Mazi Kanya Bhagyashree Yoana 2021
Reading Time: 3 minutes

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१

दि. १ एप्रिल २०१६ रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या योजनेमध्ये काही स्वागतार्ह बदल करण्यात आले असून,  ‘माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१’ नुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर मुलींना याचा लाभ होणार आहे. आजच्या लेखात आपण या योजनेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, इ. बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत. 

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: योजेनेचे स्वरूप

“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.

  • प्रकार-१: एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
  • प्रकार-२: दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ घेता येतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास  या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: लाभाचे स्वरूप

  • माझी कन्या भाग्यश्री ही योजना संपूर्ण राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे. 
  • कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी  १ वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे. 
  • जर एका कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तरच दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रधानमांत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते (Joint Account) उघडण्यात येईल. यामध्ये ५००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.
  • या योजनेअंतर्गत शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. ५०,००० मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. २५०००)
  • जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी ६ वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी १२ वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला  योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. परंतु, योजनेची संपूर्ण रक्कम काढण्यासाठीची महत्वाची अट म्हणजे मुलीने किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि ती अविवाहित असावी.
  • सदर योजनेचा लाभ ऑगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल. जर पहिली मुलगी ऑगस्ट २०१७ पूर्वी व दुसरी मुलगी त्यांनतर जन्मलेली असेल आणि आईने नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असेल तर दुसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ रु. २५००० घेता येईल.
  • या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल. 
  • दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल. 

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१ – आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • बँक खात्याचे पासबुक
  • उत्पन्नाचा दाखल 
  • रहिवासी दाखल 
  • मुलीचा जन्मदाखला
  • पासपोर्ट साइज फोटो

माझी कन्या भाग्यश्री योजना – कसा कराल अर्ज?

  • सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील
  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही सदर योजनेचा डाउनलोड करता येईल. 
  • अर्जासोबत वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडून त्यासोबत जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे .
  • सदर अर्ज व कागदपत्रे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करावा. 
  • या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

कुटुंबात मुलीच्या जन्माचेही स्वागत व्हावे आणि एक कळी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही उमलावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. एकंदरीत या योजनेचे स्वरूप बघता ही योजना यशस्वी होईल अशी आशा करायला हरकत नाही.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021, Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021 in Marathi, Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021 Marathi Mahiti, Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021 how to apply, Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021 eligibility criteria, Mazi Kanya Bhagyashree Yojana 2021 important documents , MKBY in Marathi, MKBY Marathi Mahiti, MKBY 2021 Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesPhule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutesबँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…