Reading Time: < 1 minute
  • भारतातील टॉप १०० श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट (GROHE Hurun India Real Estate Rich List 2019) या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रु. ३२,००० कोटींची संपत्ती असलेले श्री. मंगल प्रभात लोढा हे भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक आहेत. 

  • मंगल प्रभात लोढ़ा भाजपचे मुंबई यूनिट अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती यादीतील उर्वरित ९९ व्यक्तींच्या एकूण संपत्तीच्या १२% इतकी आहे. 

  • सन २०१९ मध्ये लोढा कुटुंबाच्या संपत्तीत १८% ने वाढ झाली आहे. 

  • त्यानंतर डीएलएफचे राजीव सिंह आणि दूतावास समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवानी अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

  • लोढ़ा कुटुंबाची संपत्ती रु. ३१,९३० कोटी असून गेल्या वर्षीही याच यादीत लोढा प्रथम क्रमांकावर होते. 

  • रिअल इस्टेट क्षेत्रामधील देशातील १०० नामांकित व्यवसायिकांनी एकूण संपत्ती रु. २.७७ लाख कोटी इतकी आहे. 

  • या यादीमधील ७५% रिअल इस्टेट डेव्हलपर मुंबई, दिल्ली आणि बँगलोर या तीन प्रमुख शहरांमधील आहेत. ५९% व्यावसायिकांचा हा पिढीजात व्यवसाय आहेत. 

  • या वर्षी ६ रिअल इस्टेट कंपन्यांची विक्री रु. २००० कोटीपेक्षा जास्त आहे. तर, २० कंपन्यांची विक्री १००० कोटींपेक्षा जास्त आहे.  

टॉप १० रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट 

अनु क्र

नाव

कंपनीचं नाव

शहर

एकूण मालमत्ता

(कोटी रु)

मंगल प्रभात लोढा

मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा)

मुंबई

३१९६०

राजीव सिंह

डीएलएफ

दिल्ली

२५०८०

जितेंद्र विरवानी

एम्बेसी

बँगलोर

२४७५०

निरंजन हिरानंदानी

हिरानंदानी कम्युनिटीज

मुंबई

१७०३०

चंदू रहेजा अँड फॅमिली

के रहेजा

मुंबई

१५४८०

विकास ओबेरॉय

ओबेरॉय रिअलिटी

मुंबई

१३९१०

राजा बागमाने

बागमाने डेव्हलपर्स

बँगलोर

९९६०

सुरेंद्र हिरानंदानी

हाऊस ऑफ हिरानंदानी

मुबई

९७२०

सुभाष रुनावाल अँड फॅमिली

रुनावाल डेव्हलपर्स

मुबई

७१००

१०

अजय पिरामल अँड फॅमिली

पिरामल रिअलिटी

मुबई

६५६०

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.