Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……

Reading Time: 3 minutes पानिपतचा लढा मराठयांच्या शौर्याने व पराक्रमाने इतिहासात अजरामर असला, तरी तो एक शोकांतिका म्हणून मनात कायमच सलत राहतो. तीच अवस्था आर्थिक शिस्तीचा गुंतवणूकदार जेव्हा वित्तीय ध्येय विसरून परताव्याच्या वाटेने जातो, तेव्हा त्याच्या अर्थनिरक्षरतेची किव येते. 

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutes महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes “अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

Reading Time: 2 minutes आजची कथा आहे, शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची… गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या. मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले