नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

Reading Time: < 1 minute

नोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. 

  • सध्याच्या नियमानुसार पूर्ण आणि अंतिम देय प्रक्रियेसाठी “वेतन देय कायदा, १९३६ मध्ये (Payment of wages Act, 1936) नमूद करण्यात आलेल्या नियमांमध्ये संदिग्धता असल्यामुळे, यासाठी प्रत्येक कंपनीचे स्वतंत्र नियम आहेत. 

  • नवीन नियमानुसार वेतन म्हणजे पगार. यामध्ये बेसिक पगार, महागाई भत्ता, राखीव भत्ता, व इतर भत्ते समाविष्ट करण्यात आले आहेत. यामधून नुकसानभरपाई, उदा. कन्व्हेयन्स भत्ता, एलटीए, इत्यादी वगळण्यात आले आहेत.  

  • अशा प्रकारच्या मोबदल्याचे मूल्य, उदाहरणार्थ कर्मचार्‍यांना देय असणारा कर्मचारी स्टॉक ऑप्शन प्लॅन (ईएसओपी), एकूण वेतनाच्या १५% पर्यंत समाविष्ट केला जाईल. 

  • वेतन अधिनियम २०१९, नुसार, “जेव्हा कर्मचारी (i) सेवेतून काढून टाकला जातो; किंवा (ii) सेवानिवृत्ती किंवा सेवेतून राजीनामा देतो किंवा कंपनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेला असेल, त्याला त्याची पूर्ण व अंतिम देय रक्कम, नोकरीतून काढून टाकल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवसानंतर दोन दिवसात देण्यात येईल.” 

  • उदा. नोकरीतील शेवटचा कामकाजाचा दिवस २८ नोव्हेंबर २०१९ आहे. तर, नियोक्त्याला सदर कर्मचाऱ्यांचे पूर्ण व अंतिम देय ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत द्यावे लागेल.

  • तथापि, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की नवीन नियन संसदेमध्ये मंजूर केलं गेलं असलं, तरी कोणत्या तारखेपासून लागू होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तरी, अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले विविध प्रक्रियात्मक नियम, फॉर्म अद्याप अधिसूचित केले गेलेले नाहीत. 

  • यासंदर्भातील नियमांचा प्राथमिक ड्राफ्ट “कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वेबसाइटवर १ नोव्हेंबर २०१९ रोजी विविध भागधारक आणि सार्वजनिक माहितीसाठी अपलोड करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *