंतवणुकदाराने जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या लोभात अडकण्याऐवजी काळजीपूर्वक आणि हिशोबशीर गुंतवणुकीसाठी पोर्टफोलिओ मॅनेजर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले, तर सरासरी गुंतवणूक अधिक चांगली होईल. 

हे नक्की वाचा: DIY: गुंतवणूक कितपत फायद्याची? 

शेअर बाजार: संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

१. लाभांश: 

  • जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते, तेव्हा गुंतवणुकदार कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा लाभ घेतो. 
  • नफा होतो, तेव्हा त्याचा हिस्सा आपल्या शेअरधारकांना  कसा द्यायचा, हे कंपन्या ठरवत असतात. 
  • सामान्यपणे नफ्याचे हे आंशिक वाटप असते. कारण कंपन्यांना उत्पादन क्षमता वाढविणे, सेवा-सुविधा किंवा कंपनीचे भविष्य नियोजन व विस्तारासाठी हा नफा साठवून ठेवायचा असतो.
  • आपण घेतलेल्या प्रत्येक शेअरसाठी किती वाटा मिळणार, हे कंपनी ठरवते, यालाच लाभांश असे म्हणतात. 
  • संस्थेची पूर्ण माहिती आणि नफ्याच्या खर्चाबाबत जाणून घेतल्यास तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय घेता येतील.

२. विविधता: 

  • हा उपाय जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराने अमलात आणला पाहिजे. अनिश्चित बाजारात तग धरून राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. 
  • ज्यांची  जास्त जोखिम पत्करण्याची तयारी असते, ते नेहमीच कंपनीच्या शेअर्सच्या ट्रेंडनुसार स्वत:साठी निवडक शेअर्स खरेदी करतात. या कंपन्या चांगलीच कामगिरी करतील, अशी अपेक्षा असते. 
  • परंतु, असे निर्णय घेताना, सल्लागारांची मदत निश्चितच उपयुक्त ठरते. परंतु यात असुरक्षितता असते. बहुसंख्य गुंतवणुकदारांसाठी हे फायदेशीर ठरत नाही.
  • याउलट शेअर्समधली विविधता जोखीम कमी करते आणि यामुळे पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. 
  • ‘आपले सर्व माप एकीकडेच झुकू देऊ नका, ’ या म्हणीनुसार वर्तणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगले परिणाम मिळू शकतात. 
  • बाजारात तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.

महत्वाचा लेख: शेअर बाजार- गुंतवणूक करताना या मूलभूत चुका टाळा  

 ३. आपण गुंतवणूक करत असलेल्या कंपन्यांचे विश्लेषण करावे: 

  • ‘इन आणि आउट’चा अभ्यास करणे, वित्तीय यंत्रणा आणि संरचनाविषयी माहिती घेणे, मार्केट ट्रेंड समजून घेणे, यामुळे तुमचे अर्धे काम होते. 
  • गुंतवणुकदार बऱ्याचदा प्रादेशिक ट्रेंड, जागतिक आर्थिक दृष्टीकोन आणि कंपनीच्या घोषणा यांवरून शेअर्सचे मूल्य ठरते, असे मानण्याची चूक करतात. 
  • कंपनीच्या अंतर्गत कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असते, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. दीर्घकालीन गुंतवणुक करण्यापूर्वी रोखीचा प्रवाह, खर्च, मागील वर्षातील महसूल आणि आर्थिक निर्णय समजून घेणे या बाबींवरही पूर्ण संशोधन करून त्या समजून घेतल्या पाहिजेत. 
  • यासाठी सखोल अभ्यास आवश्यक असल्याने गुंतवणूकदारांसाठी या मुद्द्यावर पोर्टफोलिओ व्यवस्थापकांची मदत आवश्यक असते. 

४. अंदाजाने निर्णय घेणे टाळावे: 

  • बऱ्याच वेळा लोक, बाजारातील अंदाज किंवा अफवांच्या आधारे नफा / परतावा मिळण्याच्या दृष्टीने चुकीचे निर्णय घेतात. 
  • पुष्टी न झालेल्या बातम्यांच्या वेळी शांत राहणे, हादेखील संपत्ती निर्माण करण्याचा प्रमुख मार्ग आहे.
  • जेव्हा कंपनीच्या बाबतीत अनिश्चित परिस्थिती निर्माण होते, तेव्हा लोक एकत्रितपणे विचार करतात, चर्चा करतात आणि एक तर स्टॉक्स विकत घेतात किंवा विकतात. 
  • त्यामुळे अशा संकटाच्या वेळी आपल्या पोर्टफोलिओचे चुकीचे व्यस्थापन न करता, भावनिक निर्णय घेतल्यास स्टॉक्सच्या गणितावर परिणाम होतो.

५. कधी आणि कशी विक्री करावी, हे योग्य रितीने समजून घ्यावे: 

  • काही लोकांना जास्त जोखिमेद्वारे जास्त परतावा मिळविण्याची हाव असते. 
  • काही स्टॉक्स चांगले परतावे मिळवून देत असले तरी तज्ज्ञांच्या मते, तरुण गुंतवणूकदार भांडवलाच्या मूल्यांकनावर किंवा शेअर मूल्यात घट झाल्यानंतर कमी किंमतीवर जोखीम पत्करू शकतात.
  • हे निर्णय बऱ्याच वेळा बाजारातील चढ-उतारांनुसार घेतले जातात. कंपनी किंवा उद्योगाच्या दीर्घकालीन वृद्धी धोरणाचा अभ्यासानुसार घेतलेले नसतात. याचे परतावेही खात्रीशीर नसतात. ते जुगार खेळण्यासारखे आहे. 
  • बाजार मूल्यांकनाऐवजी ते गुंतवणुकदाराच्या नशीबावर जास्त अवलंबून आहेत.

इतर लेख: ब्लू चिप शेअर्स मधील गुंतवणुकीचे फायदे

दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणुक करणाऱ्यांनी, अल्पकालीन बाजारातील अस्थैर्य किंवा स्टॉकच्या पर्यायांतील किंमतीतील स्थैर्यानुसार, आपला खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेऊ नये. लार्ज कॅप गुंतवणूकीवर लक्ष ठेवत आणि मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये कमी गुंतवणूक करत, प्रत्येकजण वैयक्तिकरित्या विक्रीचा निर्णय घेतो, तो संपूर्ण आर्थिक परिस्थितीनुसार घेतला जात नाही. अशा प्रकारे, घाईने निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे चांगला परतावा मिळत नाही.

शेअर बाजार या संकल्पनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमजच जास्त आहेत. त्यामुळे बाजारात व्यवहार करण्यापूर्वी इथले नियम समजून घेणं कोणाला महत्वाचं वाटत नाही. तुमच्या योजना काहीही असोत, संपत्तीची निर्मिती प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. तत्काळ पैसे कमावण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ती उपयुक्त नाही. स्टॉक्सच्या पर्यायातून अनेक वर्षांनंतर उत्कृष्ट परतावा मिळू शकतो. परंतु, उत्कृष्ट परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकदाराकडे संयम आणि शांतता असणे आ‌वश्यक आहे.

श्री. ज्योती रॉय

डीव्हीपी – एक्विटी स्ट्रॅटजिस्ट,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…