‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutes

आयुष्यात नेहमी ‘पहिल्या’ या शब्दाचं खूप अप्रूप वाटत असतं. मग तो शाळेतला पहिला नंबर असो वा नोकरीचा पहिला दिवस. प्रत्येक वेळी ‘पहिला’ या शब्दाला खूप महत्व असत. कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच करत असताना आपण जेवढे  आनंदी असतो, तेवढेच काहीसे गोंधळलेलेही असतो. जसा जूनचा  पहिला पाऊस- आनंदही देतो आणि तारांबळही उडवतो, तसंच! पण या पहिल्या पावसाच्या आनंदावर विरजण घालायला तत्पर असतो तो आयटीआर (ITR), अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे.

एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते.

आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल.

आयटीआर (ITR) म्हणजे काय? 

आयटीआर (ITR) म्हणजेच आपलं आयकर विवरण पत्रक. हे फाईल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असते. आयटीआर नेहमी आर्थिक वर्ष म्हणजेच ‘१ एप्रिल ते ३१ मार्च’ या कालावधीसाठीच भरला जातो.

आयटीआर कसा भरायचा?

सदर फॉर्म ऑनलाईन भरता येतो. त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन लॉग-इन करावे लागते. त्यानंतर फॉर्म १६ डाउनलोड करावा लागतो. सदर फॉर्ममध्ये सगळी माहिती व्यवस्थित भरुन फॉर्म सबमिट करावा.

आयटीआर संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी:

इन्कम टॅक्स स्लॅब चार्ट : 

व्यक्ती (Individual) आणि हिंदू अविभाजीत संस्था (HUF)

(वय वर्ष ६० पेक्षा कमी)

उत्पन्न(Income)

टॅक्स 

हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस 

 रु. २,५०,०००/- पर्यंत

टॅक्स नाही(Nil)

रु.२,५०,००१/- ते रु.५,००,०००/-

५%

४%

रु. ५,००,००१/- ते रु. १०,००,०००

२०%

४%

रु.१०,००,००१/-  पेक्षा अधिक

३०%

४%

जेष्ठ नागरिक (Senior Citizens) – वय वर्ष ६० ते ८०

उत्पन्न(Income)

टॅक्स 

हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस 

रु. ३,००,०००/- पर्यंत

टॅक्स नाही(Nil)

रु.३,००,००१/- ते रु.५,००,०००/-

५%

४%

रु. ५,००,००१/- ते रु. १०,००,०००

२०%

४%

रु.१०,००,००१/-  पेक्षा अधिक

३०%

४%

जेष्ठ नागरिक (Super Senior Citizens) – वय वर्ष ८०+

उत्पन्न(Income)

टॅक्स 

हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेस 

रु.५,००,०००/- पर्यंत

टॅक्स नाही(Nil)

रु.५,००,०००/- ते रु.१०,००,०००/-

२०%

४%

रु.१०,००,०००/- पेक्षा अधिक

३०%

४%

 • सरचार्ज :    
  • एकूण उत्पन्न रु. ५० लाख ते रु. १ कोटी: १०%
  • एकूण उत्पन्न रु.१ कोटी पेक्षा जास्त : १५%

उत्पन्नाचे वर्गीकरण:

विविध स्त्रोतांद्वारे (मार्गांमधून) मिळणाऱ्या उत्पन्नाचे वर्गीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उत्पन्नाचे वर्गीकरण पुढील ५ प्रकारात केले जाते-

 1. पगार
 2. घरापासून मिळणारे उत्पन्न (Income from house property)
 3. व्यवसाय/ धंद्यामधून मिळणारे उत्पन्न(Income from business)
 4. भांडवली नफा (Capital gain)
 5. इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न.

वरील सर्व उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे.

फॉर्म १६ व १२ बीए (Form 16 & 12BA):

एम्प्लॉयरने कर्मचाऱ्याला अवांतर प्राप्ती, इतर पुरवठे आणि पगाराशिवाय इतर फायदे पुरवले असल्यास त्याची माहिती फॉर्म १२ बीए मध्ये भरुन देणे आवश्यक आहे.

फॉर्म २६ एएस (Form 26AS):

तुम्ही भरलेल्या टॅक्सची आणि तुमच्या टॅक्समधून डिडक्ट(कपात) केलेल्या टॅक्स संदर्भातील संपूर्ण माहिती असणारे हे एक दस्तऐवज (डॉक्युमेंट) आहे. सदर फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन डाउनलोड करता येतो. आयटीआर फाईल करताना हा फॉर्म विचारात घेणे खूप आवश्यक आहे. यामध्ये टीडीएस (TDS) कपातीपासून टॅक्स रिफंड, ॲडव्हान्स टॅक्सपर्यंतची सगळी माहिती उपलब्ध असते.

गुंतवणूकीवरील वजावटींच्या सवलती:

 •  गृहकर्जाचा हप्ता (Interest on housing loan) रु. २,००,०००/- पर्यंतच्या व्याजावर कर-सवलत मिळते.
 • पीपीएफ (PPF), एनएससी (NSC), युलिप (ULIPS),  ईएलएसएस (ELSS) यावरील गुंतवणुकीवर रु. १,५०,०००/- पर्यंत कर-सवलत मिळते.

वरील सर्व माहिती तुम्ही एम्प्लॉयरला देणे गरजेचे आहे. फॉर्म १६ भरताना ईपीएफ (EPF) सोबतच वरील गुंतवणूकींची माहिती भरणेही आवश्यक आहे.

. आयटीआर फॉर्म्स 

 • आयटीआर १ (ITR 1):  हा फॉर्म पगार घेणाऱ्या स्वतंत्र व्यक्तीला ( Individual salaried) लागू होतो.
 • आयटीआर २ (ITR 2): हा फॉर्म HUF किंवा स्वतंत्र व्यक्ती ज्यांचा व्यवसाय किंवा उद्योग नसणाऱ्यांना लागू होतो.
 • आयटीआर २ए (ITR 2A): हा फॉर्म HUF किंवा स्वतंत्र व्यक्ती ज्यांची एकापेक्षा जास्त प्रॉपर्टी (House property) आहे, परंतू ज्यांचा व्यवसाय किंवा उद्योग नाही, किंवा कुठलाही भांडवली नफा(Capital gain) अथवा परदेशी गुंतवणूक नाही अश्या व्यक्तींना लागू होतो.

. आयटीआर V (ITR V): 

 • आयटीआर V (ITR V) यामधील ‘V’चा अर्थ व्हेरीफिकेशन म्हणजेच पडताळणी. सदर फॉर्म रिटर्न्स फाईल केल्यापासून १२० दिवसांच्या आत इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे पाठवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास तुमचे ई रिटर्न अपात्र (invalid) ठरतील व नव्याने रिटर्न फाईल करावे लागतील.
 • सदर फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरुन डाउनलोड करुन व्यवस्थित भरुन त्याची प्रिंट काढून त्यावर सही करुन पोस्टाने अथवा स्पीड-पोस्टने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवून द्यावा लागतो.
 • ‘आयटीआर’च्या इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशनसाठी इंटरनेट बॅंकिंग, आधारकार्ड, इ. अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
 • आयकर कायदा १९६१  नुसार ज्यांचं वार्षिक उत्पन्न रु.५,००,०००/- पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींनी ई-रिटर्न फाईल करणे बंधनकारक आहे. डिजिटल सही (DSC) नसेल तर ITR V फॉर्म भरून त्याची प्रिंट काढू,  इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे पाठवणे बंधनकारक आहे.

आयटीआर (ITR) संदर्भातील विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी  http://bit.ly/ITR_FY2018_19  या लिंकवर क्लिक करा. 

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे १० फायदे,

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे,

आयकर रिटर्न भरण्यासाठीची महत्त्वाची १० कागदपत्रे

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

One thought on “‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

 1. कृपया आय टी आर २ हा आय टी आर १ प्रमाणेच pdf मध्ये भरता यावा अशी मागणी आयकर खात्याकडे करावी जेणे करून केवळ कॅपिटल गेन लॉस रिपोर्ट करण्या पायी सी ए कडे जाऊन १००/५०० खर्च होतात कारण सरकारी नियमानुसार २५० रू मध्ये सेवा देणारे टी आर पी टॅक्स रिटर्न preparator कुठेच मिळत नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!