Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutes कोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

Reading Time: 2 minutes आजची कथा आहे, शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची… गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या. मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले

श्रीमंत मी होणार!

Reading Time: 4 minutes गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

Reading Time: 2 minutes चायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.

“एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”च्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

Reading Time: 3 minutes “जुने घर विकताना आता स्टॅम्प ड्युटी लागू होणार नाही. एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”  अशा हेडलाईन दिसल्यावर त्यामध्ये लिहिलेली बातमी व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ समजून न घेता अनेकांनी, “जुन्या घराची विक्री स्टॅम्प ड्युटी फ्री करता येणार” असा गैरसमज करून घेतला. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे.