Technical Analysis
Reading Time: 3 minutes

Technical Analysis

शेअरबाजारात ट्रेंडिंग करताना मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला जातो. आपण मागील भागात आपण मूलभूत विश्लेषण म्हणजे काय हे समजून घेतले. आजच्या लेखात आपण तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय हे समजून घेऊया 

गुंतवणूकदार मूलभूत विश्लेषणाचा तर ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषण विचारात घेतात. खरं तर या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार दोघांनाही अधिक फायदा होऊ शकतो. शेअर बाजारामध्ये पाहिलं तर ७०% व्यवहार ट्रेडिंगचे होतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांना तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. यात प्रामुख्याने आलेखांचा (Charts) विचार केला जातो. या दृष्टीनेही चार्ट विश्लेषण प्रणाली सर्वात विश्वसनिय व लोकप्रिय आहे. काही वर्षांपासून याचा वापर वाढत आहे. 

हे नक्की वाचा: शेअर बाजारात गुंतवणूक करताना मुलभूत विश्लेषण का महत्वाचे आहे? 

तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis)

  • तांत्रिक विश्लेषण म्हणजें एखाद्या कंपनीच्या शेअरचा चालू भाव व उलाढाल यांची भूतकाळातील किंमत आणि उलाढाल याच्याशी तुलना करून भविष्यातील किमंतीचा अंदाज करणे. 
  • ही प्रक्रिया कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून नसून बाजारभावावर काम करते. 
  • याचे उदाहरण म्हणजे तेजस नावाचा विद्यार्थी इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंत जर पहिल्या क्रमांकाने पास होत असेल तर आठवीमध्येही तो पहिल्या क्रमांक मिळवू  शकतो, असा अंदाज आपण बांधू शकतो कारण इतिहासची पुनरावृत्ती होत असते. तसेच जर त्यास पहिला क्रमांक मिळवता आला नाही तरी दुसरा येण्याची शक्यता अधिक असते.
  • याप्रमाणे शेअरचा बाजारभाव, उलाढाल या माहितीचा वापर करून बनवलेला आलेख, त्याची रचना, मांडणी या सर्वाचा आजपर्यंतचा सर्व आलेख, पूर्वीपासून आजपर्यंतचा सर्वाधिक भाव व मिळालेला सपोर्ट, भाववाढीची सुरुवात आणि जेथून भाव कमी होण्यास सुरुवात झाली तो कालावधी (रेझिस्टन्स) यावरून तयार होणाऱ्या चार्टमधील साम्य आणि फरक शोधून तांत्रिक विश्लेषण केले जाते. 

तांत्रिक विश्लेषणाचे तीन भाग

१. कॅण्डेलस्टिक पॅटर्न- 

  • कॅण्डेलस्टिक म्हणजे कोणत्याही शेअरची हालचाल दाखवण्याची क्रिया होय. 
  • कॅण्डल आपणास दोन प्रकारे दिसतात. बुलिश कॅण्डल हिरव्या रंगाची असून तेजी दर्शिविते व दुसरी बेरीश कॅण्डल ही लाल रंगाची असून मंदी दर्शविते.  
  • या कॅन्डल  ओपन आय, हाय, लो, आणि क्लोज, या चार किमती विचारात घेऊन बनतात. जर भाववाढ होत असेल, तर ती निळ्या रंगात व कमी होत असल्यास लाल रंगात कमी अधिक आकाराची होते. 
  • कॅण्डेलस्टिक पॅटर्नमध्येही काही वेगवेगळे आकार आपणस दिसून येतात. हरामी, इंगल्फींग, टासुकि लाईनं, डोजी, थ्री व्हाईट सॉल्जर, द ब्लॅक क्रॉवास या पॅटर्नच्या मदतीने आपणास बाजारातील तेजी मंदीचे संकेत मिळतात.

विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी 

२. चार्ट पॅटर्न- 

  • कॅण्डेलस्टिक चार्ट पॅटर्न, कॅण्डेलस्टिक पॅटर्न व अन्य कॅण्डल यांचा जो समूह बनतो त्यास चार्ट पॅटर्न म्हणतात.
  • वर जाणाऱ्या कॅण्डल समुहात तेजीचा ट्रेंड दिसतो, तर खाली जाणाऱ्या समूहात मंदीचा ट्रेंड दिसतो. 
  • पॅटर्न मध्ये आपणास- रिवर्सल चार्ट पॅटर्न व कँटीनुशन चार्ट पॅटर्न दिसतात. यामूळे आपणास बाजारात अप ट्रेंड अथवा डाऊन ट्रेन्ड समजतो.

 रिवर्सल चार्ट पॅटर्न – 

  • जेव्हा शेअरमध्ये तेजी किंवा मंदीचा ट्रेण्ड पूर्ण झाल्यानंतर जर रिव्हर्सलं चार्ट पॅटर्न तयार झाला तर, बाजारात रिवर्स होण्याचे संकेत मिळतात आणि जेव्हा बाजारात अप ट्रेंड चालू असेल आणि जर बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न बनला तर शेअर खाली येऊ शकतो. 
  • जर मंदीचा ट्रेंड  असेल आणि चार्टमध्ये बुलिश रिव्हर्सलं पॅटर्न तयार झाला तर शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळतात. 
  • रिव्हर्सल चार्ट पॅटर्न खालील प्रमाणे आहेत
    • हेड अँड शॉल्डर 
    • राईजिंग वेज 
    • फेलिंग वेज 
    • डबल बॉटम  
    • डबल टॉप 
    • राऊंडींग बॉटम

कन्टीनुशन चार्ट पॅटर्न– 

  • हे ट्रेंड तसाच राहण्याचे संकेत देतात. जर तेजीचा ट्रेंड चालू असेल आणि बुलीश कन्टीनुशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरमध्ये तेजीचे संकेत मिळतात व जर ट्रेंड मंदीचा चालू असेल आणि चार्टमध्ये बेरीश कन्टीनुशन चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरमध्ये मंदी राहील असे दिसते.
  • कन्टीनुशन चार्ट पॅटर्न खालील प्रमाने आहेत.
    • ट्रिअँगल 
    • सिमनेट्रिकल ट्रिअँगल 
    • असेंडिंग ट्रिअँगल 
    • डेसेंडिंग ट्रिअँगल 
    • फ्लॅग 
    • रेक्टँगलेस 
    • प्राइज चॅनल 
    • कप अँड हॅण्डल.

महत्वाचा लेख: Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार  

३. टेक्निकल इंडिकेटर- 

  • हे टेक्निकल एनलिसिस मधील अत्यंत प्रभावी शस्र आहे कारण इंडिकेटर यांच्या साहाय्याने बाजारातील शेअर ‘over brought’ किंवा ‘over sold’ समजतो तेव्हा योग्य वेळी खरेदी विक्री करण्यासाठी यांचा खूप छान उपयोग होतो.
  • टेकनिकल इंडिकेटरमुळे कॅण्डेलस्टिक पॅटर्न व चार्ट पॅटर्न यांनां अचूक दिशा मिळते. आज पाहिलं तर १०० हून अधिक इंडिकेटर बाजारात उपलब्ध आहेत.त्या पैकी महत्वाचे इंडिकेटर –
    • एम ए सी डी 
    • बोळींजर बँड 
    • आर एस आय
    • एडीेक्स 
    • मोवींग अव्हरेज 
    • स्टोचॅस्टिक ऑस्कीलेटर.

अशा प्रकारे तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आपणास बाजारात डे ट्रेंडिंग, शॉर्ट टर्म ट्रेंडिंग आणि गुंतवणूक करण्यास मदत होते. बाजार भावाची, निर्देशांकाची दिशा समजल्याने शेअर खरेदी विक्रीची योग्य वेळ समजते यावरून उद्धिष्ट ठरवून फायदा किंवा स्टोपलॉसचा वापर करून कमीतकमी तोट्यात बाजारातून बाहेर पडता येते. त्यामुळेच ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार यांना त्याचा उपयोग होऊ शकतो.

– शरद गोडांबे

9657980309

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Download Arthasakshar App – CLICK

Web search: Technical Analysis in Marathi, Technical Analysis Marathi Mahiti, Technical Analysis mhanaje kay?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…