सायबर गुन्हेगारी (Cyber Crime)
२०२० हे वर्ष ‘कोरोना’ नावाचे अभूतपूर्व संकटे घेऊन आले. आता येणारे २०२१ हे वर्ष अजून एक संकट घेऊन येणार आहे, ते म्हणजे सायबर गुन्हेगारी (Cyber crime). कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार ‘डिजिटल’ झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मालवेअर इंजेक्ट करुन गोपनीय व संवेदनशील माहिती चोरणारे हॅकर्सही वाढले. २०२१ मध्ये मात्र व्यावसायिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष विचार करायला लागणार आहे. डिजिटल सिस्टीममध्ये उद्भवणारे संभाव्य धोके म्हणजे डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग आणि एथिकल हॅकिंग. येत्या वर्षात हे सर्व प्रकार वाढण्याची शक्यता सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हे नक्की वाचा: युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान…
Cyber Crime: २०२१ वर्षात वाढणारे सायबर गुन्हे
रॅनसमवेअर आणि रॅनसमहॅकचे दुहेरी संकट:
- रॅनसमवेअरद्वारे फाईल्ससोबतच वैयक्तिक व गोपनीय माहितीही हॅक केली जाऊ शकते. ही माहिती हॅक करून ती इंटरनेटवर प्रकाशित करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते.
- संवेदनशील आणि गोपनीय माहितीचा डेटा उघड झाल्याने कंपन्यांच्या जीडीपीआर वर अतिशय गंभीर परिणाम होतात आणि हे टाळायचे म्हटले, तर भरमसाठ खंडणी भरावी लागते, असे हे दुहेरी संकट आहे.
- या प्रकारास रॅनसमहॅक अथवा डबल एक्स्टॉर्शन असे म्हणतात. मेझ, डॉपल पेमर, र्युक, लॉकबीट, नेटवॉकर, माऊंटलॉकर, नेटफिल्म हे काही रॅनसमहॅकर्स असून २०२१ मध्ये देखील या प्रकारच्या संकटाचा धोका वाढणार आहे.
क्रिप्टो माइनर्सची नवी फळी:
- क्रिप्टोकरंन्सीची किंमत कायमच जास्त असते व ह्या किंमती २०२१ मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- बीटकॉइन्स आणि मोनेरो यासारख्या क्रिप्टोकरंन्सीची किंमत २०२० या वर्षात तब्बल तिपटीने वाढली आहे.
- क्रिप्टोकरंन्सीच्या वाढत्या किंमती हॅकर्सना अधिकाधिक क्रिप्टो माइनर्स बनवून त्याद्वारे खंडणी मिळविण्याची संधी देत आहेत.
- कोरोना महामारीच्या सुरुवातीला काळात रॅनसमवेअरचे स्वरुप म्हणजे कोरोनासंदर्भात माहिती देणाऱ्या फिशींग साईट्स, बनावट मोबाईल एप्स, कोरोनाबद्दल जागृती, पीपीई कीट्स, टेस्ट कीट्स, लॉकडाऊन व सोशल डीस्टंसिंगशी संबंधित होती.
विशेष लेख: सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?
डीप फेक्स ते सायबर फ्रॉड्स:
- डीप फेक्स म्हणजे डीप लर्निंग टेक्नॉलॉजीने एखाद्या व्यक्तीचे खोटे ऑडियो अथवा व्हिडीओ बनवणे. हे ऑडियो /व्हिडीओज खोट्या बातम्या पसरविण्यासाठी वापरले जातात.
- अशाप्रकारच्या फसवणूकीचे उदाहरण म्हणजे एखाद्या कंपनीचा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम पाठवायला सांगणे, प्रमोशन अथवा कार्यालयीन कामासाठी मोठ्या रकमेची मागणी करणारा ऑडियो/ व्हिडीओ; असे बरेच प्रकार २०२१ मध्ये घडू शकतील.
फिशींग अटॅक्स मधील ऑटोमेशन:
- हॅकर्स दिवसेंदिवस अधिकाधिक फिशींग अटॅक्स ऑटोमेशन पद्धतीने करत आहेत. २०२१ मध्येही असेच होईल.
- युजर्सना आमिष दाखवण्यासाठी सोशल इंजिनियरींग ट्रीक्सचा वापर करण्यात येईल.
मोबाईल बँकींगलाही सायबर गुन्हेगारीचा धोका:
- सप्टेंबर २०२० मध्ये सरबेरस मोबाईल बँकींग ट्रोजनचा सोर्स कोड सर्वांसाठी प्रकाशित केला गेला, हा कोड मोफत होता.
- यानंतर लगेचच मोबाईल ॲपमध्ये व्हायरस याचा धोका अधिक जोमाने वाढला. त्यामुळे साहजिकच येत्या वर्षात मोबाईल बँकींग क्षेत्रात ‘सरबेरस कोडवर’ आधारित मालवेअर येण्याची शक्यता आहे.
महत्वाचा लेख: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?
कोव्हीड-१९ व त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांची कोणी कल्पनाही केलेली नसेल. या महामारीच्या कालावधीत सायबर गुन्हेगारांना हॅकिंगचे नवनवीन पर्याय मिळाले आहेत. ही गुन्हेगारी येत्या वर्षात अजून वाढणार आहे. या वर्षात खास करून डबल एक्स्टॉर्शन क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार बोकाळतील.
हिमांशू दूबे
संचालक, क्विक हील सिक्योरिटी लॅब
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies