Reading Time: 3 minutes

मागच्या भागात आपण कार्यक्षमता घटविणाऱ्या वाईट सवयीची माहिती घेतली. या भागात आपण वेळेचे नियोजन बिघडविणाऱ्या गोष्टी व त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया.

कार्यक्षमता घटवणाऱ्या व वेळेच व्यवस्थापन बिघडवणाऱ्या वाईट सवयी – भाग १

वेळेच्या नियोजनावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी-

१. मल्टीटास्किंग 

  • ‘मल्टीटास्किंग’ ही अनेकांना असलेली सर्वात वाईट सवय आहे. एकाचवेळी अनेक कामे हातात घेतल्याने बरीच कामे अपूर्ण राहू शकतात. 
  • मल्टीटास्किंग मुळे कामाचा दबाव आल्याने रोज असंख्य कामे करावी लागतात. जेव्हा आपण मल्टीटास्किंग करता तेव्हा एकाच वेळी अनेक कामे व्यवस्थित करता येत नाहीत. काम ढकलल्यामुळे कुठल्यातरी एका कामावर लक्ष देता येत नाही. 
  • कामाचा वेळ आणि ताकद काम बदलण्यात खर्च होते व कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही. सतत नवीन काम बदलल्यामुळे मानवी मेंदूची सातत्याने काम करण्याची शक्ती कमी होते. 
  • एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देता येत नाही म्हणून एका वेळी एकच काम हातात घ्यावे व पूर्ण करावे. 

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To Do List)?

मल्टिटास्किंगची सवय सोडविण्यासाठी काही उपाय- 

  • परिपूर्णतेवर भर द्या- जेव्हा नवीन काम हातात घेतले जाईल तेव्हा ते पूर्ण होईपर्यंत त्याचं काम करणे थांबवू नका. कितीही इच्छा झाली, तरी काम बदलू नका किंवा स्विच करू नका. सुरूवातीला हे कठीण वाटेल पण याचा चांगला परिणाम तुमच्या गुणवत्तेवर आणि प्रगतीवर दिसेल.
  • समान कामांचा एक ग्रुप करा- मल्टीटास्किंग टाळणे शक्य नसल्यास कामाची एक बॅच किंवा ठराविक ग्रुप निश्चित करा. सहसा समान कामासाठी समान शारिरीक आणि मानसिक ऊर्जा लागते, त्यामुळे या कामांचा ग्रुप किंवा बॅच केल्यामुळे ही कामे एकत्रितपणे पूर्ण होतील. 
  • लक्ष विचलित करणा-या गोष्टींपासून लांब राहा – लक्ष विचलित करणा-या गोष्टी म्हणजे – टेलिव्हिजन (टीव्ही), कुटुंबीय/मित्र मंडळी/सहकारी यांच्या सोबत गप्पा मारणे, व्हिडिओ गेम्स खेळणे. काम करत असताना हे सर्व करणे टाळा. 
  • इंटरनेटपासून स्वत:ला दूर ठेवा – इंटरनेट मेल, फोन कॉल्स यापासून थोडावेळ लांब रहा. सोप्या गोष्टी आधी निवडा व त्या पूर्ण करा. हल्ली कामात व्यग्र असताना सर्वात लवकर लक्ष विचलित करणारी गोष्ट म्हणजे ‘सोशल मिडिया’. काम करत असताना सोशल मीडियावर गप्पा मारणे, मेसेजेस पाठवणे, काही मजेदार वेबसाईट्स पाहणे या गोष्टींमुळे वेळ जातो. खाली दिलेल्या काही टीप्स लक्षात घ्या. 
  • साईट ब्लॉकर वापरा – सर्व वेब ब्राउज़र मध्ये साईट ब्लॉकरचा पर्याय उपलब्ध असतो. त्याचा वापर करा. सर्वात जास्त वेळ घालवणा-या साईट्स ब्लॉक करा. 
  • सोशल मीडियावर येणारी नोटिफिकेशन्स बंद करा- या अशा नोटिफिकेशन्स मुळे आपलं लक्ष पूर्णपणे विचलित होतं व काम थांबवून आपण ते पाहण्यातच व्यस्त होऊन जातो. म्हणून अशा सूचना बंद करायला हव्या. 
  • टेलिव्हिजन किंवा व्हिडिओ गेम्स सिस्टीम बंद करा – टीव्ही व व्हिडिओ गेम्स पासून स्वत:ला लांब ठेवून वेळ वाचवा. 
  • शक्य असल्यास एखाद्या निवांत ठिकाणी काम करा –  कुंटुंब व मित्र मंडळी़पासून दूर जाणे हे एका ग्रंग्रंथालयात किंवा कॉफी शॉप वर जाण्याउतकेच सोपे आहे. 

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

२. काम करत असताना स्वप्नात रमून जाणे –

  • जोपर्यंत प्रत्यक्षात तुम्ही काम करत नाही तोपर्यंतच  काही मोठा मोठ्या गोष्टींचा विचार करणे चांगले आहे. याचे कारण स्वप्न जरी मोठे असले तरी ते प्रत्यक्षात त्या पर्यंत पोचण्यासाठी हजारो टप्पे आहेत. त्यासाठी किती काम करावे लागेल यावर जास्त भार देण्यात आला पाहिजे. 
  • खालील काही गोष्टी विचारात घ्या- 
    • मोठ्या कल्पनांचा विचार रिकाम्या वेळेतच करा- मोठ्या कल्पना किंवा चित्रे डोळ्यासमोर असावीत पण त्यांचाच सतत विचार करून कार्यक्षमता घटवू नये. 
    • प्रगतीच्या दिशेने लक्ष केंद्रित करा- आपण किती अंतर पार केलं आहे याचा आढावा प्रेरणादायी ठरू शकतो. त्यामुळे कुठे पोचायचं आहे,  त्यापेक्षा सध्या कुठे आहात आणि आणखी काय करायला हवं यावर लक्ष केंद्रित करा. 
    • सुरूवात छोट्या गोष्टीपासून करा- छोट्या छोट्या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात, आणि कामही पूर्ण होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सकारात्मकता येतो. म्हणून छोट्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करायला हवं. 

३. कामाच्या नियोजनाचा अभाव –

  • जेव्हा वाटेल तेव्हा काम करण्याची सवय असल्यास ते उत्पादकतेच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते. 
  • उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कामाचं नियोजन असणे गरजेचे आहे. मूडनुसार काम करून चालत नाही. 
  • आपल्या चंचल, आळशी आणि चालढकल करण्याच्या स्वभावाचा परिणाम अप्रत्यक्षपणे उत्पादकतेवर होतो. सगळी कामे मनाच्या नियंत्रणाखाली करण्यात आली तर कामाचे नियोजन ढासळते. 

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

. पूर्णत्व (परफेक्शनिस्ट बनण्यासाठी प्रयत्न करणे) –

  • अति परफेक्शनच्या नादात छोट्या गोष्टी हातातून निसटतात.  कारण कुठलाही व्यक्ति परिपूर्ण होऊ शकत नाही. काम परिपूर्ण (perfect) करण्यापेक्षा काम वेळेत पूर्ण करा. 
  • परिपूर्णतेच्या मागे लागल्याने कामाचं वास्तविक स्वरूप बाजूला राहतं व अवास्तव कल्पना आणि आग्रही स्वभावामुळे काम पूर्ण होत नाही. 
  • आपलं ध्येय ते काम परफेक्ट कसं होईल यापेक्षा ते काम वेळेत कसं पूर्ण होईल हे असावे. याचा चांगला परिणाम उत्पादकतेवर होतो. काम पूर्ण झाल्यावर ते अगदी परिपूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न केले तरी चालेल. 

५. प्रत्येक कामासाठी नेहमीच होकार देणे 

  • प्रत्येक छोट्याछोट्या कामांना ‘होय म्हणणे’ ही चांगली गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. कारण या सगळ्यामध्ये होणारा त्रास आणि परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे.
  • आपला वेळ मौल्यवान आहे याची जाणीव इतरांनाही होऊ द्या. कारण स्पष्टपणे सांगितल्याशिवाय कोणी आपल्या वेळेचा आदर करणार नाही. 
  • नकार देताना प्रामाणिकपणे नकार द्या. आपला मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी काही वेळा नकार देणे आवश्यक असते. 
  • नकार द्यायचा नसेल तर ते काम नंतर करण्याचा पर्याय समोर ठेवा. 

वर दिलेल्या वाईट सवयी कशा दूर होतील व चांगली उत्पादकता कशी मिळेल याच नियोजन करा. शेवटी कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायचं हे आपल्यावरच अवलंबून असते. 

कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –