Reading Time: 3 minutes
- आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू – मोबाईल,लॅपटॉप,गाडी,घर इत्यादी पासून ते या सर्व गोष्टींच्या सुरक्षिततेसाठी विमा कुठला घ्यावा इथपर्यंत अनेक पर्याय आपल्याला मिळतात.
- आरोग्यासाठी सुद्धा आरोग्य विमा, जीवनासाठी आणि जीवनानंतरची जीवन विमा, गुंतवणूक व बचतीसह विमा, सेवानिवृत्तीची विमा योजना असे कितीतरी पर्याय आहेत.
यापैकी आपण या लेखातून आज आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक समजून घेऊ.
आरोग्य विमा
- एखाद्या व्यक्तीस किमान २४ तास रुग्णालयात दाखल करावे लागले तर त्याला रुग्णालयाचा व औषधोपचाराचा बराच खर्च येतो.
- हा खर्च विमा कंपनी आपल्या विमाधारकाला देते. तुम्ही आरोग्य विमा काढला असेल तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.
- इतर विमा योजनांप्रमाणे आरोग्य विमा मध्ये सुद्धा पॉलिसीधारकाला ठराविक अशी रक्कम विमा कंपनी ला भरावी लागते.
आरोग्य विमा मध्ये येणाऱ्या काही प्रकारांची माहिती आपण घेऊ.
- वैयक्तिक आरोग्य विमा :
- वैयक्तिक आरोग्य विम्यामध्ये तुम्ही स्वतः, तुमचा जोडीदार, मुले आणि आई-वडील यांना समाविष्ट केले जाते.
- कुटुंबातील कुणालाही काही आजार झाल्यास रुग्णालयामध्ये भरती झाल्यानंतर, तेथील खर्च व औषधोपचार याचा सर्व खर्च वैयक्तिक आरोग्य विम्यामध्ये ग्राह्य धरला जातो.
- फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा :
- फॅमिली फ्लोटर विमा मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठी एकच प्रीमियम भरून त्यांना योजनेत समाविष्ट केले जाते.
- वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या तुलनेत फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी चा प्रीमियम हा कमी असतो.
- वयोमर्यादा 60 पेक्षा जास्त असेल तर मात्र त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही.
- ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा :
- वयोमर्यादा 60 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
- वयोमानानुसार शारीरिक किंवा मानसिक त्रासामुळे वृद्ध व्यक्तींना होणारे आजार, अपघात – दुखापत यासाठी होणारा खर्च ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा यामध्ये सामाविष्ट असतो.
हे पण वाचा : तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?
जीवन विमा
- जीवन विमा पॉलिसि ही पॉलिसीधारकाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी असते.
- यात विमा देणारी कंपनी, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विम्याची रक्कम प्रदान करते.एक प्रकारे कुटुंबातील व्यक्तीसाठी भविष्यातील आर्थिक तजवीज आहे.
- जीवन विमा पॉलिसी मध्ये जी गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीसाठी इन्कम टॅक्स कलम 80 C च्या अंतर्गत विम्याची रक्कम करमुक्त असते.
- काही जीवन विमा पॉलिसी मध्ये गुंतवणुकीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
आपण सविस्तरपणे जीवन विमा पॉलिसी बद्दल माहिती घेऊ.
संपूर्ण जीवन विमा :
- संपूर्ण जीवन विमा पॉलिसी यालाच आजीवन विमा पॉलिसी असेही म्हणतात, नावाप्रमाणेच ही पॉलिसी विमाधारकाला आयुष्यभरासाठी कव्हर देते. ही योजना दीर्घकालीन असल्यामुळे यामध्ये जास्त कालावधी साठी प्रीमियम भरावा लागतो.
- विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला विमा कंपनी ठरलेली रक्कम सुपूर्द करते.
- ही पॉलिसी घेताना विमाधारक आयुष्यभरासाठी प्रीमियम भरू शकतो किंवा ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकतो.
- संपूर्ण जीवन विमा पॉलिसी मध्ये विमाधारकाच्या वारसदाराला मिळणारी रक्कम करमुक्त असते.
मुदत जीवन विमा :
- यामध्ये विमाधारकाचा ठराविक कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला जीवन विम्याची रक्कम देण्यात येते.
- विमा कालावधी संपल्यानंतर व्यक्ती हयात असेल तर मात्र यात भरलेले पैसे परत मिळत नाही.
- सर्वात परवडणारा विमा म्हणून मुदत जीवन विमा ओळखला जातो. जास्त रक्कम आणि अधिक कालावधी घेतल्यास मुदत जीवन विमा स्वस्त पडतो.
बाल विमा पॉलिसी :
- बाल विमा एक गुंतवणूक पॉलिसी असून यामध्ये मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही पॉलिसी मदत करते.
- वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विमा कंपनी एकरकमी किंवा प्रत्येक वर्षी विमाधारकाला परतावा देते.
सेवानिवृत्ती विमा योजना :
- या योजनेअंतर्गत विमाधारकास सेवानिवृत्तीनंतर नियमितपणे उत्पन्न मिळते .
- या योजनेला पेन्शन विमा योजना असेही म्हणतात.
युलीप विमा योजना :
- गुंतवणूक आणि विमा संरक्षण असा दुहेरी फायदा युलीप विमा योजनेमध्ये विमाधारकास मिळतो.
- काही युलीप योजनांमध्ये विशिष्ट रोगावरच्या उपचारांचा खर्च समाविष्ट असतो.
हे ही वाचा : जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न
निष्कर्ष:
- “हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जर विचार केला तर खरंच प्रत्येकाने स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज आहे.
“जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी “ याप्रमाणेच आयुष्यभरासाठी आणि आयुष्याच्या नंतरही आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची भविष्यातील तरतूद व्हावी यासाठी जीवन विमा पॉलिसीचा नक्कीच विचार केला पाहिजे.
Share this article on :