हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळणारे करलाभ

Reading Time: 4 minutesहिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले. पुढे सन १९६१ मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वताचे आणि ‘एचयुएफ’चे (HUF) असे वेगवेगळे विवरणपत्र (ITR) भरावे लागते.

काय आहे निवृत्तीनियोजनाचे गणित?

Reading Time: 4 minutesसध्या तरुणांमध्ये लवकर रिटायर होण्याचं एक स्वप्न फॅशन किंवा फॅड सारखं दिसून यायला लागलंय. वयाच्या ४५-५० वयापर्यंत उत्पन्न, जबाबदाऱ्या वगैरे विवंचनेतून बाहेर पडून पुढचं ‘लाईफ एन्जॉय’ करायचं. मात्र हे व्यवहारात उतरवण्यात एक मोठी समस्या असते. लवकर रिटायरमेंटमुळे एकीकडे कमाईची आणि गुंतवणुकीची वर्षे कमी होतात, तर दुसरीकडे साठवलेली पुंजी जास्त वर्षे पुरवावी लागते. म्हणजेच ४५व्या वर्षी रिटायरमेंट घेणाऱ्याला निधी जमा करायला वीसच वर्षे मिळतात आणि ती पुंजी वयाच्या नव्वदीपर्यंत म्हणजे पुढील ४५ वर्षे पुरवणे गरजेचे ठरते. अर्थातच त्यासाठी कमाईच्या वर्षात बचत किंवा गुंतवणुकींसाठी उत्पन्नाचा फार मोठा भाग बाजूला काढावा लागतो. हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही.

श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’

Reading Time: 3 minutesआर्थिक निर्णय म्हणजे फक्त गुंतवणूक हा समज सर्वात अगोदर दूर करा. खर्च करणे हा सुद्धा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता माहित असलीच पाहिजे. ते न बघता जाहिरातींच्या प्रभावामुळे सामान्य माणसाचं चित्त विचलीत होते आणि गरज नसलेले आर्थिक निर्णय घेतले जातात. 

फॉर्म 15H/15G वेळीच भरण्याचे फायदे

Reading Time: 3 minutesआपणा सर्वांना वार्षिक उत्पन्नावर लागू असलेले कर माहिती आहेतच. याच वार्षिक उत्पन्नात मोडते FD वर कमावलेले व्याज आणि या व्याजावर कापला जाणारा टॅक्स वाचवण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे 15/H.या अंतर्गत तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला बँकेकडे एक ‘स्वयं घोषणा पत्र’ (Declaration) जमा करावं लागतं. त्यात असे नमूद केले जाते की, तुमचे वार्षिक उत्पन्न कर्मर्यादेच्या आत असून कर कपातीपासून सुट मिळावी. प्रत्येक बँकेचा आपला एक विशिष्ठ फॉर्म असून तो त्यांच्या शाखेत अथवा वेबसाईट वर सहज उपलब्ध होऊ शकतो.

श्रीमंतीची ‘वही’वाट

Reading Time: 3 minutesआता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.

आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutesबचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

Reading Time: 3 minutesबहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (Phobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात.