Pareto principle
https://bit.ly/35dK5Xf
Reading Time: 2 minutes

पॅरेटो सिद्धांत (Pareto principle)

पॅरेटो सिद्धांताबद्दल (Pareto principle) तुम्ही व्यवस्थापनशास्त्राच्या पुस्तकात वाचलं असेल किंवा या विषयावरील सेमिनार्समध्येही ऐकलं असेल. बऱ्याच व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांत एक हुकुमी सिद्धांत हमखास प्रशिक्षणार्थींच्या मनावर बिंबवला जातो. तो म्हणजे “८०% विक्री  ही  २०% ग्राहकांकडून येते !” हा ८०- २० चा  नियम आपल्याला अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.

हे नक्की वाचा: गुंतवणूक – कला का शास्त्र

Pareto principle : ८०- २० चा  नियम

  • सगळं काही समसमान असतं तर आयुष्याला काही अर्थच राहिला नसता. सर्वसामान्य समजुतीनुसार पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून या जन्मात चांगले-वाईट फळ भोगायला मिळते.
  • प्रत्येकाच्या उत्पन्नात, राहणीमानात अथवा कौटुंबिक परिस्थितीत फरक का आहे, याचा विचार आपण पूर्वजन्माशी वगैरे जोडून मूळ प्रश्न बाजूला ठेवतो. कदाचित हे जीवनाचे तत्वज्ञान इटलीत १८ व्या शतकाच्या शेवटी कोणाला माहिती नसावे.
  • तर, त्याचे झाले असे की आल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटली मध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे. पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील ८०%  जमिनी केवळ २०% लोकांच्या मालकीच्या आहेत.
  • पॅरेटो यांनी इ.स. १८९६ ला युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल ८०-२० नियमानुसारच आहे.  
  • २०१८ साली अमेरिकेत शीर्ष २०% करदात्यांनी जवळपास ८०% ते ९०% आयकर भरला होता. 
  • तुमच्याकडे ऑफिसला वापरण्यासाठी कपड्याचे ६ जोड असले तरी २ आवडते कपडेच बऱ्याचवेळा वापरले जातात.  
  • तुमच्या मोबाईलमध्ये ५० वेगवेगळे ऍप्स असतील. पण त्यापैकी फोन डायल,  व्हाट्सएप, कॅमेरा, मेसेजेस, वेबब्राऊसर असे ५ ते ८ महत्वाचे ऍप्स नेहेमी वापरले जातात. 
  • परंतु, फक्त २०% काम केले की ८०% परिणाम नेहेमीच आणि प्रत्येक क्षेत्रात मिळतीलच असे नाही. ह्रदयाचे ऑपरेशन करताना डॉक्टरांनी २०% वेळात ८०% महत्वाचे काम केले आणि उरलेले काम सोडून दिले तर चालेल का?
  • पॅरेटोचा सिद्धांत प्रत्येक वेळी खरा ठरेलच असे नाही. पण असे आपण म्हणू शकतो की जीवनातील बहुतेक गोष्टी सर्वाना समप्रमाणात मिळू शकत नाही.  उदा:
    • २०%  प्रयत्नांमुळे ८०% परिणाम मिळतात. 
    • २०% कर्मचारी ८०% परिणाम देण्याइतकी मेहनत करतात.
    • सॉफ्टवेअर मधले २०% चुकीचे कोड्स ८०% चुकांना कारणीभूत असतात. 

विशेष लेख: काटकसर म्हणजे नक्की काय? 

Pareto principle: ८०/ २० च्या नियमाचे महत्व:

पॅरेटोचा सिद्धांतामुळे तुमच्या लक्षात येईल की बहुतेक परिणाम तुलनेने कमी पण महत्वाच्या प्रयत्नांमधून येतात.

  • ८०% विक्री २०% ग्राहकांकडून येते: २०% ग्राहकांना कायम समाधानी ठेवायचा प्रयत्न करा 
  • २०% कर्मचारी ८०% परिणाम देण्याइतकी मेहनत करतात: त्या २०% कर्मचाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ द्या, त्यांचे कौतुक करा.  
  • सॉफ्टवेअर मधले २०% चुकीचे कोड्स ८०% चुकांना कारणीभूत असतात: त्या २०% कोड्स च्या दुरुस्तीकडे लक्ष द्या. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
  • आपण अनेकदा बिनमहत्वाच्या ८०% गोष्टींकडे लक्ष देतो आणि जिथे खऱ्या मेहनतीची आवश्यकता नसते तिथे जास्त मेहनत घेतो. इथे २०% महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. 

तर, हा होता पॅरेटो सिद्धांत.  उत्पादन, व्यवस्थापन, सेल्स/मार्केटिंग अशा विविध क्षेत्रात हा सिद्धांत वापरला जातो. आपल्या दैनंदिन आयुष्यातही या नियमाचे आचरण करून बघा. आपल्याला आयुष्यात मिळणाऱ्या त्या २०% संधींचा विचार करा ज्या तुमचा ८०%  फायदा करून देतील.

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Pareto principle in Marathi, 80/20 Rule In Marathi, Pareto principle Marathi mahiti, Pareto Rule Marathi, Pareto Rule in Marathi, 80-20 principle in Marathi, 80-20 Rule Marathi Mahiti

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.