women ceo
women ceo
Reading Time: 3 minutes

 WOMEN CEO 

आज महिलांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावत आपल्या मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले वेगळे अस्ततिव निर्माण केले आहे. त्या आता विविध क्षेत्रात उच्च पद भूषवत आहेत. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  (Women’s Day 2022 )  आज आपण अशा काही भारतीय सीईओ विषयी जाणून घेणार आहोत.

लीना नायर

भारतीय वंशाच्या लीना नायरला  जागतिक दर्जाच्या फ्रेंच फॅशन डिझायनिंग फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलचे सीईओ बनवण्यात आले आहे. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या, त्यांचे शालेय शिक्षण येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीमधील वालचंद कॉलेज येथे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी जमशेदपूर येथून व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्याठिकाणी त्यांना सुवर्ण पदक सुद्धा प्राप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट 1992 मध्ये HUL अर्थात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करियरला सुरूवात केली. त्यानंतर लिप्टन फॅक्टरीसह तीन वेगवेगळ्या कंपनीमध्ये तिने व्यवस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लीना नायर 2013 मध्ये युनिलिव्हरच्या HR बनल्या. त्या कंपनीच्या विविधतेच्या जागतिक प्रमुख देखील बनल्या. त्यानंतर 2016 मध्ये त्या लंडनमधील ULE युनिलिव्हर लीडरशिप एक्झिक्युटिव्ह मध्ये सामील झाल्या. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या कार्याचा अनुभव पाहूनच त्यांना या नव्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी…

 

रेवती अद्वैती 

रेवती अद्वैती (54) या फ्लेक्सच्या सीईओ आहेत. फ्लेक्स ही जगातील सर्वात मोठ्या बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे. रेवतीने फेब्रुवारी-2019 मध्ये CEO म्हणून पदभार स्वीकारला आणि कंपनीची धोरणात्मक दिशा आणि तंत्रज्ञान नवकल्पना व्यवस्थापित केली. ती Uber आणि Catalyst.org या दोन्ही बोर्डांच्या स्वतंत्र संचालक आणि MIT अध्यक्षीय CEO सल्लागार मंडळाच्या सदस्या देखील आहेत. भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या अद्वैतीने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री केली. आणि थंडरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट मधून एमबीए केले आहे.

शर्मिष्ठा दुबे

शर्मिष्ठा दुबे, 51, या मॅच ग्रुपच्या सीईओ आहेत. मॅच ग्रुप हा $40 बिलियन तंत्रज्ञान समूह आहे. Tinder, OkCupid, Hinge आणि PlentyOfFish सारखे अनेक ऑनलाइन डेटिंग ऍप्लिकेशन्स या गटाचा भाग आहेत. जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या शर्मिष्ठाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि नंतर ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमएस केले.

रेश्मा केवलरामानी

रेश्मा केवलरामानी 2017 मध्ये व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स या अमेरिकन बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून कंपनीत सामील झाल्या. व्हर्टेक्समध्ये मध्ये काम करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी आणि ग्लोबल मेडिसिन डेव्हलपमेंट आणि मेडिकल अफेयर्सच्या कार्यकारी अध्यक्ष होत्या.  त्यांनी  बायोफार्मास्युटिकल कंपनी Amgen मध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला. तेथे त्यांनी संशोधन आणि विकासात विविध भूमिका बजावल्या.

हेही वाचा – गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग १)…

 

सोनिया सिंगल

अमेरिकन-कॅनेडियन उद्योगपती सोनिया सिंगल या Gap Inc. च्या अध्यक्षा आणि CEO आहेत. एक अमेरिकन जगभरातील कपडे-अॅक्सेसरीज रिटेलर कंपनी आहे. फॉर्च्युन 500 कंपनीच्या  भारतीय अमेरिकन महिला सीईओ म्हणून सोनियाचाही समावेश करण्यात आला.

जयश्री उल्लाल 

जयश्री उल्लाल 2008 पासून अरिस्ता नेटवर्क्स या संगणक नेटवर्किंग फर्मच्या (जगातील सर्वात शक्तिशाली सीईओ) च्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ती जगातील 72 सेल्फ मेड महिला अब्जाधीशांपैकी एक आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या आणि नवी दिल्लीत वाढलेल्या उल्लालने सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग केले आणि नंतर सांता क्लारा विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. उल्लाल यांनी फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर, सिस्को आणि एएमडीमध्येही काम केले आहे.

अंजली सूद

अंजली सूद यांची 2017 मध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Vimeo च्या CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अंजलीने 2005 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बीएससी आणि 2011 मध्ये हार्वर्डमधून एमबीए केले. 2014 मध्ये, त्यांनी Vimeo येथे विपणन संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर कंपनी त्यांच्या कामाने इतकी प्रभावित झाली की 2017 मध्ये त्यांना Vimeo चे CEO बनवण्यात आले.

हेही वाचा – आर्थिक नियोजन आणि स्त्री – आर्थिक सल्लागाराच्या नजरेतून…

 

पद्मश्री वॉरियर

तंत्रज्ञानातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक मानल्या जाणार्‍या, पद्मश्री वॉरियर या फेबलच्या संस्थापक आणि CEO आहेत . या कंपनीची स्थापना 2019 मध्ये झाली. पद्मश्री यांनी सिस्को आणि मोटोरोलाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणूनही काम केले.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –