warren Buffett
warren Buffett
Reading Time: 3 minutes

Warren Buffett 20 Motivational Quotes 

वॉरेन बफेट यांचे नाव जगातील धनाढ्य लोकांमध्ये नेहमीच गणले जाते. त्यांनी त्यांचे गुंतवणूक आणि बचतीचे ज्ञान त्यांच्या विचारांतून जगाला नेहमीच दिलेले आहे. या लेखात आपण वॉरेन बफेट यांची काही प्रसिद्ध विधाने पाहूया जी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून मांडलेली आहेत. आपल्या कष्टातून बचत करून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची ही विधाने म्हणजे ‘गुरुमंत्र ’ म्हणावा इतकी महत्वाची आहेत. चला तर सुरुवात करूया. 

 

हेही वाचा – Warren Buffet Success Story : ‘असे’ बनले वॉरेन बफेट यशस्वी उद्योजक…

1.नियम क्रमांक 1: कधीही पैसे गमावू नका. नियम क्रमांक 2: नियम क्रमांक 1 कधीही विसरू नका.

अर्थ  बचत करा आणि तुमच्या पडत्या काळासाठी योग्य तजवीज करा. 

 

2. जर तुम्ही झोपेत असतानाही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत सुरु नसतील, तर तुम्ही मरेपर्यंत काम कराल.

अर्थ  तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे असे पर्याय तयार करा की तुम्ही काम करत नसला तरीही तुम्हाला उत्पन्न मिळत राहील.

 

3. पैसा हे सर्वस्व नाही. असे मूर्ख विधान करण्यापूर्वी तुम्ही भरपूर पैसा कमावल्याची खात्री करा.

अर्थ  आयुष्यात पैशाशिवाय काहीच होत नाही. पैसा असेल तर लोक तुम्हाला मान देतात.  

  1. कधीही एका इन्कम सोर्सवर (उत्पन्नाच्या स्रोतावर) अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणूक करा आणि दुसरे इन्कम सोर्स निर्माण करा.

अर्थ  कायम उत्पन्न सुरु राहील अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. दुर्दैवाने एका सोर्समधून नुकसान झाले तर तुमच्याकडे दुसरे सोर्स उपलब्ध असतील. 

  1. मला नेहमी माहित होते की मी श्रीमंत होणार आहे. मी एका मिनिटासाठीही यावर कधीही शंका घेतलेली नाही.

अर्थ  तुम्ही श्रीमंत होणार हा विश्वास तुम्हालाच तुमच्यात ठाम रुजवायचा आहे. आणि तुम्ही तो विश्वास काहीही झालं तरी कमी होऊ देता कामा नये. 

  1. मी वयाच्या अकराव्या वर्षी माझी पहिली गुंतवणूक केली. तोपर्यंत मी माझे आयुष्य वाया घालवत होतो.

अर्थ  गुंतवणूक करायला लवकरात लवकर सुरु करा. गुंतवणुक सुरु करायला वयाचे बंधन नाही. 

  1. तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका.

अर्थ – तुमची बचत किंवा गुंतवणूक एकाच गोष्टीत करू नका. त्यात विविधता असू द्या. 

  1. तुम्हाला बाकीच्यांपेक्षा हुशार असण्याची गरज नाही. तुम्ही इतरांपेक्षा अधिक शिस्तबद्ध असले पाहिजे. 

अर्थ – आयुष्य असो किंवा गुंतवणूक त्यात शिस्त आणि नियमितता असेल तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. 

  1. तुम्ही घर खरेदी करता तसे स्टॉक खरेदी करा आणि ते अशा प्रकारे समजून आणि आवडून खरेदी करा की कोणत्याही बाजाराच्या अनुपस्थितीत तुम्हाला त्या स्टॉकचे मालक असण्यात समाधान वाटेल.

अर्थ – तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करताना ते समजून, जोखून घ्या जेणेकरून त्यांच्यामधून चांगला परतावा मिळवताना तुम्हाला ते शेअर्स तुमच्या मालकीचे आहेत याचा नेहमीच अभिमान वाटेल. 

  1. नेहमी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा.

अर्थ – चांगल्या शेअर्समधील दीर्घकाळाची गुंतवणूक चांगला परतावा देणारी असते. 

  1. जर एखादा स्टॉक तुम्हाला दहा वर्षांच्या गुंतवणूकीच्या योग्यतेचा वाटत नसेल तर दहा मिनिटांसाठीही त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू नका.

अर्थ – स्टॉक खरेदी-विक्री करताना तुम्हाला त्याच्या परफॉर्मन्सची माहिती असणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्वक, तुम्हाला पटत नसलेल्या स्टॉक मध्ये पैसा न गुंतवणे हे एक प्रकारे पैसे वाचवण्यासारखे आहे. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी स्टॉक ठेवण्यास तयार नसाल तर तुम्ही अल्पकालीनही स्टॉक ठेवू नये. 

  1. कंपनीचा परफॉर्मन्स पाहताना कंपनीचा वार्षिक निकाल खूप गांभीर्याने घेऊ नका. त्याऐवजी, चार किंवा पाच वर्षांच्या सरासरी परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करा. 

अर्थ – एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी करताना केवळ एका वर्ष्याच्या नफ्यावर पाहून लगेच निर्णय घेऊ नका. त्याऐवजी त्या कंपनीच्या नफ्या-तोट्याचा मागील 4 ते 5 वर्षांच्या सरासरीचा आढावा विचारात घ्या. 

  1. तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेतलात, तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील. 

अर्थ – उगाच दुसऱ्याचं अनुकरण करून, घरात शोभेसाठी असाव्यात म्हणून किंवा ऐपत नसताना किंवा चैन म्हणून नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च केल्यास तुम्हाला भविष्यात मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरं जावं लागू शकतं. 

  1. मला आवडणाऱ्या, विश्वासू आणि कौतुकास पात्र लोकांसोबतच मी व्यवसाय करायला शिकलो.

अर्थ – व्यवसाय करताना चांगली, विश्वासू, आपल्याला आवडणारी समविचारी माणसे मिळाली की व्यवसायात यश मिळालंच समजा. 

  1. लक्षात ठेवा की शेअर बाजार हा एक कधी खूप उत्साह तर कधी खूप निराशा दाखवणाऱ्या खेळासारखा आहे. 

अर्थ – शेअर बाजार चढ-उतार, नफा-नुकसान या गोष्टी नेहमी होत असतात. त्यामुळं यात असलेली ही जोखीम लक्षात घेऊनच त्यात उडी मारणे योग्य आहे . 

  1. जर तुम्ही खड्ड्यात सापडला तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोदणं थांबवा.

अर्थ – आपले गुंतवणूकीचे अंदाज कधीतरी चुकू शकतात. जेव्हा ते चुकतात तेव्हा त्यावर अधिक पैसे गुंतवणे सर्वप्रथम  थांबवले पाहिजे. हा निर्णय घेणे कठीण आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या मोठा तोटा स्वीकारण्यापेक्षा ते अधिक फायदेशीर ठरेल.

  1. बहुतेक जण, बाकी लोक करतायत म्हणून स्टॉक खरेदी करतात पण स्टॉक खरेदी करण्याची खरी वेळ तेव्हा असते जेव्हा बाकी लोकांना त्या स्टॉक मध्ये इंटरेस्ट नसतो. तरच तो स्टॉक चांगला परतावा देऊ शकेल. 

अर्थ – जो स्टॉक खूप प्रसिद्ध असतो तो सर्वांकडेच असतो त्यामुळे त्याच्या विक्रीत खूप नफा मिळेल याची शक्यता कमी असते. ज्या गोष्टीची बाजारात कमतरता आहे, ती स्वतःकडे घेऊन ठेवणं आणि योग्य वेळ आल्यावर विकणं यात नफा कमावण्याची संधी मिळू शकते. 

 

  1. फक्त तुम्हाला नीट समजलेल्या ‘साध्या व्यवसायात’ गुंतवणूक करा. 

अर्थ – ज्या कंपनीचा बिझिनेस तुम्हाला आतून-बाहेरून नीट समजला आहे अशा साध्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करा. 

  1. पुस्तकी ज्ञानाने मोठे गुंतवणूकदार बनता आले असते तर सर्वच ग्रंथपाल श्रीमंत झाले असते. 

अर्थ – केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नका. अनुभव आणि व्यवहारी ज्ञानातून खरे जग कळते. 

  1. पैसा येईल आणि जाईल पण तुमचं शिक्षण, परिवार-मित्र, आणि नीतिमूल्ये कायम राहतील 

अर्थ – आजच्या तरुण पिढीसाठी सगळ्यात उत्तम गुंतवणूक ही शिक्षण, नातीगोती, स्वतःमधील नीतिमूल्यांचा विकास करणे ही आहे.  पैसा येईल आणि जाईल पण या गोष्टी तुम्हाला दीर्घकाळ साथ देतील.

हेही वाचा – Warren Buffett Quote : वॉरेन बफेट यांची जीवनाबद्दलची 20 उत्तम विधाने …

वॉरेन बफेट यांची ही विधाने आपल्याला बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी नक्कीच चांगला बोध देतात. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –