अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minute

जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते.

रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

१. अर्थसंकल्प (Budget) :

आगामी वर्षासाठी राबविण्यात येणारे अर्थविषयक धोरण, त्याची कारणे, अपेक्षा यासंदर्भात शासनाने तयार केलेले अंदाजपत्रक.

२. सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross Domestic Product) :

सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपी (GDP) कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पादन (Production), राष्ट्रीय उत्पन्न (Income) किंवा राष्ट्रीय खर्च (Expenditure) यावरून ठरवता येतो.

३. राष्ट्रीय उत्पन्न (National Income): 

एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रात निर्माण झालेल्या वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनाचे, घसारा वजा करता, राष्ट्रीय चलनाच्या परिमाणात मोजले जाणारे मूल्य. 

४. दरडोई उत्पन्न (Per capita Income): 

राष्ट्रीय उत्पन्नाला राष्ट्राच्या लोकसंख्येने भागले असता येणारी सरासरी म्हणजे दरडोई उत्पन्न. 

५. कर: 

कर म्हणजे सेवा पुरवल्याबद्दल शासनाला देण्याचा मोबदला. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय . कर दोन प्रकारचे असतात – अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर.

६. प्रत्यक्ष कर (Direct taxes): 

करदात्यावर प्रत्यक्षपणे ज्या करांचा भार पडतो असे कर. अशा करांचा भार त्या व्यक्तीला दुसऱ्‍या व्यक्तीवर ढकलता येत नाही. उदा., आयकर.

७. अप्रत्यक्ष कर (Indirect taxes): 

ज्या करांच्या बाबतीत करदात्याला संबंधित कर स्वतः न भरता त्याचा भार दुसऱ्यावर ढकलणे शक्य असते, अशा प्रकारच्या करांना अप्रत्यक्ष कर म्हणतात. उदा. जीएसटी (GST). 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Leave a Reply

Your email address will not be published.