Reading Time: 2 minutes

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची आणि पैसे काढण्याची प्रक्रिया. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

  • म्युच्युअल फंडांत प्रत्यक्ष गुंतवणूक अर्ज भरून किंवा ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येते. 

  • सर्व प्रथम गुंतवणूकदाराची केवायसी (KYC) असणे जरुरीचे आहे. केवायसी प्रत्यक्ष फॉर्म भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून करता येते.  

  • म्युच्युअल फंडांमध्ये यूएस (US) किंवा कॅनडा स्थित एनआरआय (NRI) गुंतवणूकदारांना काही निर्बंध आहेत. त्याची पूर्तता केल्यास ते म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करू शकतात. बाकी सर्व एनआरआय किंवा भारतीय नागरिक सहज म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करू शकतात. 

  • म्युच्युअल फंडाने निर्धरित केलेल्या किमान रक्कमेपेक्षा मोठी रक्कम गुंतवणूक करण्याकरता अर्ज भरून त्याच्या सोबत बँकेचा चेक दिल्यास गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण होते. 

  • चेक ऐवजी गुंतवणूकदार आरटीजीएस किंवा एनईएफटी वापरून सुध्दा गुंतवणूक करू शकतो. 

  • एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याकरता म्युच्युअल फंडचा गुंतवणूक अर्ज, एसआयपीचा रजिस्ट्रेशन अर्ज, तसेच बँकेला ऑटो डेबिट (Auto Debit) सूचना देण्यासाठी ‘एनएसीएच’चा (NACH) अर्ज  भरावा लागतो. 

  • ऑनलाईन गुंतवणूक करण्याकरता म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर किंवा म्युच्युअल फंडाच्या वितरकांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येते. 

  • ठराविक रकमेची गुंतवणूक करण्याकरिता डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करता येतो. एसआयपी करताना बँकेला द्यायची सूचना ज्याला युआरएन (URN) नंबर म्हणतात, तो आपल्याला नेटबँकिंगमध्ये बिलर पर्यायामध्ये (‘Bill Pay’ option) भरावा लागतो. 

  • म्युच्युअल फंडातून पैसे काढताना आपल्याला आवश्यक असलेली रक्कम आपण विमोचन अर्जामध्ये (Redemption Request form ) काढता येते. त्यासाठी पूर्ण गुंतवणूक तोडण्याची गरज नसते. 

  • म्युच्युअल फंडमध्ये आपल्या खात्याला फोलिओ (Folio) म्हणतात. जेव्हा आपल्याकडे गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते तेव्हा आपण त्या फोलिओमध्ये गुंतवू शकतो आणि जेव्हा आपल्याला फंड्सची गरज असते तेव्हा आपली गरजेनुसार आवश्यक ती रक्कम आपण काढू शकतो. म्हणजेच म्युच्युअल फंडाचे कामकाज हे अगदी बँकेच्या खात्यासारखेच सहज सुलभ असते. 

आहे ना गुंतवणूक प्रक्रिया एकदम सोपी? 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

– निलेश तावडे 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला  भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…