१० एप्रिल २००३…
मी कन्येच्या शाळेत कसलासा निकाल आणायला म्हणून गेलेलो. नेमके त्याच वेळी ईकडे इन्फोसिसचे तिमाही निकाल जाहिर झाले. जे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते आणि कसलं काय, बाजाराचाच ‘निकाल’ लागला..
-
इन्फोसिस एका दिवसांत जवळ जवळ २७% कोसळला.
-
निफ्टीनेही १,००० च्या खाली डुबकी मारली आणि तो ९६२.२० म्हणजे ३.५% ने गडगडला. नंतरच्या काही सत्रांत तो ९३६.०० पर्यंत घरंगळला.
-
मात्र मे महिन्याच्या मध्यात सुरु झालेली तेजीची लहर… पुढच्या केवळ दोन/अडीच महिन्यांतच निफ्टीला १३०० पार घेऊन गेली (काढा टक्केवारी).
-
आज हा प्रसंग आठवला कारण टीसीएस (TCS)…
-
तुम्हाला सांगतो, ‘‘History does not repeat itself…” केवळ या वचनावरच नव्हे, तर ‘‘…but it rhymes” या त्याच्या उत्तरार्धावरही माझा विश्वास आहे.