- इन्कम टॅक्स म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. अनेकांचा असा समाज आहे की जगातील इतर विकसित अथवा विकसनशील देशांशी तुलना करता भारतामध्ये करदायित्व (Tax Liability) जास्त आहे.
- पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. KPMG च्या सर्वक्षणानुसार जगातील इतर विकसित अथवा विकसनशील देशांचा विचार केला तर सिंगापूर वगळता बहुतांश विकसित देशांमध्ये करदायित्वाची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नेदरलँड, जपान या देशांमध्ये तर वैयक्तिक करदायित्व (Personal Tax Liability) ५०% पेक्षा जास्त आहे तर जर्मनी, चीन यासारख्या देशांमध्ये ४०% पेक्षा जास्त आहे. अमेरिकेमध्येही ही टक्केवारी ३९.६% म्हणजेच जवळपास ४०% आहे. भारतात मात्र हेच आकडे ३५.५४% इतके आहेत. अर्थात या इतर देशातील सोयी सुविधांचा व सुरक्षा योजनांचा विचार केल्यास भारतापेक्षा कितीतरी पटीने हे देश सरस आहेत.
- भारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेचा (Salary Structure ) विचार केल्यास असे लक्षात येतं की यामध्ये करदायित्व कमी करण्यास भरपूर वाव आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास कारदायीत्व कमी करणे ही तशी कठिण गोष्ट नाही. यासाठी प्रामुख्याने –
१. पगार रचना (Salary Structure)
२. त्यामधील करपात्र घटक
३. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या करसवलती
या तीन गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे भारतामध्ये पगार रचना ही प्रामुख्याने
- बेसिक पगार (Basic Salary),
- महागाई भत्ता (DA ), प्रवासाभत्ता (conveyance allowance), घरभाडे भत्ता (HRA ),
- शैक्षणिक भत्ता (Children Education Allowance),
- हॉस्टेल भत्ता (Hostel Allowance for children),
- प्रवासभत्ता (LTA),
- फोन भत्ता (Telephone allowance ),
- बोनस,
इत्यादींमध्ये विभागलेला असतो. याशिवाय युनिफ़ॉर्म भत्ता, रजा रोखीकरण (leave encashment ) पुस्तकभत्ता (Book allowance ) असे इतर काही प्रकारचे भत्ते प्रत्येक कंपनीच्या पॉंलिसी नुसार कंपनी देत असते. प्रत्येक कंपनीसाठी हे भत्ते असतातच असं नाही.
करदायित्व
आधी आपण भारतात नोकरी करत असलेल्या व्यक्तीच्या पगाररचनेनुसार बेसिक व वेगवेगळ्या प्रकारच्या भत्त्यांच्या करदायित्वाची माहिती घेवूया.
खालील तक्ता सवलतींचा लाभ जास्त स्पष्ट करून सांगेल.
पगाररचनेनुसर वर्गीकरण (Salary heads) | करदायित्व (Tax liability) |
बेसिक (Basic) | संपूर्णत: करपात्र |
विविध भत्ते | |
महागाई भत्ता (DA) | संपूर्णत: करपात्र |
घरभाडे भत्ता (HRA) | अंशत: करपात्र
खालीलपैकी जी रक्कम कमी असेल ती-
– जर तुम्ही वर्षाकाठी १ लाख रुपात्यांपेक्षा घरभाडे भरत असाल तर तुमच्या एम्प्लॉयरला घरमालकाचा पॅन कार्ड नंबर देणे बंधनकारक आहे. |
वाहतूक खर्च (Transport allowance) आणि मेडिकल रीएम्बर्समेंट |
|
प्रवासभत्ता (LTA) |
|
शैक्षणिक भत्ता (Children Education Allowance)
(कलम १० (१४) आणि नियम २ बीबी) |
अंशतः करपात्र
|
हॉस्टेल भत्ता (Hostel Allowance for children)
(कलम १० (१४) आणि नियम २ बीबी) |
अंशतः करपात्र
|
बोनस | संपूर्णत: करपात्र |
फोन भत्ता (Telephone allowance ) | बिलाची रक्कम कंपनी (Employer) भरत असल्यास करमुक्त |
इतर भत्ते | |
भोजन कूपन: |
|
युनिफॉर्म भत्ता | करमुक्त
|
रजा रोखीकरण (leave encashment) |
|
पुस्तकभत्ता (Book allowance) | करमुक्त |
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2W4iq4K)
टीम अर्थसाक्षर तर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
करबचतीचे सोपे मार्ग, घरभाडे भत्ता (HRA) आणि इन्कम टॅक्स वजावट,
घरभाडे भत्ता- House Rent Allowance (HRA), सॅलरी स्लीप कशी समजून घ्यावी
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.