Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutes आज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

तुम्हाला कामात दिरंगाई करायची सवय आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes टीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो कल करे, कल करे सो परसो” अशीच परिस्थिती आपल्या पैकी काही लोकांची असेल, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही एक धोक्याची घंटा आहे. तुमची दिरंगाई करण्याची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा! तुम्हाला जाणून घ्यायचंय की दिरंगाई करणे का संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे तर हे नक्की वाचा-

मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता

Reading Time: 2 minutes मोबाईल हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अगदी बँकिंग पासून डेटिंग पर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर सहज शक्य होत आहेत. मोबाईलमुळे आयुष्य सुखकर झाले आहे. कुठलीच गोष्ट १००% चांगली किंवा वाईट नसते. त्याचप्रमाणे मोबाइलचेही अनेक तोटे आहेत.  मोबाईलमुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. तसेच, हा मोबाईल तुमच्या सामाजिक आयुष्यावर, तुमच्या कार्यक्षमतेवर, तसेच तुमच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? 

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग  २

Reading Time: 3 minutes मागच्या भागात आपण कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयीची माहिती घेतली. या भागात आपण वेळेचे नियोजन बिघडविणाऱ्या गोष्टी व त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

Reading Time: 2 minutes आपण बऱ्याच वेळा, काही काम करताना सोशल मिडीयाला दूर ठेवू शकत नाही? बऱ्याच दिवस चालणा-या कामांसाठी स्वत:ला मानसिक रित्या तयार करणे कठीण वाटत आहे का? कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही का? वरील सर्व प्रश्नांच उत्तर जर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. स्वत:ला गुंतवून ठेवणे, उत्पादकता राखणे या गोष्टी कठीण झाल्या आहेत. हल्ली लक्ष विचलित होण्यासाठी एक क्लिकचा पुरेसा आहे. पण थोडी जागरूकता असेल, तर या गोष्टी सहज सुधारता येतात.

Parkinson law: वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

Reading Time: 3 minutes सन १९५५ साली, प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक ‘सिरील नॉर्थकोट पार्किन्सन यांनी, “काम पूर्ण होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ दिला तर काम वाढलं जातं व कामाची चालढकल होते” सिद्धांत जगासमोर मांडला. याचा प्रमुख फायदा उत्पादन क्षेत्रात असणाऱ्यांना झाला. कारण वेळेत काम पूर्ण झालं नाही तर आपली उत्पादकता कमी होते व याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ शकतो. पुढे अनेक अर्थतज्ञांसाठी सुद्धा हा सिद्धांत मोलाचा ठरला.