सार्वभौम सुवर्ण बाँड १७ जानेवारीपर्यंत विक्रीस उपलब्ध
सार्वभौम सोन्याचे रोखेची (२०१९ -२०२० मालिका आठ) विक्री सध्या सुरु आहे. ही विक्री १७ जानेवारी रोजी बंद होईल. सरकार सोन्याला प्रति ग्रॅम, रु. ४,०१६/- वर सोन्याचे बंधपत्र जारी करीत आहे. ऑनलाइन अर्ज करणारे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम रु ५०/- ची सूट मिळते. तर अशा गुंतवणूकदारांना सोन्याच्या बाँडची किंमत रु. ३,९६६/- प्रति ग्रॅम असेल. कराच्या बाबतीत, परिपक्वतावर भांडवली नफा करमुक्त असतो. सोन्याच्या बाँडवर हा एक विशेष फायदा आहे.
सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’
- सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत सुवर्ण बाँड्स एका ग्रॅम आणि त्या पटीत असतात.
- रोख्यांमध्ये किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे, तर कमाल मर्यादा ४ किलो आहे.
- रिझर्व बॅंकेकडून शासनाच्या वतीने सार्वभौम सोन्याचे बंधपत्र वेळोवेळी जारी केले जातात आणि प्रत्येक बाँड ०.९९९ शुद्ध सोन्याचे असते. बॉन्ड जारी केले जातात आणि सोन्याच्या प्रचलित किंमतीला रिडीम केले जातात.
- बाँड्सवर गुंतवणूकदारांना वार्षिक २.५% व्याज देखील मिळते.
सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे ४ करलाभ-
- सोन्याच्या बाँडचा कालावधी आठ वर्षांचा असतो. परिपक्व होईपर्यंत भांडवली नफा झाल्यास तो करमुक्त असतो.
- जर एखाद्या गुंतवणूकदारास आठ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विक्री करायची असेल, तर ते एक्सचेंजमध्ये विक्री करु शकतात.
- इश्यू केल्याच्या तारखेपासून पाचव्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात एनकॅशमेंट करण्यासही सरकार परवानगी देते. या दोन्ही प्रकरणांमध्ये भांडवली नफा कर लागू आहे.
- एसजीबी आणि गोल्ड ईटीएफ किंवा फंडमधील परतावा सोन्याच्या किंमतीतील वाढ किंवा घसारा यावर अवलंबून असेल.
- सोन्याच्या बाँड वरील परिपक्वता वरील हा आयकर लाभ गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड किंवा भौतिक सोन्यासारख्या अन्य उपकरणांमध्ये उपलब्ध नाही.
- सार्वभौम सोन्याच्या बाँडवर जीएसटी आकारला जात नाही. अन्यथा सोन्याच्या खरेदीवर ३% दराने जीएसटी आकारला जातो.
- सोन्याचे रोखे वार्षिक 2.५% व्याज देतात आणि व्याज उत्पन्न ग्राहकांच्या उत्पन्नात जमा होते आणि त्यानुसार कर आकारला जातो. परंतु व्याज उत्पन्नावर टीडीएस आकारला जात नाही किंवा स्त्रोतावरील कर कमी केला जात नाही.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की जर गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर सार्वभौम सोन्याचे बाँड्स गुणवत्ता, खर्च प्रभावीपणा, गुंतवणूक रोखण्यात सहज व सुरक्षित आहेत.
सोनं खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा
उदाहरणार्थ :-
जर मी रु १००००० /- गोल्ड बॉण्ड मध्ये गुंतवायचे ठरवले, तर मला रु १,००,०००/- किमतीचे गोल्ड बॉण्ड्स मिळतील व ८ वर्षांनी विक्रीच्या वेळेस जर सोन्याचा दर आजच्या दराच्या दुपट झाला म्हणजे आजचा ४,००० प्रति ग्राम दर रु. ८,०००/- प्रतिग्रॅम झाला तर विक्रीच्या वेळेस मला रु २,००,०००/- मिळतील. जे करमुक्त असतील. त्याच बरोबर वार्षिक २.५ % ने रु २०,००० /- व्याजही मिळेल. म्हणजे माझे एकूण उत्पन्न रु २,२०,००० /- असेल .
या उलट जर मी आहे रु १,००,०००/- सोन्यात गुंतवले, तर मला ३% GST अधिक घडणावळ (साधारणपणे ५% पासून १०% पर्यंत असू शकते) असे कमीतकमी ८% नुकसान होईल व मला फक्त रु ९२,०००/- चेच सोने मिळेल. ८ वर्षांनी मी जेव्हा हे सोने बाजारात विकायला जाईल तेव्हा त्याचे मला रु १,८४,०००/- मिळतील व त्यावर भांडवल वृद्धी कर भरावा लागेल. म्हणजे मला सरळ सरळ २,२०,००० – १,८४,००० = ३६,०००/- नुकसान सोसावे लागेल .
तात्पर्य: साधारणपणे १८% चा फायदा गोल्ड बॉण्डमध्ये होऊ शकतो .
जर सोन्याकडे आपण गुंतवणूक या दृष्टीने पाहत असू व जर आपल्याकडे तेवढी रक्क्म असेल, तर हा नक्कीच सर्वोत्तम पर्याय आहे. गोल्ड बॉण्डला चोरीचा धोकाही नाही. लॉकर ठेवण्याची गरज नाही .
– महेश मुळे.
९९२२४००९८०.
(लेखक तंत्र , उत्पादन , जाहिरात , वाणिज्य , विपणन , व्यवस्थापन क्षेत्रात ३४ वर्षांपासून कार्यरत असून व्यवस्थापन शास्त्रात निष्णात व निपुण अध्यापक आहेत.)
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून, आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/