Reading Time: 3 minutes

आज जग मुक्त अर्थ व्यापार धोरणाने व्यवहार करते. भारत जगाचा एक अविभाज्य घटक असल्याने आपणही त्याच मुक्त अर्थ व्यवस्थेचा अवलंब करतो. आज आपली अर्थव्यवस्था त्यामुळे बहरली आहे, विस्तारली आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणतीही व्यक्ती आर्थिक व्यवहार करू शकते. कवचितप्रसंगी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. 

आपला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली लोकसंख्या. आपल्या लोकसंख्येमध्ये साधारणतः १३२ कोटी खरेदीदार आहेत. प्रत्येकाला नानाविध गोष्टींचे आकर्षण असते. तसेच प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. प्रत्येकाने केवळ १०० रुपये एका महिन्यात एखाद्या गोष्टीवर खर्च केले तरी ही रक्कम एका वर्षात १,५८,४०० कोटी रुपये होते. 

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

  • भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न १२६४०८ रुपये आहे. म्हणजे आपले सकल वार्षिक उत्पन्न १६६ लाख कोटी होते. यावरून भारताच्या अवाढव्य अर्थव्यस्थेची आणि प्रचंड खरेदीमुल्याची कल्पना येऊ शकते. परंतु, भारताच्या अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा घटक म्हणजे ग्राहक, हाच मुळी अज्ञान आहे, निद्रिस्त आहे.
  • सर्वसाधारणपणे उत्पादित मालाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादक कंपनी, डिस्ट्रिब्युटर, होलसेलर, एजन्सी, रिटेलर अशा ५ किंवा कधी कधी त्यापेक्षाही जास्त साखळीतून माल येत असतो. 
  • या साखळीमधील प्रत्येक घटक आपापला व्यावसायिक परतावा/ फायदा आकारीत असतो.
  • कमीतकमी १०% परतावा असेल, तर मग मूळ उत्पादनाची एमआरपी (MRP) म्हणजेच जास्तीत जास्त – कमाल विक्री किंमत) दुपटीच्या जवळ येते.

उदा. जर १०० रुपये उत्पादन किंमत असेल, तर 

१०० + ३०% = १३० – उत्पादन कंपनी 

१३० + १०% = १४३ – डिस्ट्रिब्युटर

१४३ + १०% =१५७ – एजन्सी

१५७ + १०% = १७३ – होलसेलर

१७३ + १०% = १९१ – रिटेलर

१९१ + १०% = २१० –  ग्राहक

अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

  • अशा पद्धतीने १०० रुपयांना उत्पादित झालेला माल ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत २१० रुपयांचा झालेला असतो. हेही जर फक्त १०% फायदा गृहीत धरला तर! 
  • खरंतर, FMCG ( कायम खपणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू) मध्ये फायद्याचे प्रमाण १०% असू शकते. पण इतर म्हणजे  इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, खाद्यपदार्थ इत्यादी मध्ये फायद्याचे प्रमाण १५% ते ३०% असू शकते.  
  • याचाच अर्थ १५ % फायद्याने १०० रुपयाची वस्तू ग्राहकाला २६० रुपयांना तर ३०% फायद्याने ४८० रुपयांना पडते. 
  • आज सगळ्याच बल्क ड्रग (घाऊक औषधे) च्या आणि किरकोळ औषधांच्या किमतीत १० पटीहून जास्तीचा फरक आढळतो.
  • ग्राहक भांडार, शॉपिंग मॉल्स, होलसेल स्टोर्स यांनी त्यांचा व्यवसाय सुरु करताना हाच फायदा सांगितला होता पण कालांतराने अंतिम विक्री किमतीतील फरक कमी कमी होत जवळजवळ नाहीसा होतो आहे, असे दिसते .

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

फायदा जेवढा अधिक तेवढी विक्री साखळी तोडणे महाकर्मकठीण ..

  • सर्व व्यवसायांच्या गणितात हे उपरनिर्दिष्ट सर्व घटक एकमेकांवर कायमच अवलंबून असतात . एका ग्राहकांच्या खरेदीमध्ये ह्या सर्व घटकांचा फायदा समाविष्ट असतो. म्हणूनच ग्राहकाला रिटेलर शिवाय कोणीही माल देत नाही. त्यासाठी असंख्य अडचणी आणल्या जातात, सांगितल्या जातात.  
  • औषध व्यवसायामध्ये तर हे प्रमाण पोलादी पकडी प्रमाणे काम करते. सध्या भारतात बहुतेक सर्वच गोष्टींमध्ये ऑनलाईन व्यापार चालतो. त्याचे प्रमाण वाढत आहे. काही वस्तू तर फक्त ऑनलाईन विक्री खरेदी होतात. 
  • शिक्षण , मोबाईल , कपडे , फूड असे कितीतरी वस्तू  व इतर उत्पादने आहेत. लिहायला बसलो तर, कितीही लिहिले तरीही एखादा राहीलच. पण औषध व्यवसायात मात्र हे प्रमाण नगण्य आहे. कारण आपण रुग्णावर प्रयोग करायला धजावत नाही. डॉक्टरही याला बढावा देत नाहीत हा भीतीचा बागुलबुवा अथवा पगडा एवढा आहे की आपण ५०,००० रुपयांची वस्तू ऑनलाईन मागवतो, पण २०० रुपयांचे औषध नाही मागवत. त्यात आपले कधी कधी ५०% वाचत असू शकतात तरीही. 
  • सध्या काही औषध विक्री करणाऱ्या ऑनलाईन वेबसाईट्स नावारूपाला येत आहेत. पण तरीही तिथून २०% पेक्षा जास्त डिस्काउंट क्वचितच मिळत असेल. त्यात औषधाची इमर्जन्सी हा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. कारण औषध म्हणजे मेकअप सामान किंवा कपडे नव्हेत जे आजचे उद्या येऊन चालतील. 

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

आता मात्र वेळ आली आहे की ग्राहकांनी वस्तूच्या कमाल विक्री किमतीवर म्हणजेच एमआरपी (MRP) बद्दल विचार करण्याची. १००% पासून जर ४००% पर्यंत विविध घटकांचा फायदा असेल, तर ही विक्री पद्धति अथवा कंपनी बदलण्याची!

– महेश मुळे 

९९२२४००९८०

(लेखक तंत्र, उत्पादन, जाहिरात, वाणिज्य, विपणन, व्यवस्थापन क्षेत्रात ३४ वर्षांपासून कार्यरत असून व्यवस्थापन शास्त्रात निष्णात व निपुण अध्यापक आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.