म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

Reading Time: 2 minutes

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात –  भाग १६

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन योजना श्रेणी- ‘इक्विटी’ (Equity)!

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १४

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५

  • ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच समभाग संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. 

  • ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकाच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे इन्वेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपा होईल.

  • हा फरक साधारण एप्रिल- मे २०१८ नंतर दिसून आला. इक्विटी फंडासाठी सेबीने शेअर मार्केट मधील कंपन्यांचे गट बनवले आहेत. 

  • पहिल्या १०० मोठ्या कंपन्या (Large Cap) कंपन्या आहेत.  १०१ ते २५० मोठ्या कंपन्या (Mid Cap) कंपन्या आहेत व त्यापुढील सर्व कंपन्या स्मॉल कॅप (Small Cap) कंपन्या आहेत. 

  • या वर्गीकरणाप्रमाणे म्युच्युअल फंडाला आपल्या योजना चालवाव्या लागणार आहेत. लार्ज कॅप कंपन्या कमी अस्थिर असतात, तर स्मॉल कॅप कंपन्या जास्त अस्थिर असतात. हे लक्षात ठेवून आपण आपल्या जोखीम घेणाच्या क्षमतेनुसार आपल्यासाठी योग्य ती योजना निवडली पाहिजे. 

  • एक मल्टिकॅप फंड असेल, जिथे फंड मॅनेजर किमान ६५% गुंतवणूक कोणत्याही इक्विटी शेअर मध्ये करू शकेल. लार्ज कॅप फंडात फंड मॅनेजरने किमान ८०% गुंतवणूक फक्त लार्ज कॅप कंपनीमध्ये करणं आवश्यक आहे. 

  • एक लार्ज व मिडकॅप असा एकत्र फंड असेल जिथे फंड मॅनेजरला दोन्ही प्रकारच्या फंडामध्ये किमान ३५-३५% गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्यानंतर एक मिडकॅप फंड असेल, तसेच स्मॉल कॅप फंड असेल दोन्ही फंडामध्ये फंड मॅनेजरला किमान ६५% त्या प्रकारच्या विशिष्ट शेअरमध्ये गुंतवणूक करावी लागेल. 

  • एक डिव्हीडंड फंड असेल जिथे किमान गुंतवणूक नियमित लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये असेल. व्हॅलू फंड किंवा कॉन्ट्रा फंड ही एक गुंतवणूक शैली आहे. अशा प्रकारच्या फंड मध्ये किमान ६५% शेअर्स हे त्या गुंतवणूक शैलीशी जुळणारे असायला हवेत. 

  • फोकस्ड फंड मध्ये फंड मॅनेजरला जास्तीत जास्त ३० शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल, इक्विटी फंड जर सेक्टरशी संबंधित असेल किंवा कोणत्या थिमशी संबंधित असेल, तर फंड मॅनेजरला किमान ८०% गुंतवणूक ही त्या सेक्टरमध्ये किंवा थिममध्ये करणं आवश्यक आहे. 

  • शेवटचा इक्विटी फंड म्हणजे ‘इएलएसएस’ किंवा (टॅक्स स्विंग स्चेमे) यात किमान ८०% गुंतवणूक ही कोणत्याही प्रकारच्या शेयर्स मध्ये असेल व यात ३ वर्षाचा लॉक इन म्हणजेच ३ वर्ष रक्कम काढता येणार नाही. 

असे हे फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या मुदतीनुसार आपण निवडू शकतो. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

–निलेश तावडे 

9324543832 

nilesh0630@gmail.com

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 3 Average: 3.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.