अर्थसाक्षर शेअर बाजार Stock Market
https://bit.ly/32Ae2R5
Reading Time: 3 minutes

 शेअर बाजार आणि वस्तुबाजार

शेअर बाजार (Stock Market) वस्तुबाजार (Commodity Market) म्हटलं की त्यापेक्षा माहिती कमी आणि कुतूहल जास्त अशी परिस्थिती आहे. 

बाजार म्हटले की कोणते चित्र डोळ्यासमोर येते? गर्दीचे ठिकाण, विक्रेत्यांची आरडाओरड, सेल लागलेल्या ठिकाणी जास्त गर्दी, काही दुर्लक्षित विक्रेते, काहींची आपापसात चर्चा आणि भावात होत असलेली तडजोड, कोठे खरेदीदार भरपूर तर मालाची कमतरता तर कुठे विक्रेते भरपुर तर खरेदीदारांची प्रतीक्षा कुठे होणारे भविष्यातील सौदे. सर्वसाधारणपणे कोणत्याही बाजारात दिसणारे हे खरेदीदार व विक्रेते यांचे हे चित्र अगदी आतापर्यंत म्हणजे सन 1995 पर्यंत आपल्या येथील शेअर बाजारात दिसत होते. 

वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र 

शेअर बाजार (Stock Market) : 

  • शेअर बाजार (Stock Market) कात टाकून आता आधुनिक झाला आहे. 
  • अत्याधुनिक पद्धतीने कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने हे व्यवहार होत असल्याने इथे फक्त शेअर्स, कर्जरोखे, बॉण्ड, करन्सी यांची देवाणघेवाण आणि त्यांच्या वायद्यांचे म्हणजेच एक प्रकारे भांडवलाचे व्यवहार होतात. 
  • यामुळे उद्योजकांना नवीन व्यवसायासाठी किंवा त्याच्या विस्तारासाठी अल्प मोबदल्यात भांडवल उपलब्ध होते, तर जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश बोनस व्याजरूपाने कदाचित चांगला परतावा मिळतो. 
  • एक्सचेंजमुळे जेव्हा पाहिजे तेव्हा बाजारभावाने गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
  • सरकारला कर मिळतो अनेक व्यक्तींना रोजगार मिळतो वित्तसंस्था म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपन्या, पेन्शन फंड यांना किफायतशीर गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो.  
  • सन 1956 च्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट क्टनुसार 31 ऑगस्ट 1957 पासून या व्यवहारांना कायद्याची मान्यता मिळाली. 
  • व्यवहार पूर्ण करण्यासाठी खरेदीदार व विक्रेता याची गाठ दलालामार्फत होत असल्याने आणि दलाल हा बाजाराच्या कार्यपद्धतीचे पालन करीत असल्याने सदर व्यवहार खात्रीपूर्वक पूर्ण होऊ लागले.
  • यासाठी 145 वर्षांपूर्वी मुंबई शेअरबाजार स्थापन होताना ठरवलेली आणि काळानुसार बदललेली नियमावली पुढे भारतात स्थापन झालेल्या सर्व प्रादेशिक व देशव्यापी बाजारांनी जशीच्या तशी स्वीकारली.

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

सेबी (SEBI) : 

  • मध्यंतरीच्या काळात मुंबई शेअरबाजारात दलालांची एकाधिकारशाही  निर्माण झाली त्याचा त्रास गुंतवणूकदारांना होऊ लागला. 
  • व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन मोठे घोटाळे झाले आणि प्रचलित व्यवस्थेवरील विश्वास उडण्याची चिन्हे दिसू लागली. 
  • यावर उपाय म्हणून सरकारच्या पाठींब्याने राष्ट्रीय शेअरबाजाराचा तगडा पर्याय निर्माण करण्यात आला. याशिवाय स्वतंत्र भांडवल बाजार नियंत्रकाची (SEBI) निर्मिती करण्यात आली. 
  • बाजारावरील विश्वास वाढवा, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे. व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजण्याचे कायद्याने अधिकार देण्यात आले. 
  • पुढे याच संस्थेत अर्थखात्याच्या नियंत्रणात असलेले फॉरवर्ड मार्केट कमिशन विलीन करण्यात येऊन कमोडिटी बाजारावरील नियंत्रणही सेबीकडे आले. 
  • सेबीने आपल्या अधिकारात जे बदल केले त्यामुळे बाजार म्हणून कार्य करण्यास आवश्यक पर्याप्तता निकष पूर्ण करणे प्रादेशिक बाजारांना शक्य झाले नाही त्यामुळेच कार्यरत असलेले अथवा नव्याने स्थापन झालेले सर्व बाजार एकामागून एक असे 2012 ते 2017 या काळात बंद पडले. 
  • सेबीच्या या कार्यपद्धतीस विरोध केल्याने आणि त्याविरुद्ध स्वतंत्र कायदेशीर लढाई चालू असल्याने कागदोपत्री कोलकाता शेअरबाजार अस्तित्वात असून सन 2014 नंतर  तेथे कोणतेही सौदे झाले नाहीत.

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

सेबीने मान्यता दिलेले भारतातील शेअरबाजार आणि वस्तुबाजार (Stock Market & Commodity Market) –

1. मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) 

  • मुंबई शेअर बाजाराची स्थापना 9 जुलै 1857 रोजी झाली. 
  • हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार, सर्वाधिक नोंदणीकृत कंपन्या 5500, नियमित 2800 कंपन्यांचे व्यवहार होतात.
  • सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9: 15 ते दुपारी 3:30 पर्यंत कामकाजाची वेळ, 
  • जगातील क्रमवारीत 9 वा मोठा बाजार, 
  • एका दलालांनी एका गुंतवणूकदाराबरोबर केलेल्या 15 लाख रुपयांचे व्यवहार पूर्ण करण्याची बाजाराकडून हमी. 
  • कायम व्यवसाय परवानगी, समभाग, समभाग डिरिव्हेटिव्ह, करन्सी डिरिव्हेटिव्ह, कमोडिटी आणि डेट व्यवहार करण्यास परवानगी. 
  • स्वतःचे शेअर्स राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदवलेला भारतातील एकमेव शेअरबाजार. 
  • 30 शेअरवर आधारित असलेला सेन्सेक्स हा प्रसिद्ध निर्देशांक.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

2. राष्ट्रीय शेअरबाजार (National Stock Exchange ltd): 

  • स्थापना 1992, व्यवसाय सुरुवात 1994 
  • सुरुवातीपासून पूर्णपणे पेपरलेस आणि कॅशलेस व्यवहार, 
  • जागतिक क्रमवारीत 10 वा मोठा बाजार, 
  • 1950  हून अधिक नोंदणीकृत कंपन्या, 
  • वेळ आणि व्यवहार करण्याचे विभाग, 
  • परवाना, मुंबई शेअरबाजाराप्रमाणे, 25 लाख रुपयांच्या व्यवहाराची बाजारहमी. 
  • 50 शेअरवर आधारित निफ्टी हा प्रसिद्ध निर्देशांक.

3. कोलकाता शेअर बाजार (Calcutta Stock Exchange ltd ): 

  • दक्षिण आशियातील दुसरा सर्वात जुना बाजार, स्थापना सन 1908, 
  • आजीवन व्यवसाय परवाना, 
  • 2700 नोंदणीकृत कंपन्या, 
  • सन 2014 पासून सर्व व्यवहार स्थगित, प्रकरण न्यायप्रविष्ट. 
  • 40 शेअरवर  आधारित सीएससी 40 हा निर्देशांक.

भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअर बाजार – इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX)

4. इंडिया आयएनएस (India INX ltd) : 

  • मुंबई शेअरबाजाराच्या पुढाकाराने स्थापन झालेला भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार, 
  • 9 जानेवारी 2017 पासून व्यवसायास सुरुवात, 
  • दिवसातील 22 तास कामकाज चालू, 
  • परवाना 28 डिसेंबर 2020 पर्यंत. 
  • इक्विटी, करन्सी, कमोडिटी यांच्या डिरिव्हेटिवचे व्यवहार आणि डेट व्यवहारास परवानगी. 

5. एनएससी आयएफएससी एक्सचेंज (NSE IFSC Ltd) : 

  • राष्ट्रीय शेअरबाजाराच्या पुढाकाराने सुरू झालेला दुसरा आंतरराष्ट्रीय शेअरबाजार, 
  • दिवसातील तास चालू परवाना 21  मे 2021 पर्यंत इंडिया आयएनएक्स प्रमाणे सर्व व्यवहारास परवानगी.

6. मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज (Metropolitan Stock Exchange ltd) :

  • सन 2008 पासून व्यवहारास सुरुवात, 
  • मुंबई शेअरबाजार राष्ट्रीय शेअरबाजार सारखेच एक्सचेंज, 
  • 15 सप्टेंबर 2020 पर्यंत परवाना, 
  • कमोडिटी वगळता सर्व व्यवहारास परवानगी. 
  • एसएक्स 40 हा निर्देशांक, 
  • व्यवहार प्रमाण अल्प.

गुंतवणूक विशेष – शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

7. एमसीएक्स (MCX ltd) : 

  • स्थापना सन 2003, 
  • कमोडिटी डिरिव्हेटिवचे व्यवहार करता येणारे नोंदणीकृत एक्सचेंज, 
  • 90% कमोडिटी व्यवहार होणारा सर्वात मोठा वस्तुबाजार व्यवसायाचा कायम परवाना आहे. 

8. एनसिडीएक्स (NCDEX ltd) : 

  • स्थापना सन 2003, 
  • हे सुद्धा कमोडिटी एक्सचेंज असून त्यातील डिरिव्हेटिवचे व्यवहार होतात. 
  • कृषी उत्पादनातील व्यवहार प्रामुख्याने येथे होतात.
  • कायम व्यवसाय परवाना आहे.

9. आयसीइएक्स (ICEX ltd): 

  • स्थापना सन 2017,  
  • हे कमोडिटी एक्सचेंज असून त्यातील डिरिव्हेटिवचे व्यवहार तेथे होतात. 
  • कायम परवाना आहे. 
  • इतर कमोडिटी बरोबर हिऱ्याचे डिरिव्हेटिव व्यवहार या एक्सचेंजवर होतात, हे याचे प्रमुख वैशिष्ट.

– उदय पिंगळे

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…