बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesडिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesबँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात. 

बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता

Reading Time: 3 minutes‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. 

बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय 

Reading Time: 4 minutesपीएमसी बँकेसारख्या मोठया सहकारी बँकेवर भारतीय रिजर्व बँकेने अचानकपणे निर्बंध आणल्याने आणि त्यानंतर उडालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे, त्याचप्रमाणे यासंबंधी नियामकांनी महिनाभरात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाने देशातील सर्वच बँक ठेवीदार आज संभ्रमात आहेत. यातच देशातील मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ‘डीआयजिसी’च्या नियमानुसार आपल्या बँकेतील ठेवी १ लाख रुपयांपर्यंत सुरक्षित असल्याचा शिक्का बचत खात्याच्या पासबुकावर मारून दिल्याचे चित्र समाज माध्यमात सर्वत्र प्रसारित झाल्याने, विविध बँकेत आपल्या ठेवी ठेवलेले ग्राहक, आता नक्की काय करावे? ज्यामुळे आपण निश्चित राहू शकू याचा शोध घेत आहेत. तेव्हा उपलब्ध पर्यायांचा शोध आणि बोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?

Reading Time: 4 minutesमाहिती अधिकाराचा प्रसार प्रचार करणारे श्री गिरीश मित्तल यांनी अलीकडेच एका बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतू “TransUnion CIBIL ltd” या कंपनीने त्यांचे  मूल्यांकन ६६२ म्हणजेच विश्वासार्ह नाही, असा अहवाल दिल्याने, ते खराब असल्याचे कारण देऊन क्रेडिट कार्ड देण्यास नकार दिला. नियमितपणे २५ वर्षे काटेकोरपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस हा मोठा धक्का होता.

Bank Rules: बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesअनेकदा बऱ्याच अधिकाऱ्यांना आपल्याच बँकेचे नियम नक्की काय आहेत ते माहीत नसते आणि आपल्या हेकेखोर स्वभावामुळे ‘मी म्हणतो तोच नियम’ यावर ते अडून बसतात आणि आपण म्हणतो तसेच झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे ग्राहकाचे आणि ग्राहक नाराज झाल्याने, अप्रत्यक्षपणे बँकेचेही नुकसान होण्याची शक्यता असते.

टॉप-अप कर्ज का घ्यावे?

Reading Time: 3 minutesबँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही. 

भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)

Reading Time: 3 minutesविशिष्ट मर्यादेबाहेर अनुत्पादक मालमत्ता वाढल्यास बँक आणि पर्यायाने बँकेचे ठेवीदार अडचणीत येतात. सर्व बँकांची शिखर बँक म्हणून  त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय रिझर्व बँकेने एखादी मालमत्ता अनुत्पादित कधी होते आणि त्यासाठी कोणत्या तरतुदी कराव्यात यासबंधीत निश्चित असे धोरण ठरवले असून त्याप्रमाणे बँकांना कार्यवाही करावी लागते.