म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)

Reading Time: 2 minutes‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदराच्या आजच्या अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या फॅक्टशीट” विषयी. फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात. यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभागबाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो. जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १९

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी.  चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो.  तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर ने कसा परतावा दिला आहे ते पाहतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड.  ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)! ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

Reading Time: 2 minutesनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या भांडवल वृद्धी (Growth option) व लाभांश (Dividend Option)” बद्दल.  म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन पर्याय असतात, भांडवल वृद्धी (Growth Option ) आणि लाभांश ( Dividend Option ). 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

Reading Time: < 1 minuteनमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘एसडब्लूपी’बद्दल. “एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन”. ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एकगठ्ठा रक्कम गुंतवलेली आहे, असे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार आपल्याला महिन्याला किंवा तिमाहीला लागणाऱ्या रकमेची ‘एसडब्लूपी’चा विनंती अर्ज म्युच्युअल फंडाकडे देऊ शकतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

Reading Time: 2 minutesजेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

Reading Time: 2 minutesएसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे.