Reading Time: 3 minutes
  • इन्कम टॅक्स म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. अनेकांचा असा समाज आहे की जगातील इतर विकसित अथवा विकसनशील देशांशी तुलना करता भारतामध्ये करदायित्व (Tax Liability) जास्त आहे.
  • पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. KPMG च्या सर्वक्षणानुसार जगातील इतर विकसित अथवा विकसनशील देशांचा विचार केला तर सिंगापूर वगळता बहुतांश विकसित देशांमध्ये करदायित्वाची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नेदरलँड, जपान या देशांमध्ये तर वैयक्तिक करदायित्व (Personal Tax Liability) ५०% पेक्षा जास्त आहे तर जर्मनी, चीन यासारख्या देशांमध्ये ४०% पेक्षा जास्त आहे. अमेरिकेमध्येही ही टक्केवारी ३९.६% म्हणजेच जवळपास ४०% आहे. भारतात मात्र हेच आकडे ३५.५४% इतके आहेत. अर्थात या इतर देशातील  सोयी सुविधांचा व सुरक्षा योजनांचा विचार केल्यास भारतापेक्षा कितीतरी पटीने हे देश सरस आहेत.
  • भारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेचा (Salary Structure ) विचार केल्यास असे लक्षात येतं की यामध्ये करदायित्व कमी करण्यास भरपूर वाव आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास कारदायीत्व कमी करणे ही तशी कठिण गोष्ट नाही. यासाठी प्रामुख्याने –

१. पगार रचना (Salary Structure)

२. त्यामधील करपात्र घटक

३. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या करसवलती

या तीन गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

पगार रचना (salary structure):

सर्वसाधारणपणे भारतामध्ये पगार रचना ही प्रामुख्याने

  • बेसिक पगार (Basic Salary),
  • महागाई भत्ता (DA ), प्रवासाभत्ता (conveyance allowance), घरभाडे भत्ता (HRA ),
  • शैक्षणिक भत्ता (Children Education Allowance),
  • हॉस्टेल भत्ता (Hostel Allowance for children),  
  • प्रवासभत्ता (LTA),
  • फोन भत्ता (Telephone allowance ),
  • बोनस,

इत्यादींमध्ये विभागलेला असतो. याशिवाय युनिफ़ॉर्म भत्ता, रजा रोखीकरण (leave  encashment ) पुस्तकभत्ता (Book allowance ) असे इतर काही प्रकारचे भत्ते प्रत्येक कंपनीच्या पॉंलिसी नुसार कंपनी देत असते. प्रत्येक कंपनीसाठी हे भत्ते असतातच असं नाही.

करदायित्व

आधी आपण भारतात नोकरी करत असलेल्या व्यक्तीच्या  पगाररचनेनुसार बेसिक व वेगवेगळ्या प्रकारच्या भत्त्यांच्या करदायित्वाची माहिती घेवूया.

खालील तक्ता सवलतींचा लाभ जास्त स्पष्ट करून सांगेल. 

पगाररचनेनुसर वर्गीकरण (Salary heads) करदायित्व (Tax liability)
बेसिक (Basic) संपूर्णत: करपात्र
विविध भत्ते
महागाई भत्ता (DA) संपूर्णत: करपात्र
घरभाडे भत्ता (HRA) अंशत: करपात्र

खालीलपैकी जी रक्कम कमी असेल ती-

  • पगारामध्ये मिळालेला घरभाडे भत्ता
  • बेसिक + महागाई भत्ता (DA ) च्या १०% रक्कम भाडे
  • बेसिक च्या  ४०% [ मेट्रो सिटी(महानगरासाठी)-५०% ]

– जर तुम्ही वर्षाकाठी १ लाख रुपात्यांपेक्षा घरभाडे भरत असाल तर तुमच्या एम्प्लॉयरला घरमालकाचा पॅन कार्ड नंबर देणे बंधनकारक आहे.

वाहतूक खर्च (Transport  allowance) आणि मेडिकल रीएम्बर्समेंट
  • आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्रवासाभत्ता (Transport  allowance) आणि मेडिकल रीएम्बर्समेंट करमुक्त नाहीत.परंतु प्रवासाभत्ता (Transport  allowance) आणि मेडिकल रीएम्बर्समेंटसाठी सरसकट ४००००/- रुपयांपर्यंतची वजावट (standard deduction) जाहीर करण्यात आली आहे.
  • ऑर्थोपेडिक व्यक्तीसाठीचा रु.३२००/- पर्यंतचा  प्रवासभत्ता अजूनही करमुक्त आहे.
प्रवासभत्ता (LTA)

  • केवळ प्रवास खर्च (Travelling Expenses) करमुक्त (प्रवासखर्चामध्ये फक्त प्रवासाचा खर्च उदा. रेल्वे, बस, इत्यादीचे तिकीट ग्राह्य धरले जाते. राहण्याचा व जेवण्याचा खर्च, फिरण्याचा खर्च यामध्ये धरला जात नाही.)
  • प्रवासभत्ता  मिळविण्यासाठी सदर प्रवासाची बिले एम्प्लॉयरकडे सादर करणे आवश्यक आहे
  • ४ वर्षांतून दोन वेळा कुटुंबासहित केलेल्या देशांतर्गत सहलींसाठी प्रवासभत्ता मिळू शकतो.  .
शैक्षणिक भत्ता (Children Education Allowance)

(कलम १० (१४) आणि नियम २ बीबी)

अंशतः करपात्र

  • दोन मुलांसाठी करवजावटीचा  लाभ मिळतो
  • रु. १००/- प्रतिमाह प्रती मुलामागे म्हणजेच जास्तीत जास्त रु. २००/- प्रतीमाह व रु. २४००/- प्रतीवर्ष.
  • बँकेमध्ये जमा झालेली शिष्यवृत्ती (scholarship) करमुक्त
हॉस्टेल भत्ता (Hostel Allowance for children)

(कलम १० (१४) आणि नियम २ बीबी)

अंशतः करपात्र

  • दोन मुलांसाठी करवजावटीचा  लाभ मिळतो
  • रु. ३००/- प्रतिमाह प्रती मुलामागे म्हणजेच जास्तीत जास्त रु. ६००/- प्रतीमाह व रु. ७२००/- प्रतीवर्ष
बोनस संपूर्णत: करपात्र
फोन भत्ता (Telephone allowance ) बिलाची रक्कम कंपनी (Employer) भरत असल्यास करमुक्त
इतर भत्ते
भोजन कूपन:
  • सोडेक्सो किंवा तिकिट सारखे जेवण कूपन कर मुक्त आहेत.  
  • यासाठी प्रति भोजन ५०/- रुपये या हिशोबाने प्रतिमाह  २२ दिवस (ऑफिसचे दिवस) २ वेळा जेवण घेतल्यास दरमहा २,२००/- रु. पर्यंतचे कूपन कर मुक्त होते. म्हणजेच प्रतिवर्ष २६,४००/-रुपये करमुक्त.
युनिफॉर्म भत्ता करमुक्त

  • रु. २४०००/- पर्यंत ड्रेसकोड असणाऱ्या कंपनीचा युनिफॉर्म खरेदी केल्यास ती रक्कम करमुक्त असते..
रजा रोखीकरण (leave  encashment)
  • संपूर्णत: करपात्र (इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ च्या कलम १०(१०अअ) मधील तरतुदीनुसार)
  • निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रजा रोखीकरणाच्या रकमेपैकी रु. ३,००,०००/- पर्यंत करमुक्त
पुस्तकभत्ता (Book allowance) करमुक्त

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2W4iq4K)

टीम अर्थसाक्षर तर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

करबचतीचे सोपे मार्गघरभाडे भत्ता (HRA) आणि इन्कम टॅक्स वजावट,

घरभाडे भत्ता- House Rent Allowance (HRA)सॅलरी स्लीप कशी समजून घ्यावी

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…