https://bit.ly/2FGtVKf
Reading Time: 2 minutes

ELSS: ईएलएसएस

जर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

म्युच्युअल फंड म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते, तर काहींना दिवाळखोरीचं लक्षण वाटतं. समज- गैरसमजाच्या या चक्रात अडकलेल्या अनेकांनी म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? याबद्दल पुरेशी माहिती नसते. तर अनेकांना म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम परताव्यासोबत कर बचतही करते या गोष्टीची माहिती नसते. जानेवारी ते मार्च  हा कालावधी म्हणजे आपल्या कर नियोजनाचा कालावधी असतो. या दरम्यान सर्वात जास्त महत्व असतं ते करबचत करणाऱ्या गुंतवणुकीला.

हे नक्की वाचा: Guaranteed Return: खात्रीशीर परताव्याचा अट्टाहास…

एलएसएस (ELSS):

  • म्युच्यअल फंड गुंतवणुकींपैकी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम (ELSS) हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. हे फंड समभागांमध्ये (Equity) गुंतवणूक करतात.
  • यामध्ये गुंतवणूकदाराला दोन पर्याय उपलब्ध असतात-  १. लाभांश आणि २. वृद्धी.  
  • गुंतवणूकदार त्याच्या इच्छेने कोणताही पर्याय निवडू शकतो.
  • ईएलएसएसमध्ये कर बचतीसाठीची गुंतवणूक मर्यादा रु. १,५०,०००/- इतकी आहे म्हणजेच गुंतवणूकदार यामध्ये  दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
  • ईएलएसएस हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असून यामध्ये गुंतवलेली रक्कम समभागांमध्ये (Equity) गुंतवली जात असल्यामुळे यामधून चांगला परतावाही मिळतो.
  • असे असले तरीही ही एक म्युच्युअल फंड योजना आहे. त्यामुळे अन्य म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच निश्चित परताव्याची कोणतीही हमी या योजनेमध्येही मिळत नाही.

ईएलएसएस गुंतवणूक (ELSS Investment):

  • यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रियाही इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच आहे.
  • यामधील सर्वात आधी गुंतवणूकदाराची केवायसी पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • त्यांनतर आवश्यक ते अर्ज भरून चेकच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक करता येते.
  • म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवर जाऊन किंवा अन्य खात्रीशीर ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करता येते.
  • एसआयपी (SIP) अथवा एसटीपी (STP)पद्धत वापरून ईएलएसएस गुंतवणूक करता येते.

महत्वाचा लेख: IPO: आयपीओ गुंतवणूक करताना विचारात घ्या या महत्वाच्या गोष्टी

ईएलएसएस गुंतवणूक आणि करबचत:

  • ईएलएसएस गुंतवणूकीसाठी लॉक-इन (Lock- in) कालावधी हा तीन वर्षांचा असतो. गुंतवणूक करताना तुम्ही लाभांश (Dividend) हा पर्याय  निवडलेला असल्यास योजना कालावधीमध्ये उत्पन्न सुरू होते.
  • आयकर कायदा १९६१, कलम ८० सी अन्वये ज्यांचे करपात्र (Taxable) उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त संस्था (HUF) करबचतीसाठी आर्थिक वर्षांमध्ये कमाल रु. १,५०,०००/- रुपयांपर्यंत ईएलएसएस गुंतवणूक करू शकतात.
  • ईएलएसएस गुंतवणूकीतून मिळणाऱ्या लाभांशावर कर भरावा लागत नाही. तसेच काही आर्थिक अडचणींमुळे गुंतवणुकीदरम्यान काही रक्कम काढावी लागली तर या रकमेवरही कर भरावा लागत नाही.

ईएलएसएस वि. अन्य करबचत योजना:

  • लॉकइन कालावधी:
    • ईएलएसएस गुंतवणुकीसाठी  लॉकइन कालावधी सर्वात कमी म्हणजेच  तीन वर्षांचा असतो.
    • हा कालावधी अन्य करबचत योजनांच्या तुलनेत खूप कमी आहे.
      • सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – १५ वर्षे
      • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF)- निवृत्तीपर्यंत  
      • राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) – गुंतवणूकदाराच्या ६० वर्षे वयापर्यंत
      • अन्य करबचत योजना – साधारणतः ५ वर्षांपासून पुढे
  • आर्थिक अडचणींमध्ये रक्कम काढावी लागल्यास:
    • काही आर्थिक अडचणींमुळे गुंतवणुकीदरम्यान काही रक्कम काढावी लागल्यास गुंतवणूकदार रक्कम काढू शकतो.
    • पीपीएफ वगळता अन्य पर्यायांमध्ये अशी रक्कम काढता येत नाही.
      • ईपीएफ-  नोकरी सुरू असेपर्यंत रक्कम काढता येत नाही .
      • राष्ट्रीय पेन्शन योजना – गुंतवणूकदाराच्या ६० वर्षे वयापर्यंत नाही.

विशेष लेख: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

ईएलएसएस गुंतवणुकीमधील लॉक इन पश्चातचे पर्याय:

तीन वर्षांच्या लॉक इन कालावधीनंतर म्युच्युअल फंडांतील युनिट्स त्या योजनेतच ठेवण्याचा पर्याय गुंतवणूकदारांसमोर उरतो. इक्विटी वाटपासाठी ईएलएसएसचा पर्याय निवडण्याचा सल्ला आर्थिक सल्लागार  देतात.

महत्वाचे मुद्दे:

  • ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या अधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी कर सल्लागाराचा वा आर्थिक सल्लागाराची सल्ला जरूर घ्यावा.
  • म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रु. १ लाखाच्या वरील भांडवली नफ्यावर १०% कर आकारला जातो (capital gain tax). याचाच अर्थ रु. १ लाखांपर्यंतचा भांडवली नफा हा करमुक्त आहे. एकूणच ‘ईएलएसएस’ हा करबचतीचा एक सर्वोत्तम पर्याय आहे याबद्दल मात्र कोणतीही शंका नाही.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…