म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutes सरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.  

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

Reading Time: 3 minutes गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

सेकंड होम की म्युच्युअल फंडचा ई-फ्लॅट?

Reading Time: 3 minutes ढोबळमानाने तुम्हाला तुमच्या रियल इस्टेट फ्लॅटमधून वार्षिक उत्पन्न जर ३% पेक्षा कमी येत असेल तर, ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर नाही. तसेच, समजा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या गुंतवणूकीमधील रक्कम ठराविक अथवा आंशिक हवी असेल तर ते मात्र शक्य नसते. म्युच्युअल फंडाच्या ‘ई- फ्लॅट’मधील रक्कम तुम्ही अंशतः देखील काढू शकता, हा फरक आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

Reading Time: 3 minutes आपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का? अजिबात नाही! यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयाच्या २५ व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीलासुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं? उत्तर आहे – तब्बल १२८ पट! यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).

सोन्यात गुंतवणूक – किती आणि कशी?

Reading Time: 3 minutes आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या परताव्यात सोने स्थैर्य देऊ शकते. तसेच कमालीच्या अस्थैर्याची परिस्थिती निर्माण झाली – युद्ध, आर्थिक मंदी, सरकारी दिवाळखोरी किंवा तत्सम – तर अशा काळात इतर कुठल्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा सोन्यात जास्त परतावा मिळेल. त्यादृष्टीने आपल्या संपूर्ण गुंतवणुकीतील ५-१०% भाग हा सोन्यात असायला हरकत नाही. मात्र त्यापेक्षा जास्त भाग आपल्या आर्थिक नियोजनाला हानिकारकच ठरत असतो.

रिअल ईस्टेट वि.  शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड

Reading Time: 3 minutes भारतीय रिझर्व बँकेच्या २०१७ सालातील एका अहवालानुसार आपल्या देशातील सर्व व्यक्तींकडील वैयक्तिक संपत्तीचा ७६.९% भाग – म्हणजे तीन चतुर्थांशपेक्षा अधिक – हा रिअल इस्टेटमधे गुंतवलेला आहे. त्या खालोखाल ११% सोन्यातील गुंतवणूक आहे आणि अवघी ५% संपत्ती बँकेत किंवा निवृत्तीनिर्वाह निधीत आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चाकोरीबद्ध गुंतवणुकीच्या सवयींचा हा परिपोष आहे.इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की स्वतःच्या राहण्यासाठी घेतलेले घर हे वापरण्याच्या (Consumption) दृष्टीने घेतलेले असल्यामुळे तिला आपण ‘शुद्ध आर्थिक गुंतवणूक’ मानत नाही. राहण्यासाठी स्वतःचे घर असावे ही बहुतेकांची भावनिक गरज असते, तसेच कौटुंबिक स्वास्थ्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते. त्यामुळे असे आपण राहते घर आणि इतर आर्थिक गुंतवणुकी यांची तुलना करू शकत नाही. या लेखांमधील विचार आर्थिक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या रिअल इस्टेट किंवा घरांसाठी आहेत.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutes मागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.