Reading Time: 3 minutes

एक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. 

हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. 

आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर! 

चालू वर्षाचा अखेरचा आठवडा संपण्यापूर्वी आपली आर्थिक स्थिती समजून घेऊन नव्या वर्षाचे आर्थिक नियोजन तयार करा.

आर्थिक उद्दिष्टांविषयी – 

आपल्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेताना स्वतःलाच काही महत्वाचे प्रश्न विचारा- 

  • तुम्ही तुमची आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला आहात का?  
  • तुमची काही उद्दिष्टे दीर्घकालीन असतील, तर ती संपूर्णपणे साध्य करण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु, त्यासाठीच्या स्टेप्स व अल्प-मुदतीची निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्ट्ये यशस्वी झाली आहेत का? 
  • क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरली आहे का? 
  • नवीन कर्जे घेतली आहेत का? 
  • आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला आहे का? 
  • टाळता येण्यासारखे काही अनावश्यक खर्च केलं आहेत का? 

आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपले आर्थिक नियोजन यशस्वी झाले आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधू शकाल. जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर तुंचर अभिनंदन!  तुम्ही तुमचे पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन दुप्पट उत्साहाने करू शकता. 

जर उत्तर नाही असेल, तर निराश होऊ नका. अयशस्वी कारणे शोधून त्यावर उपाय शोधा. जेणेकरून पुढील आर्थिक नियोजन करताना या सर्व चुका विचारात घेऊन तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन तयार शकाल.

जर तुमचे आधीच्या वर्षीचे आर्थिक नियोजन अयशस्वी झाले असेल तर, नवीन आर्थिक नियोजन करताना त्याचे चार भाग करा- 

  1. मासिक 
  2. त्रैमासिक 
  3. सहा महिने
  4. वार्षिक 

यामुळे नियोजन करतना तुमचा गोंधळ होणार नाही. तसेच प्रत्येक भागाचं आर्थिक नियोजन यशस्वी होतंय का, हे त्या भागाच्या शेवटी तपासून ते यशस्वी होत नसेल तर, त्याची कारणे वेळीच शोधता येतील व त्यावर उपायही करता येतील.

पुढील आर्थिक नियोजन करताना खालील मुद्दे विचारात घ्या- 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

१. कर्ज आणि कर्जफेड याचे नियोजन- 

  • यामध्ये जी कर्ज आपल्या आर्थिक आरोग्यास हानिकारक असतील त्यांचे समूळ उच्चाटन करा, म्हणजेच शक्य तितक्या लवकर त्याची परतफेड करा.
  • आपल्या कुटुंबातील सदस्स्याकडून किंवा जवळच्या मित्रांकडून कर्ज घेतले असेल, तर ते सर्वात आधी परत करा. 

काटकसर म्हणजे नक्की काय?

२. काटकसर म्हणजे कंजूसपणा नाही

  • तुमच्या कमाईवर तुमचा पूर्ण अधिकार आहे. आर्थिक नियोजन करताना पै पै चा हिशोब फक्त बचत आणि गुंतवणुकीसाठी करू नका.
  • आयुष्यात अनेक छोटी छोटी स्वप्ने असतात, त्यांचाही विचार करा. आपल्या कमाईचा काही भाग या स्वप्नासाठी ‘राखीव’ ठेवा.
  • यामुळे तुमचे आर्थिक नियोजन तुम्हाला निरस वाटणार नाही आणि तुम्ही ते नाईलाज म्हणून नाही तर, मनापासून स्वीकाराल. 

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

३. बचत व गुंतवणुकीसाठी पर्यायी उत्पन्न

  • आपल्या मोठ्या मोठ्या स्वप्नांची पूर्तता, कर्जफेड, गुंतवणूक इत्यादी गोष्टींसाठी आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांचा बळी देण्यापेक्षा पर्यायी उत्पन्न शोधा.
  • बचत वाढविण्यासाठी खर्च कमी करताना उत्पन्न वाढविण्याचाही विचार करा.

४. गुंतवणूक नियोजन 

  • दरवर्षी नवीन गुंतवणूक करणे अथवा अगोदरपासून असलेल्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे या गोष्टी दीर्घकालीन फायदा मिळवून देतात. त्यामुळे नियोजन करताना गुंतवणुकीलाही तेवढंच महत्व देणे आवश्यक आहे. 
  • आपल्या गुंतवणुका तपासून कमी परतावा देणाऱ्या योजना बंद करा व उत्तम परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणुकांना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान द्या. 

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

५. खर्चाच्या सवयी बदला- 

  • अनेकदा आपल्या खर्चाच्या सवयी बदलूनही आपण बचत वाढवू शकतो. उदा. महागड्या हॉटेलमध्ये जेवण, महागडी जिम, ब्रँडेड कपडे, शूज, असेसरीज हे सारं खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारल्यास त्याचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ हेच असेल. त्यामुळे शक्य असेल तिथे हे खर्च वाचवा. 
  • ऑनलाईन खरेदी करताना अनेकदा ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळून जातात. त्यामुळे मॉलपेक्षा ऑनलाईन खरेदीचा पर्याय विचार घेता येईल. अर्थात ऑनलाईन व बाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या किमतीची तुलना करून मगच निर्णय घ्या. 
  • सर्व बिलं वेळच्या वेळी भरल्यास लेट पेमेंट चार्जेस वाचू शकतात. त्यामुळे नियमितपणाचे महत्व ओळखून स्वतःला शिस्त लावा. 
  • कर्ज, विमा, क्रेडिट कार्ड, इ. चे हप्ते, विमा नूतनीकरण यासारख्या महत्वाच्या गोष्टींच्या अंतिम तारखा लक्षात ठेवून त्यानुसार पेमेंट करा.

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

६.  डिजिटल पेमेंट आणि वाढणारे खर्च:

  • आजकाल डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांमुळे खिशात पैसे नसतानाही सहज खरेदी केली जाते. त्यामुळे खर्चांवर आळा घालणे कठीण होऊन बसलं आहे.  
  • डिजिटल व्यवहारांचा लेखा जोगा ठेवणे, त्यांच्यासाठी स्वतःचे निश्चित नियम, खर्चाची मर्यादा तयार करणे आवश्यक आहे.
  • क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवून घेऊ नका. त्यामुळे पुन्हा खर्च वाढू शकतो. 
  • इंटरेस्ट फ्री इएमआय, दुप्पट/तिप्पट कॅशबॅक यासारख्या  ऑफर्सना भाळून उगाचच अनावश्यक किंवा महागडया वस्तूंची खरेदी करू नका. 

आर्थिक नियोजन तयार केलं की आपलं काम संपलं असं करू नका. आपल्या आर्थिक नियोजनाचा प्रत्येक महिन्याला आढावा घ्या. 

टीम अर्थसाक्षरतर्फे यशस्वी आर्थिक नियोजनासाठी शुभेच्छा! 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.