आर्थिक नियोजन – भाग २

Reading Time: 3 minutesशनिवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्पाची सोप्या शब्दातील व्याख्या करताना सरकारला मिळणारा कररूपी महसूल म्हणजे उत्पन्नातून भविष्यकालीन होऊ घातलेल्या खर्चाचा आराखडा. येणारा रुपया व जाणारा रुपया यांचा ताळेबंद म्हणजेच “अर्थसंकल्प” होय. बहुतेकवेळा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च मोठे असल्यामुळे वित्तीय तूट वाढते. परिणामी सरकारला कर्जे उचलून खर्चांची पूर्तता करावी लागते.

गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

Reading Time: 3 minutesकाल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutesसरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.  

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutesशेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

सेकंड होम की म्युच्युअल फंडचा ई-फ्लॅट?

Reading Time: 3 minutesढोबळमानाने तुम्हाला तुमच्या रियल इस्टेट फ्लॅटमधून वार्षिक उत्पन्न जर ३% पेक्षा कमी येत असेल तर, ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर नाही. तसेच, समजा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या गुंतवणूकीमधील रक्कम ठराविक अथवा आंशिक हवी असेल तर ते मात्र शक्य नसते. म्युच्युअल फंडाच्या ‘ई- फ्लॅट’मधील रक्कम तुम्ही अंशतः देखील काढू शकता, हा फरक आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

Reading Time: 3 minutesआपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का? अजिबात नाही! यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयाच्या २५ व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीलासुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं? उत्तर आहे – तब्बल १२८ पट! यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutesजूनमध्ये एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर (ITR) फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते. आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल.