gudipadwa 2022
gudipadwa 2022
Reading Time: 2 minutes

Gudipadwa 2022

आज गुढीपाडवा! तमाम मराठी जनतेसाठी नवीन आशा पल्लवित करणाऱ्या या सणवार यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी आपल्या उत्पन्नाचे साधन, जीवलग व्यक्ती गमावल्या आहेत. पुढच्या वर्षी कोरोनमुक्त गुढीपाडवा साजरा करू, ही आशा यावर्षीही कायम आहे. पण तरीही निराश होऊ नका. आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही मात करण्यात आपल्याला यश मिळेल.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. पण, परिस्थितीला घाबरून  न जाता धीराने तोंड द्या.

 

१. एक गुढी अर्थसाक्षरतेची 

 • यावर्षी गुढीपाडव्याला अर्थसाक्षरतेचा संकल्प करा. अर्थसाक्षर.कॉमने वेळोवेळी अर्थसाक्षरतेचे महत्व पटवून देणारे व त्यासाठी मार्गदर्शन करणारे लेख प्रसिद्ध केले आहेत
 • बचत, गुंतवणूक, विमा, आपत्कालीन निधी, इ. गोष्टींचे महत्व अधोरेखित करून त्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
 • सध्या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचे परिणाम खूप काळ राहणार हे निश्चित. अशा परीस्थितीत आपली कौटूंबिक अर्थव्यवस्था ढासाळली असेल, तर नव्या उमेदीने पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्या.
 • लक्षात ठेवा अनेकांनी या कठीण परिस्थिती आपले नशीब घडवले आहे.

 

हेही वाचा – असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण गुढीपाडवा

‘ब’ बत्तासे आणि बचतीचा –

 • गुढीला बत्तास्यांची माळ घालताना आपल्या बँक खात्यातही एक माळ चढवा, बचतीची!
 • यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खरेदीच्या अनेक योजना तुम्हाला रद्द कराव्या लागल्या असतील. गेले वर्षभर पेट्रोल, बाहेरचं खाणं, चित्रपट, इत्यादींवर खर्च  होणारे सर्व पैसे वाचले आहेत. त्यामुळे एकप्रकारे बचत झालीच आहे.
 • पुढे काय होईल काही सांगता येत नाही, ही परिस्थिती सुधारायला वेळ लागणार आहे. त्यामुळे बचतीचा योग्य विनियोग  करा.
 • बचतीचे महत्व या संकटाने पटवून दिले आहे. आता परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती बदलण्याचा प्रयत्न करा.

. गोडवा सकारात्मक मानसिकतेचा 

 • कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाने जगण्याचे सगळे संदर्भच बदलून गेले आहेत. अनेकांच्या अर्थाजनाचे मार्ग बंद झाले असतील. पण लक्षात ठेवा रात्रीच्या उदरात नेहमी उजेडाची पहाट दडलेली असते.
 • या कठीण प्रसंगातही सकारात्मक विचार करा. कारण नकारत्मक मानसिकतेने परिस्थिती सुधारत नाही उलट ती अजूनच बिघडते. याउलट सकारात्मक विचारसरणी संकटातून सुटण्याचे विविध मार्ग दाखवते. म्हणूनच सकारात्मक राहा.
 • सकारात्मक राहण्यासाठी एलोन मस्क, युवराज सिंग यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवनगाथा वाचा त्यातून सकारात्मक संदेश मिळेल.

 सजावट आरोग्य विम्याची –

 • गुढीपाडव्याला ज्याप्रमाणे गुढीसमोर फुलांची व रांगोळीची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये आरोग्य विम्याची सजावट असू दे.
 • कोरोनाच्या संकटाने आरोग्य विम्याचे महत्व पटवून दिलेले आहेच. त्यामुळे आरोग्य विमा घेतला नसेल, तर या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तो  घ्या. घेतला असेल, तर त्याचे नूतनीकरण कधी आहे ते तपासा.
 • बहुतेक सर्व विमा कंपन्या “कोरोना व्हायरस”च्या ट्रीटमेंटचा खर्च ‘कव्हर’ करत आहेत. परंतु तरीही त्यासंदर्भात एकदा नियम व अटी समजून घ्या.

 

हेही वाचा – गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

 

गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. तो आपल्या कुटुंबासोबत घरात राहूनच आनंदाने साजरा करा. या गुढीपाडव्याला आर्थिक नियोजनाची नव्याने सुरवात करा. जर अगोदरपासूनच नियोजन करत असाल, तर त्याचा आढावा घ्या. परिस्थिती कठीण आहे पण शेवटी रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल लपलेला असतो, हे लक्षात ठेवा.

टीम अर्थसाक्षरतर्फे ‘अर्थ’पूर्ण व आरोग्यदायी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –