Browsing Tag
TDS
10 posts
१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?
Reading Time: 2 minutesबँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे बदल याच म्हणजेच सप्टेंबर २०१९ पासून लागू करण्यात आले आहेत.
पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल
Reading Time: 2 minutesप्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.
पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या
Reading Time: 3 minutesआपल्या मालकाकडून आपणास फॉर्म नंबर १६ मिळाला असेल. यात आपणास मालकाकडून मिळालेले उत्पन्न यातून आपण जाहीर केलेल्या आणि कायद्यानुसार मिळत असलेल्या विविध वजावटींचा विचार करून आपले करपात्र उत्पन्न व कापलेला कर याची तपशीलवार माहिती असते. आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (gross income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप
शेअरबाजार – गावा अर्थसंकल्प आला….
Reading Time: 3 minutesमध्यम व लघु आकाराच्या कंपन्यांवरील कर कमी केल्याचा फायदा म्युच्युअल फंडसच्या स्माल किंवा मिडकॅप (Small / Midcap) योजनांना होण्याची शक्यता आहे. CPSE, Govt. ETF यांचा अंतर्भाव करबचतीकरिता पात्र योजनांमध्ये केल्याने अशा योजनांकरिता पात्र समभागांच्या भावांमध्येही याचे सकारात्मक प्रतिबिंब दिसु शकेल.
फॉर्म 15H/15G वेळीच भरण्याचे फायदे
Reading Time: 3 minutesआपणा सर्वांना वार्षिक उत्पन्नावर लागू असलेले कर माहिती आहेतच. याच वार्षिक उत्पन्नात मोडते FD वर कमावलेले व्याज आणि या व्याजावर कापला जाणारा टॅक्स वाचवण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे 15/H.या अंतर्गत तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला बँकेकडे एक ‘स्वयं घोषणा पत्र’ (Declaration) जमा करावं लागतं. त्यात असे नमूद केले जाते की, तुमचे वार्षिक उत्पन्न कर्मर्यादेच्या आत असून कर कपातीपासून सुट मिळावी. प्रत्येक बँकेचा आपला एक विशिष्ठ फॉर्म असून तो त्यांच्या शाखेत अथवा वेबसाईट वर सहज उपलब्ध होऊ शकतो.
TDS: टीडीएस प्रणाली आणि बँक ठेवींवरील व्याजाचं गणित
Reading Time: 3 minutesबँक किंवा कोणतीही संस्था/ कंपनी/ कारखाना/ कार्यालय/ रुग्णालय/दुकान अशा उत्पन्न देणाऱ्या घटकाला TDS प्रणालीनुसार ठरलेल्या प्रकारे कर कापून घेणे आणि तो आयकर खात्यात जमा करणे पूर्णपणे बंधनकारक आहे. उत्पन्न किती दिले, त्या व्यक्ती/ संस्थेचा पॅन कार्ड वगैरे सर्व तपशील, कर किती कापून घेतला? अशा सर्व तपाशीलांची नोंद नियमितपणे ठेवावी लागते. ते सर्व तपशील देऊन तो नियमाप्रमाणे असलेला कर आयकर खात्याकडे जमा करायचा असतो. ते न केल्यास दंड आकाराला जातो.
TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?
Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो. या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.