जीडीपीत वाढ म्हणजेच विकास, ही फसवणूकच!

Reading Time: 4 minutes जीडीपीची वाढ हाच विकास असे मानणारा आणि मानवी आनंदाकडे दुर्लक्ष करणारा पाश्चात्य…

Reading Time: 2 minutes

सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. 

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

१. जीडीपी २०१७ ( Gross Domestic Product- 2017)-

भारत :  २.६ लाख कोटी  डॉलर्स  

पाकिस्तान : ३०४९५.१८  कोटी डॉलर्स 

सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर, पाकिस्तानची अर्थव्यवस्था १५४ व्या क्रमांकावर आहे. आकड्यांमधली तफावत बघता पाकिस्तानने भारताशी बरोबरी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. भारताचा दरडोई जीडीपी (Per Capita GDP) १९३९.६१ डॉलर असून पाकिस्तानचा १७४५.८५ डॉलर आहे. 

२. परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) –

भारत: ४५४४७० मिलियन डॉलर

पाकिस्तान: ११४८९मिलियन डॉलर 

परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे (RBI) जमा असलेले परकीय चलन. परकीय चलन परकीय चलन साठा परकीय कर्ज परतफेड करण्याची देशाची क्षमता दर्शवते. सर्वात जास्त परकीय चलन साठा असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा ७ व्या तर, पाकिस्तान यामध्ये ७३ व्या क्रमांकावर आहे. 

३. परदेशी कर्ज (Foreign debt) –

भारत: ५२९.७ अब्ज डॉलर्स

पाकिस्तान: रु. २९.८६१ ट्रिलिअन 

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कर्जामुळे नखशिखान्त कर्जात बुडालेला पाकिस्तान, डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरवायला सक्षम आहे असं वाटत नाही. कमी फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह असणारा पाकिस्तान दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असंच चित्र सध्या दिसत आहे.

४. दरडोई उत्पन्न २०१८ (Per Capita Income 2018)-

भारत: रु. १,१२,८३५ प्रतिवर्ष

पाकिस्तान: रु. १,८०,२०४ प्रतिवर्ष

दरडोई उत्पन्नाच्या पाकिस्तान आघाडीवर असले तरी, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ही तफावत फार काही मोठी नाही. 

५. विकास दर २०१९ (Growth Rate 2019)

भारत: ५.८% 

पाकिस्तान: ५.७% 

भारत सध्या विकसनशील देश असला, तरी भारताची अर्थव्यवस्था आणि विकास दर पाहता भारत लवकरच विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. तर, दुसरीकडे पाकिस्तानला मात्र परदेशी कर्ज, एफडीआय व फॉरेन रिझर्वचा अभाव व त्या प्रमाणात असलेल्या कमी विकास दरामुळे यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यातही कर्जबाजारीपणाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minute जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल…

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutes इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५…

‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती! 

Reading Time: 4 minutes आर्थिक समावेशकता वाढण्यासाठी बँकिंगची अपरिहार्यता कोणीही अमान्य करू शकत नाही. ते बँकिंग…

अमित शहा, राहुल गांधी आणि  अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य !

Reading Time: 3 minutes भांडवली बाजारावर आधारित अर्थकारण जगाने स्वीकारले आणि ते भारतालाही स्वीकारावे लागले. पारदर्शी…