११ सवयी आयुष्य बदलतील
Reading Time: 3 minutes

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

सर्वसामान्यपणे कोणताही नियम अंगी बाणवायचा असेल, त्याला आपल्या सवयीचा भाग बनवायचा असेल, तर सलग २१ दिवस ती गोष्ट पाहिजे. एक संकल्प करा आणि त्याचे पालन सातत्य आणि शिस्तिने २१ दिवस करा. तुम्हाला त्या संकल्पाची सवय लागलेली असेल. यशाची शिखरे गाठणारे लोक त्यांच्या नियमित सवयीसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे तुम्हालाही आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी अंगी बाणवा आणि बघा तुमचे आयुष्य बदलेले असेल. आजच्या लेखात आपण अशा  ११ सवयींची माहिती घेणार आहोत, ज्या तुमचे आयुष्य बदलतील. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

१. पुरेशी झोप:

“लवकर उठे लवकर निजे”, पूर्वापार चालत आलेला हा कानमंत्र आजही तितकाच रास्त आहे. सर्वात महत्वाची आणि चांगली सवय म्हणजे लवकर झोपणे आणि लवकर उठणे. आजच्या काळात मोबाईल, काम अभ्यास या सगळ्या धावपळीमध्ये आपले जैविक घड्याळ (biological clock) बिघडले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी रात्रीची ११ ते ५ मधली झोप हा उपाय आहे.

२. व्यायाम:- 

शारीरिक स्वस्थ जपण्यासाठी महत्वाची सवय म्हणजे नियमित व्यायाम. कोणत्या वयाचे तुम्ही असाल, लहान, तरुण, प्रौढ, वृध्द किंवा स्त्री, पुरुष कोणीही तुमच्या गरजेनुसार आणि तब्येतीनुसार सल्ला घेऊन व्यायाम करणे करणे गरजेचे आहे. सकाळी चालायला जाणं, योग, झुंबा, ऍरोबिक्स, जिम किंवा मैदानी खेळ अशा कोणत्याही प्रकारे तुमच्या शरीराला व्यायामाची शिस्त लागणे गरजेचे आहे. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे क्लासेसही उपलब्ध आहेत. 

३. खाण्याच्या वेळा:- 

तुम्ही खाण्याच्या वेळांच्या बाबतीत वक्तशीर असले पाहिजे. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तीन वेळा तर नक्कीच ठरवून घ्याव्यात. त्यातही तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन किती वेळा खावे हे ठरवावे पण वेळ मात्र पक्की करावी. वयानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचा आहार ठरवा. शुद्ध आणि पौष्टिक आहाराची सवय तुमचे आरोग्य सदासर्वदा संपन्न ठेवेल. जिभेवर ताबा मिळवला की तुमच्या आरोग्याच्या ताबा तुमच्या हातात येतो हे लक्षात घ्या. 

आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको!

४. छंद/कला जोपासा: 

तुमच्याकडे जी कोणती कला असेल, त्यासाठी दिवसभरातला थोडासा वेळ बाजूला काढून ठेवा. दिवसभरातला काही वेळ मोबाईल, टीव्ही, या सर्वांपासून स्वतःला दूर ठेवा आणि फक्त स्वतःशी संवाद साधा. सोशल मिडीयावर आपण किती वेळ वाया द्यायचा याची मर्यादा आखून द्या. वाचन, नृत्य,वादन,गायनाचा सराव, चित्रकला, सायकलिंग, ट्रेकिंग यामधील तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी आठवड्यातून थोडातरी वेळ काढा. आपल्या आवडीच्या विषयावरील पुस्तके वाचा. या साऱ्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. 

५. रोजनिशी:- 

आज इतरांशी आणि स्वतःशीही संवाद हरवत चालला आहे. मात्र स्वतःला वेळ द्यायलाच हवा. रोजनिशी ची सवय तुम्हाला स्वतःशी संवाद घडून देईल.यामुळे काय केले की राहिले दिवसभराचा आढावा घेता येतो. लिखाणाचा कंटाळा असेल, तर झोपण्यापूर्वी फक्त काही डोळे मिटून शांत विचार करा. आपली ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे त्याचे स्मरण करा आणि दिवसाची सांगता समाधानी मानाने करा.   

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

. चिंतन/ध्यान- 

आपल्याला मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टीविषयी विचार करत सकाळी काही क्षण डोळे मिटून बसा. एकाग्र चित्त दिवसभरासाठी उर्जा देते. आपल्याला दिवसभरात काय करायचे आहे, काय टाळायचे आहे याचे चित्र डोळ्यासमोर उभे करा आणि दिवसाची एक आनंददायी सुरवात करा. मिळालेले आयुष्य सुंदर आहे आणि ते दिल्या बद्दल तुम्ही कृतज्ञ आहात अशी रोज प्रार्थना करा. 

७. ध्येय आणि प्राधान्य ठरवा- 

आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, हे रोज स्वतःला सांगा. हवे ते मिळवण्यासाठी मला काय केले पाहिजे, काय नको याची प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेवा. काम करताना रिकाम्या वेळात स्वतःला आपल्या प्राधान्य विषयी सांगा.

. इतरांना मदत करा- 

आपल्या मदतीची कोणाला गरज असेल आणि आपल्याला मदत करणे शक्य असेल तर न कचरता समोर जाऊन मदत करा. आपण समाजाचे काही देणं लागतो त्याची परतफेड केल्याची भावना आपल्यामध्ये येईल. आयुष्यात नवीन येणाऱ्या लोकांशी आणि नेहमीच्या लोकांशी सुद्धा वाद न घालता सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चांगले श्रोता असाल तर लोकांशी संवाद आनंदी होतो. शक्यतो वितंडवादाला आमंत्रण देणारे विषय टाळा. वादाचा विषय देखील संयमाने आणि शांततेल मांडू शकता. 

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

९. अभ्यासू  बना-

नवीन गोष्ट जाणून घेण्याची तयारी ठेवा. त्यासाठी का, कसे, कुठे,कधी असे प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी आपल्यापेक्षा लहान किंवा मोठ्या व्यक्तींकडून काही शिकायला मिळत असेल, तर संधीचा लाभ घ्या. लाज न बाळगता नवीन गोष्ट शिकण्याचा आनंद मिळावा.

१०. आव्हाने स्वीकारा- 

‘मी हे करू शकतो/शकते.’ असा विश्वास स्वतःला द्या आणि नवीन आव्हान स्वीकारा. कामाच्या किंवा इतर ठिकाणी जोखीम घेण्याची आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

११. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या- 

आपल्याला आवडणाऱ्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत आठवड्यातला काही वेळ घालावा. त्यातून मिळणारी उर्जा तुम्हला आठवडाभर उपयोगी पडेल.

जो मनाला जिंकतो तो सर्व काही जिंकू शकतो असे म्हणतात. म्हणूनच आपल्या सवयी आपल्या मानवर ताबा मिळवून द्यायला मदत करतील आणि आपले आयुष्य बदलतील.

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –