स्टेशनरी दुकानात डिंक विकत घ्यायला ग्राहक आल्यावर “एक फेविकॉलची ट्यूब द्या” अशी मागणी करतो. डिंक म्हणजे फेविकॉल हे समीकरण भारतीयांच्या डोक्यात अनेक वर्षांपासून पक्के बसले आहे. टीव्ही वरच्या जाहिरातींच्या माऱ्यात आपल्या आवडत्या मालिका बघताना फेविकॉलच्या जाहिराती मात्र लक्ष आकर्षित करतात. ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही!’ ही टॅगलाईन फेविकॉल सारखीच ग्राकांच्या डोक्यात चिकटली आहे.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग १)
फेविकॉल बरोबरच फेविस्टीक, फेविक्विक, डॉकटर फ़िक्सिट, एम् – सील अशा अनेक ब्रँडची मालकी ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’कडे आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या पिडीलाईटने २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली असून विविध देशांमध्ये यशस्वी विस्तार करून “भारतीय मल्टीनॅशनल कंपनी” अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
- १९९३ साली पिडीलाईटचे शेअर बाजारांत लिस्टिंग झाले. तेव्हापासून तब्बल ३१% CAGR कायम ठेवला आहे. १९९३ साली पिडीलाईटने शेअर बाजारात आपले शेअर्स लिस्ट करून भांडवल उभे केले. त्यावेळेस कंपनीची मार्केट कॅप फक्त ६० कोटी रुपये होती.आज पिडीलाईटची मार्केट कॅप ६९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणून पिडीलाईट ‘मल्टी बॅगर‘ स्टॉक म्हणून ओळखला जातो. मल्टी बॅगर म्हणजे अनेक पट ज्याची किंमत वाढली आहे असा शेअर.
- पिडीलाईटच्या प्रतिशेअर किमती मधील वाढ पुढीलप्रमाणे आहे :
-
- डिसेंबर २००० – रु. १२
- डिसेंबर २००५ – रु. १८
- डिसेंबर २०१० – रु. १००
- डिसेंबर २०१५ – रु. ५००
- डिसेंबर २०१९ – रु. १३००
- ४ डिसेंबर २००० रोजी पिडीलाईट इंडस्ट्रीजचा १ शेअर फक्त १२ रुपयांना उपलब्ध होता. तेव्हा १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असता तुम्ही ८३३ शेअर्सचे मालक असता. या ८३३ शेअरची ४ डिसेंबर २०१९ चा बाजार बंद होताना किंमत १३२० रु. प्रति शेअर प्रमाणे एकूण रु. १०,९०,००० इतकी होती. यामध्ये कंपनीने अनेकदा दिलेले बोनस शेअर्स, शेअर स्प्लिट, डिव्हीडंड आपण मोजलेला नाही. म्हणजे कंपनीच्या एका शेअरची किंमत १०९ पट वाढली. जवळपास १०,९००% रिटर्न्स पिडीलाईटच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना दिले आहेत.
- आर्थिक वर्ष २००८-०९ ते आर्थिक वर्ष २०१८-१९ या १० वर्षांत पीडिलाइटने तब्बल ४०% दराने (CAGR) परतावा दिला आहे.
- आज कंपनीचे ७०% पेक्षा जास्त शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत, तर ११ % शेअर्स फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्वेस्टर्सकडे आहेत.
- इथून पुढे इतके जास्त रिटर्न्स गुंतवणूकदारांना मिळतीलच असे नाही. कारण सध्या पिडीलाईटचा शेअर प्रचंड महाग शेअर्सपैकी एक आहे. पिडीलाईट शेअरचा पि ई रेशो ६९ पट आहे. चांगला शेअर विकत घेऊन दीर्घकालपर्यंत न विकता तसाच ठेवा. कंपनी काम करत राहून नफा पुन्हा धंद्यात गुंतवेल व भाव आपोआप वाढत जातील, हा वॉरेन बफेट यांचा सिद्धांत पिडीलाईटने अक्षरश: खरा केला आहे.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)
महत्वाची आकडेवारी:-
- पीडिलाइट भारतातील नंबर १ ची अढेसीव्ह बनवणारी कंपनी आहे. (Adesive म्हणजे चिकटवणारे पदार्थ)
- फोर्ब्ज मॅगझिनच्या भारतातील “सुपर ५०” कंपन्यांमध्ये “पीडिलाइट”चा समावेश आहे.
- कंपनीत ५३०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
- कंपनीचे ९ देशांमध्ये उत्पादन केंद्र आहेत.
- कंपनीचे भारतात २३ पेक्षा जास्त उत्पादन कारखाने आहेत.
- पीडिलाइट ५०० पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने तयार करते.
- पीडिलाइटच्या १८ आंतरराष्ट्रीय व ९ भारतीय उपकंपन्या आहेत.
- पीडिलाइटचे ३ संशोधन व विकास केंद्रे आहेत
कंपनीची उत्पादने:-
पीडिलाइट उत्पादनांचे २ प्रमुख सेगमेंट्स आहेत.
- कंझुमर व बाजार सेगमेंट :
- इंडस्ट्रिअल बिझनेस बाजार सेगमेंट :
निर्यात:-
- आज पिडीलाईटचे ७ देशांमध्ये उत्पादन कारखाने असून ८० देशांमध्ये मालाची निर्यात केली जाते. फेविकॉल ब्रँडचा भारतात ७०% मार्केट शेअर आहे. कंपनीची आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६३०० इतकी विक्री होती.
- पिडीलाईटचे आंतरराष्ट्रीय उत्पादन केंद्र अमेरिका, थायलंड, दुबई, ब्राझील, इजिप्त, सिंगापुर आणि बांग्लादेशामध्ये आहे. कंपनीने बांग्लादेशात सप्टेंबर २०१९ मधून नवीन उत्पादन केंद्र सुरु केले आहे.
- आगामी काळात कंपनीला बांग्लादेश, श्रीलंका आणि इजिप्त मधून व्यवसायवाढीच्या चांगल्या अपेक्षा आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पिडीलाईटची निर्यात ६०७ कोटी रुपये इतकी होती.
पुढील भागात आपण पीडिलाइट कंपनीचा इतिहास, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क, जाहिरात धोरण व कंपनीच्या आर्थिक निकालाविषयी माहिती घेऊ.
भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – ‘पिडीलाईट’ची यशोगाथा (भाग २)
– सी.ए. अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात).
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची उपलब्ध माहितीप्रमाणे कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/