SIP investment
Reading Time: 4 minutes

SIP Investment

भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गांत झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या (SIP Investment) मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबल्या जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय. 

भारतीय नागरिकांच्या गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये जे बदल होत आहेत, त्यावर अनेक मार्गांनी शिक्कामोर्तब होते आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक हा आतापर्यंत सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीने लांबचा विषय होता, पण डिजिटल व्यवहारांना मिळालेली गती, आर्थिक साक्षरतेसाठी होत असलेले प्रयत्न आणि कोरोना संकट यामुळे तोही आता भाग घेताना दिसतो आहे. गेल्या दोन वर्षात असे सुमारे दीड कोटी गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले आहेत. कोरोना संकटामुळे सर्व व्यवहार मंदावले असताना या गुंतवणुकीचा त्यांना आधार वाटला. हा बदल एका धक्क्यातून झाला असला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण गुंतवणुकीला सर्वाधिक परतावा देणारा हा मार्ग अजूनही कोट्यवधी गुंतवणूकदारांपासून दूर आहे. पुरेशी माहिती न घेता शेअर बाजारात येणारे नागरिक पैसा गमावून बसतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र कधीतरी त्याला तो मार्ग कळला पाहिजे, याविषयी दुमत असू शकत नाही. 

 हे नक्की वाचा: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना

SIP Investment: एसआयपीत प्रथमच एवढी वाढ 

  • अर्थात, सर्वच नवे गुंतवणूकदार शेअर बाजारात थेट उडी घेत नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. याकाळात जेव्हा त्यांना शेअर बाजाराचे आकर्षण वाटले, तेव्हा त्यातील बहुतेकांनी शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग निवडला आहे. तो आहे म्युच्युअल फंडाचा. 
  • म्युच्युअल फंडात किती नागरिक गुंतवणूक करत आहेत, यासंबंधीची दर महिन्याला आकडेवारी प्रसिद्ध होते. 
  • सप्टेंबर २०२१ ची अशी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली असून ती अतिशय बोलकी आहे. 
  • दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये टाकत राहण्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी म्हटले जाते. गुंतवणुकीचा हा मार्ग जगभर अनुसरला जातो. 
  • भारतातही अलीकडच्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होताना दिसते आहे. 
  • गेल्या महिन्यात एसआयपी नोंदणीची संख्या २१ लाखांच्या घरात गेली आहे. ही नोंद नेहमीच्या सरासरीच्या अडीच पट अधिक आहे. 
  • २० लाखाच्या वर एसआयपी सुरु होण्याचा हा सलग चौथा महिना आहे, हे विशेष. म्हणजे गेल्या चार महिन्यात एसआयपीची संख्या ७७ लाखांच्या घरात गेली आहे. 
  • एक एसआयपी म्हणजे प्रत्येक वेळी एक नवा गुंतवणूकदार असे नसते. काही गुंतवणूकदार अनेक एसआयपी करत असतात, असे असले तरी ही वाढ महत्वाची आहे. कारण या प्रकारची वाढ भारतात यापूर्वी कधी झालेली नाही. 

SIP Investment: तेजीचा आणि एसआयपीचा संबंध 

  • कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बाहेर येते आहे, मात्र तिचा वेग काही शेअर बाजारातील तुफान तेजीइतका असू शकत नाही, हे समजण्यासारखे आहे. मात्र त्या तेजीच्या मागेही एसआयपीच्या मार्गाने वाढलेली गुंतवणूक ही कशी आहे, याची प्रचीती आणखी काही आकडे देतात. ते असे. 
  • एकतर एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये १० हजार ३५१ कोटी रुपये आले. गेले काही महिने हा आकडा आठ ते नऊ हजार कोटी रुपयांच्या मध्ये होता. 
  • दुसरे म्हणजे गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास यावर्षी या मार्गाने होणारी गुंतवणूक सरासरी २२.८ टक्क्यांनी अधिक आहे. 
  • तिसरे म्हणजे या एसआयपींचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांकडे या मार्गाने येणारी रक्कम सातत्याने वाढताना दिसते आहे. या कंपन्यांकडील असा एकूण निधी सप्टेंबरमध्ये ५.४४ लाख कोटींवर गेला आहे. 
  • बाजारातील तुफान तेजीचा आणि याचा कसा संबंध आहे पहा. गेल्या सहा महिन्यात एसआयपीच्या मार्गाने ५६ हजार ४५२ कोटी रुपये बाजारात आले. (त्यातील ९० टक्के रक्कम इक्विटी फंडांत आली आहे.) 
  • एसआयपीच्या मार्गाने बाजारात आलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे. बाजारातील तुफान तेजीही गेल्या सहा महिन्यातील आहे, हे लक्षात घ्या. 

विशेष लेख: “एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

विदेशी बाजारांचा प्रभाव कमी झाला 

  • भारतीय नागरिक शेअर बाजारात वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करत आहेत, याचा आणखी एक चांगला पैलू आहे. 
  • भारतीय शेअर बाजार हा पूर्णपणे जगातील इतर बाजारांवर अवलंबून राहात आला आहे. तसेच परकीय गुंतवणूकदारांच्या भांडवलावर त्याची तेजी मंदी ठरत आलेली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यात भारतीयांच्या अशा सहभागाने यात थोडा फरक पडला आहे. 
  • उदा. परकीय गुंतवणूदार अजून मोठ्या संख्येने भारतीय बाजाराकडे वळले नसल्याने त्यांची गेल्या सहा महिन्यातील गुंतवणूक फक्त आठ हजार २५९ कोटी रुपये आहे. त्यामुळे बाहेरच्या बाजारांचा भारतीय बाजारावरील प्रभाव कमी झाल्याचे या सहा महिन्यात पाहायला मिळाले. 
  • देशातील गुंतवणूकदारांचा वाटा आतापर्यत किरकोळ मानला जात होता, तो आता तसा राहिला नाही, ही भारतीय बाजारावरील भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी गोष्ट आहे. 

भारताच्या विकासदराची साथ 

  • आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या जीडीपी वाढीचा जो अंदाज (९.५ टक्के) वेळोवेळी जाहीर केला आहे, तोही उत्साहवर्धक ठरला आहे. 
  • अशा आकडेवारीमध्ये नेहमी इतका फरक असतो की त्यातील कोणती खरी मानावी, असा प्रश्न अनेकदा पडतो. पण योगायोगाने आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था, नाणेनिधी आणि रिझर्व बँक यांनी अंदाज केलेला विकासदर साधारण एवढाच आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. 
  • तो जगातील इतर देशांशी तुलना करता सर्वाधिक आहे. शेअर बाजार उद्याचा विचार करतो, हे गृहीतक मान्य करावायचे झाले तर शेअर बाजाराला नजीकचा भविष्यकाळ चांगला वाटतो, असे मानण्यास हरकत नाही. 

महत्वाचा लेख: Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी! 

नव्या गुंतवणूकदारांना इशारा 

  • अर्थात, हे सर्व आकडे चांगले असले तरी गुंतवणूकदारांनी सावधानतेचा इशारा लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे बाजार आता इतका वर आहे की तो कधी आणि किती किती खाली येईल, याची चर्चा सुरु झाली आहे. तशा बातम्या काही माध्यमांमध्ये येवू लागल्या आहेत. त्याचा फटका आपल्याला बसू नये, याची काळजी नव्या गुंतवणूकदारांनी घेतली पाहिजे. 
  • काळजी घ्यायची म्हणजे जी रक्कम नजीकच्या काळात लागणार आहे, ती बाजारातून काढून घेणे आणि बँकेत आपल्या खात्यावर जमा असेल, अशी व्यवस्था करणे. 
  • ज्यांना नजीकच्या काळात रक्कम नको आहे, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण नवे गुंतवणूकदार, एसआयपी आणि वेग घेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था बाजार असाच हलता ठेवण्याची व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करत रहाणार आहेत. 

यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: SIP Investment and Share Market Marathi, SIP Investment and Share Market in Marathi, SIP Investment and Share Market Marathi Marathi Mahiti, SIP Investment in Marathi, SIP Investment Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…