Commodity Trading: कमोडिटी ट्रेडिंग
एक दशकापूर्वी स्टॉक्स, बाँड्स आणि कमोडिटी ट्रेडिंग (Commodity Trading) या सिक्युरिटी आणि एक्सचेंज साधनांमधील गुंतवणूकीकडे भारतात अनेकजण जुगाड म्हणून पाहत असत. गेल्या काही वर्षात हा दृष्टीकोन बदलला आहे. हाच गुंतवणुकदारांचा समूह आज म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स आणि कमोडिटीज यासारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करताना दिसून येत आहे. अशा अपारंपरिक गुंतवणुकीत, विशेषत: कमोडिटीजमध्ये गुंतवणुकदारांची संख्या वेगाने वाढते आहे. यामागे नक्की कोणती कारणे आहेत?
हे नक्की वाचा: Guaranteed Return: खात्रीशीर परताव्याचा अट्टाहास…
Commodity Trading: कमोडिटी ट्रेडिंग वाढीमागील कारणे
१. मिलेनिअल गुंतवणूकदार:
- भारत हा देश म्हणजे तरुणांचा एक मोठा समूह असून येथील बहुतांश लोकसंख्या ४० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
- हे मिलेनिअल गुंतवणूदार उत्तम वाचक आणि उच्चशिक्षित आहेत.
- हे गुंतवणूकदार रिअल इस्टेट आणि बँकांतील ठेवी यासारख्या पारंपरिक गुंतवणूक साधनांच्या पलिकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा विचार करतात.
- हंगामी मागणीनुसार, योग्य परतावा मिळवण्यासाठी ते कमोडिटीजसारख्या पर्यायी साधनांचा विचार करू लागले आहेत.
२. बँकिंग पर्यायांचा वापर:
- भारतातील बँकांकडे कमोडिटीजसाठी चांगला एक्सपोजर आहे. तो अजूनही वाढत आहे. बँकांनी वाढवलेले खाद्यान्न कर्ज हे याचे उत्तम उदाहरण आहे.
- तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा आणि इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट (E-NWR) अशा प्रकारच्या संस्थात्मक उपायांनी सर्व भागधारकांचे हित सुरक्षित केले आहे.
- त्यामुळे बँकांना कमोडिटी ट्रेडिंगमध्ये त्यांचे कव्हरेज वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
- विशेषत: कोव्हिडनंतरच्या परिस्थितीत बँकिंग पर्यायांचा वापर करत कमोडिटी क्षेत्रात रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे.
हे नक्की वाचा: शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी?
३. व्यापाराचे सुलभीकरण:
- मागील काही वर्षांत, ब्रोकिंग फर्मद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली.
- गुंतवणुकदाराचा प्रवास सोपा करण्यावर या गुंतवणुकीचा भर आहे.
- यापूर्वी ट्रेडिंग आणि डिमॅट खाते सुरु करण्यासाठी कुठेही २ ते ३ आठवडे लागत असत. काही ठिकाणी तर याहूनही जास्त कालावधी लागत असे.
- सध्या मात्र अग्रेसर ब्रोकरेज कंपन्यांनी हा वेळ एका तासापेक्षा कमी केला आहे. शिवाय गुंतवणुकदाराला घराबाहेर न पडताही खाते उघडता येते.
- इन्व्हेस्टमेंट तसेच व्यापार व गुंतवणुकीत संपूर्ण तांत्रिक एकत्रिकरण झाल्याचेही दिसून आले. त्यासंदर्भात नियमावलीही तयार करण्यात आली आहे.
- त्यामुळे कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग करताना गुंतवणुकदाराला कमी अडथळे येत असून माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येत आहेत.
४. महागाई विरोधात साधन:
- मालमत्ता वर्गाबाबत अनुभवी तज्ज्ञांच्या मतांनुसार, इक्विटी आणि बाँड्स चलनवाढीच्या काळात चांगली कामगिरी करत नाहीत, तर त्या तुलनेत कमोडिटीज उत्तम कामगिरी करतात.
- इक्विटीज आणि कमोडिटीज यांमध्येही परस्पर विरोधी संबंध आहे. त्यामुळे बाजारातील गतिशीलतेविरुद्ध ससाधन म्हणून गुंतवणूकदार कमोडिटीजचा वापर करतात.
- इक्विटी, कमोडिटीज आणि बाँड्सच्या संमिश्र पोर्टफोलिओमध्ये तर कमोडिटी इतर साधनांच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात.
शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स
५. नियम आधारीत गुंतवणूक:
- कमोडिटीजची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते.
- यात कृषी उत्पादने, निर्मिती उत्पादने, निर्यात, पाऊस आणि इत्यादी घटकांचा समावेश होतो.
- या घटकांद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीसाठी अंदाज लावता येतो.
- सध्याच्या काळात, अत्याधुनिक ब्रोकरेज संस्था नियम आधारीत डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत.
- सहज आणि जलद अशा डिजिटल गुंतवणूक प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.
– श्री प्रथमेश माल्या
उपाध्यक्ष, गैर कृषी वायदा व चलन संशोधन,
एंजल ब्रोकिंग लिमिटेड
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies