हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची

Reading Time: 2 minutesसर्व सामान्य मराठी गुंतवणूकदार नेहमीच अतिशय कमी जोखीम घेणारे असतात. पारंपरिक बँकेचे एफडी, पोस्टाच्या योजना किंवा सोने यामध्येच गुंतवणूक करतात. हे पर्याय जरी खूप आश्वस्त वाटत असले तरी या पर्यायातून मिळणार परतावा हा महागाई वर मात करत नाही आणि त्यामुळे दीर्घावधी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा होत नाही. त्याचबरोबर येणाऱ्या ७-८ वर्षात आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल. पुढील काही वर्षात व्याज दर हे आणखी खाली खाली जातील. 

इक्विटी मार्केट पडझड – हा काळही सरेल

Reading Time: 3 minutesजेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा बरेच लोक हे विसरून जातात की शेअर बाजारात मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने, काही वेळा वर्षे  गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे, तर वर नफाही करून देते. ‘गुंतवणूक’ हे मानवी मनातील भविष्याविषयी वाटणाऱ्या ‘आशा’ आणि ‘अनिश्चितता’ या दोन भावनांमधील द्वंद्व आहे

सोने खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesदसरा- दिवाळी म्हटली की आपल्या मराठी बांधवांची सोने खरेदीची धावपळ चालू होते. बरेच जण सोनाराकडे जाऊन सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने खरेदी करीत असतात. या सणासुदीला सोने खरेदीदार थोडे द्विधा मनस्थितीत दिसतायेत. कारण गेल्या ६-८ महिन्यात सोन्याचे भाव २०% पेक्षा जास्त दराने वाढले आहेत. नवीन सोने आता खरेदी करावे का की थोडे थांबून सोन्याचे भाव खाली येतात का पाहावे, असा विचार करताना सोने खरेदीचा निर्णय करणं अवघड जात आहे. 

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

वॉरेन बफेट यांचे यशस्वी गुंतवणुकीचे सूत्र

Reading Time: 3 minutesशेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने ‘ओरॅकल ऑफ ओमाहा‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेननी नुकताच ३० ऑगस्ट २०१९ रोजी आपला ८९व्वा वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूक प्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला. अशा या जगद्विख्यात, सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे विचार या लेखात समजून घेऊ.

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutesया लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.  मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

चलती का नाम … गुंतवणूक!

Reading Time: 4 minutesबाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहे. आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान सहान ओरखडे हे पडणारच असतात. त्यापायी आपले लक्ष विचलित होऊ देण्यापेक्षा ज्या गोष्टींवर आपला पूर्ण ताबा आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, तिथं चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे. याच उदाहरणाचा आपण थोडा खोलात जाऊन विचार केला, तर असं लक्षात येईल की ड्रायव्हिंगचा अनुभव आपल्याला गुंतवणुकीविषयक योग्य दृष्टिकोन तयार करण्यास मदत करू शकतो. 

गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय: एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड

Reading Time: 2 minutesप्रगत देशांमध्ये साधारण ७०-८० % गुंतवणूक शेअर बाजार, कर्जरोखे, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड मध्ये होते, अमेरिकेत १२०० पेक्षा अधिक प्रकारचे एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड आहेत. आपल्याकडे गुंतवणुकीच्या साधनांची मूलभूत अर्थसाक्षरता नसल्याने बहुतेक गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात.

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutesशेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutesम्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.