Technical Analysis शेअर बाजार
Reading Time: 3 minutes

शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व

शेअर बाजार म्हणजे तसा जोखमीचा व्यवहार असतो. इथे गुंतवणूक करताना गुंतवणुकदारांनाअनेक अडचणींना  जाणीव असते. शेअर बाजार गुंतवणुकीसाठी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे अगदी १००% अचूक नसेल किंवा त्यामुळे सर्वोत्कृष्ट परतावा मिळेलच असे खात्रीने सांगता येत नाही, तरी जेव्हा इक्विटी बाजारपेठ अस्थिर असेल तेव्हा योग्य निवड करण्याकरिता हा मार्ग उपयुक्त आहे. ठराविक काळातील स्टॉक्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममधील बदलांचा अभ्यास केल्याने भविष्यातील किंमतीचा अंदाज लावणे सोपे होते. 

बाजार अस्थिर, अनिश्चित असताना, त्यातही गुंतवणूकदार चढ-उतारांचा अंदाज लावू शकत नसतानाची स्थिती आणखीच वाईट होते. अशावेळी बहुतांश गुंतवणूकदार नेहमीच त्याचे गुंतवणूकदार/पोर्टफोलिओ मॅनेजरच्या सल्ल्यानुसार बेटिंग करतात किंवा तज्ज्ञांच्या अंदाजानुसार गुंतवणूक करतात. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने, गुंतवणूकदार शेअर चार्ट्सची माहिती मिळवू शकतात. त्यानंतर त्यांना शेअरमधील गुंतवणुकीची जोखीम काही प्रमाणात पत्करता येते. परिणामी त्यांना चांगला परतावा मिळतो. 

हे नक्की वाचा: Share Market: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे? 

Technical Analysis: शेअर बाजार गुंतवणूक आणि तांत्रिक विश्लेषणाची वैशिष्ट्ये:

१. शॉर्ट टर्म ट्रेडिंग: 

  • तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे शॉर्ट टर्म ट्रेडर्सकडून वापरले जाणारे विश्वसनीय साधन आहे. 
  • गतिमान गुंतवणुकीसाठी सध्याच्या स्टॉक्सचा अंदाज लावण्यासाठी याची मदत होते. 
  • मर्यादित वेळेसाठी स्टॉक्स खरेदी करणे, विक्री करणे किंवा स्वत:कडेच ठेवणे हे जोखीमदायक असते. 
  • बाजारातील पॅटर्न आणि ट्रेंडचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारची पद्धत किंवा साधन वापरल्यास जोखीमीवर नियंत्रण ठेवता येते. 
  • यामुळे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देणारे स्टॉक्स ओळखण्यास आणि त्वरित निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो.

२. एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स: 

  • स्टॉक चार्ट्सचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठीचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सचा वेळ निश्चित करू शकतात. 
  • मागणी व पुरवठा समजण्यास याची मदत होते. तसेच ट्रेंड मोडण्यात व जास्त परताव्याची वेळ योग्यरितीने निर्धारीत करण्यास मदत होते. 
  • शेअर्सच्या अतिरिक्त तपशीलाने गोंधळलेल्या लोकांना तसेच निर्णयक्षमता नसलेल्यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे मार्गदर्शन मिळते. तसेच गुंतवणुकदारांसाठी व्यवहार करणे सोपे होते. 

इतर लेख: शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

३. किंमतीच्या नमून्यांचे विश्लेषण: 

  • शेअर ट्रेडिंगमध्ये चतुराईने निर्णय घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण उपयुक्त ठरते. 
  • तांत्रिक विश्लेषणाद्वारे किंमतीचे प्रवाह कळाल्यास गुंतवणुकदारांना योग्य किंमतीत खरेदी किंवा विक्री करणे सोपे जाते. 
  • दरातील चढ-उताराचा अंदाज सोपा झाल्याने अधोमूल्यांकन आणि अतिमूल्यांकन टाळता येऊ शकते. 
  • यामुळे शेअर्सच्या किमतीत जलदगतीने होणारे बदल ओळखणेही सहज शक्य होते. 
  • किमतीमध्ये होणाऱ्या बदलांच्या काही पॅटर्न्सची पुनरावृत्ती होत असते, त्यामुळे गुंतवणुकदार माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. 

४. समर्थन आणि प्रतिकार पातळी: 

  • अस्थिर परिस्थितीत, स्टॉक विक्री, खरेदीवरील अंदाज लावणे आणि त्यासंबंधी निर्णय घेणे कठीण असल्यामुळे स्टॉकची किंमत मर्यादित कक्षेच्या पुढे जाते. 
  • अशा वेळी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने स्टॉक चार्टमध्ये समर्थन आणि प्रतिकार पातळी ओळखणे सोपे जाते. त्यामुळे गुंतवणुकदाराला खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेता येतो.
  • एखादा विशिष्ट स्टॉक समर्थन किंवा प्रतिकार श्रेणीच्या पुढे असेल, तर तो व्यापार करण्यायोग्य आहे. यातून चांगली स्थिती व मागणी दिसून येते.

५. ट्रेंड्सचे विश्लेषण: 

  • तांत्रिक विश्लेषण साधनाचा वापर असो वा सध्याचे शेअर बाजारातील ट्रेंड समजून घेणे, कोणत्याही गुंतवणुकादारासाठी याची आवश्यकता असते. 
  • योग्य निर्णय घेण्यात, सध्याचे विस्तृत मार्केट ट्रेंड्स समजून घेणे आवश्यक आहे. 
  • तांत्रिक विश्लेषणामुळे स्टॉकची ऐतिहासिक, वर्तमान आणि एकूणच शेअरची वृत्ती आणि प्रकृती कळून येते. मग अपट्रेंड, डाऊनट्रेंड्स किंवा हॉरीझोंटल ट्रेंड्स असो गुंतवणूकदार चांगली खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात.

इतर लेख: शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?

६. दर आणि घनता विश्लेषणाचे मिश्रण: 

  • अखेरीस, दरातील चढ-उतार आणि घनतेचे एकत्रित विश्लेषण, यामुळे गुंतवणुकादाराला एखादा निर्णय चतुराईने घेण्यास मदत होते. कारण पुरवठा व मागणीतील चक्राचा दोन्ही घटकांवर परिणाम होतो. 
  • तांत्रिक विश्लेषणामुळे स्टॉक ट्रेंडच्या इतिहासाचे पुनरावलोकन करता येते. उदा. एखाद्या स्टॉकची किंमती वाढते आणि योगायोगाने ट्रेड व्हॉल्युमदेखील वाढतो, तो सकारात्मक ट्रेंड म्हणून ओळखला जातो. 
  • ट्रेड व्हॉल्युमने काहीशी वृद्धी घेतली तर तो रिव्हर्स ट्रेंड आहे, असे म्हटले जाते. या दोन्ही घटकाच्या संमिश्र अभ्यासाने गुंतवणुकादारांना गुंतवणुकीचे पॅटर्न्स अधिक चांगल्या पद्धतीने समजणे सोपे जाते.

योग्य धोरणांनी गुंतवणूक करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण साधने ही स्टॉक चार्टचे एकूण मूल्यांकन आणि त्यांनंतरच्या व्यापाराच्या पर्यायांच्या वेळेतील उपलब्धतेबाबत फायदेशीर ठरू शकतात.

श्री समित चव्हाण

मुख्य विश्लेषक, टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज, 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…