PM care for children
PM care for children
Reading Time: 3 minutes

PM Care for Children Scheme

 मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीने जगभरात चांगलंच थैमान घातलं. या महामारीमध्ये भारतामध्येही मोठं नुकसान झालं. 

  • लाखोंच्या संख्येमध्ये कोरोनामुळे लोकं मृत पावली. कित्येकांनी आपले आई-वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्रपरिवार या महामारीत गमावले. 
  • ज्यांच्या डोक्यावरचं छत्रचं गेलं अशांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम‘(PM CARES for Children Scheme). 
  • २९ मे २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबाबत अधिकृत घोषणा केली. 
  • कोरोना महामारीमध्ये ज्या पाल्यांनी आपले आई-वडील गमावले अशांना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मदत करत आहे. 
  • अजूनही या योजनेबद्दल कित्येक गरजूवंतांना माहिती मिळालेली  नाही अशी परिस्थिती आहे. आपण या लेखात या योजनेची माहिती घेऊया – 

हेही वाचा – Third-Party Administrator (TPA) : आरोग्य विम्यामध्ये TPA म्हणजे काय?

पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम‘ 

  • ११ मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कालावधीपासून ज्या ज्या पाल्यांनी आपले कायदेशीर पालक किंवा दत्तक पालक किंवा हयात असलेले पालक दोघेही कोविड-19 महामारीमुळे गमावले आहेत अशांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीमकेंद्र सरकारने सुरु केली आहे.
  • या योजनेअंतर्गत सदरील पाल्यांना सरकारतर्फे आरोग्य, शिक्षण आणि इतरही गोष्टींमध्ये आर्थिक मदत केली जाणार आहे. 
  • या योजनेअंतर्गत वय वर्ष २३ होईपर्यंत ही मदत केली जाणार आहे.  
  • मुलांची जास्तीत जास्त काळजी घेणे, आरोग्य विम्याद्वारे त्यांना आरोग्य संरक्षण देणे, शिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीमसाठी अशी असणार पात्रता

१. सर्व मुले ज्यांनी आपल्या पालकांना गमावले आहे

२. सर्व मुले ज्यांनी आपल्या कायदेशीर पालक/दत्तक पालक/एकल दत्तक पालक यांना गमावले आहे

३. कोरोना महारामारीमुळे ११ मार्च २०२० पासून तर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत डब्ल्यूएचओने (World Health Organisation) दिलेल्या नियमांनुसार ज्यांनी पालकांना गमावले आहे अशी पाल्ये या योजेनचा लाभ घेण्यासाठी पात्र

४. पालकांच्या मृत्यूवेळी मुलाचे वय १८ वर्ष पूर्ण नसावे. 

हेही वाचा – Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीमचे फायदे काय आहेत ?

१. या योजनांतर्गत मुलांना एक हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतची मदत सदरील मुलांना मिळणार आहे. मुलांची नोंदणी करण्यासाठी सरकारने पोर्टल सुरु केले आहे. पोर्टलद्वारे मुलांचे नाव मंजूर करण्याची प्रक्रिया आणि इतर सर्व कामे सहज करता येणार आहेत.

२. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी महिन्याला ४ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

३. शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी मदत केली जाणार, शैक्षणिक कर्जावरील व्याज पीएम केअर्समधून दिले जाईल.

४. ६ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी प्री-स्कूल आणि शालेय शिक्षणासाठी सहाय्य केले जाणार. सोबतच पूरक पोषण, प्री-स्कूल शिक्षणासाठी अंगणवाडी सेवा/ ECCE, लसीकरण, आरोग्य संदर्भ आणि आरोग्य तपासणीसाठी सरकारकडून मदत केली जाणार

५. १० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी डे स्कॉलर म्हणून कोणत्याही जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाईल, यामध्ये सरकारी/सरकारी अनुदानित शाळा/केंद्रीय विद्यालय /खाजगी शाळा यांचा समावेश असेल

सरकारी शाळांमध्ये मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे दोन संच दिले जातील

खाजगी शाळांमध्ये RTE कायदा 12(1)(c)कलमांतर्गत शिक्षण शुल्कात(शाळेच्या फीमध्ये) सूट दिली जाईल 

६. ज्यांनी आपले पालक गमावले आहेत अशा १० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना जर कोणी(नातेवाईक) सांभाळत नसेल तर त्यांना सरकारतर्फे काळजी घेणाऱ्या संस्थांमध्ये दाखल करण्यात येईल उदा. सुभाषचंद बोस आवासीय विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, एकलव्य मॉडेल स्कूल, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, किंवा जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अधीन असलेली इतर कोणतीही निवासी शाळा

७. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजना, मंत्रालय आदिवासी व्यवहार, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि उच्च विभाग शिक्षण, राष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून अभ्यासक्रम/भारतातील उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना मदत केली जाईल/ शिष्यवृत्ती देण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी पोर्टल स्थापन करण्यात आले आहे.

आरोग्य विमा योजना

१. आयुष्मान भारत अंतर्गत सर्व मुलांची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात येईल आणि आरोग्य विमा योजनेअंतर्गत ५ लाखांची उपलब्धी असेल

२. पीएम केअर अंतर्गत ओळखल्या गेलेल्या मुलाची खात्री केली जाईल PM JAY अंतर्गत त्यांना चिल्ड्रेन स्कीमचे फायदे मिळवून देण्यात येतील.

३. मुलांचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला महिन्याला एक रक्कम देण्यात येईल

४. २३ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर मुलांना १० लाख रुपयांची मदत करण्यात येईल

या योजनेमार्फत केंद्र सरकारने सर्वस्व गमावलेल्या मुलांच्या आयुष्यात नवीन आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा – Undervalued stock indicators : शेअर ‘ओव्हरव्हॅल्यू’ आहे की ‘अंडरव्हॅल्यू’  कसे ओळखाल ?

तुमच्या संपर्कात असलेल्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…