पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

Reading Time: 2 minutes

प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते.

 २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे. परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.  

पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल:

१. आधार- पॅन जोडणी (Aadhar- PAN Linking):

  • आयकर कायदा कलम १३९एए (२) नुसार पॅन कार्ड जारी केल्यानंतर जर ते पॅन कार्ड आधार नंबरला जोडले गेले नाही तर संबंधित पॅन कार्ड “अवैध (invalid)” ठरवण्यात येईल. त्यांनंतरही ते पॅन कार्ड आधार क्रमांकाशी न जोडल्यास ते “निष्क्रिय (inoperative)” करण्यात येईल. पॅन- आधार जोडणीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे. 
  • नवीन अर्थसंकल्पामध्ये पॅन- आधार जोडणीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे तशीच ठेवण्यात आली असून, १ सप्टेंबर २०१९ पासून  या नियामामधील “अवैध” शब्द बदलून त्याजागी “निष्क्रिय (inoperative)” शब्द वापरण्यात यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

२. या व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक:

  • ज्यांचे उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्या व्यक्ती आयटीआर भरतात किंवा ज्यांच्या व्यवसायाची उलाढाल पाच लाखांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींसाठी पॅन बंधनकारक आहे.
  • बर्‍याच प्रकरणांमध्ये परकीय चलन खरेदी करणे किंवा बँकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे काढणे यासारख्या उच्च किंमतीचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींकडे पॅन नसतो. म्हणूनच, अशा व्यवहाराचे ऑडिट ट्रेल ठेवण्यासाठी आणि करप्रणाली भक्कम करण्यासाठी  २०१९ च्या अर्थसंकल्पामध्ये कलम १३९ए (१) मध्ये नवीन नियम (vii) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे असे व्यवहार करणाऱ्या अथवा ज्यांना असे व्यवहार भविष्यात करावे लागतील अशांनी पॅन कार्डसाठी अर्ज करावा.

३. आयकर विवरणपत्र (आयटीआर), पॅन व आधार कार्ड:

  • आयकर विवरणपत्र अर्थात आयटीआर दाखल करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. परंतु ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल अशा व्यक्ती त्यांचे आधार कार्ड वापरून आयटीआर दाखल करू शकतात. 
  • आधार तपशिलाच्या आधारे  व्यक्तीस पॅन जारी करण्यात  येईल. आयटीआर दाखल करण्याच्या उद्देशाने पॅन आवश्यक आहे पण त्याअभावी पॅनच्या जागी आधार क्रमांक वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

४. टीडीएस कपात:

  • जर एखाद्या व्यक्तीने घराच्या बांधकामासाठी व्यावसायिक कंत्राटदार किंवा डिझाइनर, आर्किटेक्ट किंवा तत्सम व्यावसायिक काम वैयक्तिक वापरासाठी करायचे असल्यास नवीन परमानंट खाते क्रमांक (पॅन) नियमाप्रमाणे संबंधित कामाचे पैसे  देण्यापूर्वी त्यातून टीडीएस कपात करणे आवश्यक आहे. सध्या अशा प्रकारच्या कामांसाठी देण्यात येणाऱ्या पैशांतून टीडीएस कपात करण्याची गरज नाही. 
  • जर एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल ज्याचे  लेखापरीक्षण (audit) करण्यात येत नसेल, तर टीडीएस कपात करण्याचे बंधन नाही. 
  • परंतु या नियमामुळे कर बुडावणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कर चुकविण्याची एक संधी मिळत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या नियमांत बदल करण्यात आला आहे. यासाठी २०१९ च्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये नवीन कलम १९४ एम लागू करण्यासाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कलमानुसार वर नमूद केलेल्या प्रोफेशनल कामांसाठी घेण्यात येणाऱ्या फी ची रक्कम जर वर्षाला ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर ५% टीडीएस आकारण्यात येईल.
  • तथापि,  करदात्यावरील ओझे कमी करण्यासाठी असे प्रस्तावित केले आहे की अशा व्यक्ती वजा केलेला कर स्वत:चा आणि व्यावसायिकांचा पॅन वापरुन जमा करू शकतील आणि कर कपात खाते क्रमांक (TAN) घेण्याची आवश्यकता नाही.

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ३० महत्वपूर्ण घोषणा

पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करा आता एका क्लिकवर..!!

तुमचंही पॅनकार्ड रद्द झालंय का? लगेच तपासा काही मिनिटांत..

 आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]