Reading Time: < 1 minute
१० एप्रिल २००३…
मी कन्येच्या शाळेत कसलासा निकाल आणायला म्हणून गेलेलो. नेमके त्याच वेळी ईकडे इन्फोसिसचे तिमाही निकाल जाहिर झाले. जे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते आणि कसलं काय, बाजाराचाच ‘निकाल’ लागला..
-
इन्फोसिस एका दिवसांत जवळ जवळ २७% कोसळला.
-
निफ्टीनेही १,००० च्या खाली डुबकी मारली आणि तो ९६२.२० म्हणजे ३.५% ने गडगडला. नंतरच्या काही सत्रांत तो ९३६.०० पर्यंत घरंगळला.
-
मात्र मे महिन्याच्या मध्यात सुरु झालेली तेजीची लहर… पुढच्या केवळ दोन/अडीच महिन्यांतच निफ्टीला १३०० पार घेऊन गेली (काढा टक्केवारी).
-
आज हा प्रसंग आठवला कारण टीसीएस (TCS)…
-
तुम्हाला सांगतो, ‘‘History does not repeat itself…” केवळ या वचनावरच नव्हे, तर ‘‘…but it rhymes” या त्याच्या उत्तरार्धावरही माझा विश्वास आहे.
महत्वाची सुचना- ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे. कोणत्याही खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही.
– प्रसाद भागवत
9850503503
Share this article on :