अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग २

Reading Time: 2 minutes

रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करत आहोत. 

१. चलनवाढ (Inflation): 

राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलनाच्या पुरवठ्यात प्रमाणाबाहेर झालेली वाढ.

२. चलनघट (deflation): 

राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलन पुरवठ्यात असलेली तूट.

३. अवमूल्यन (Devaluation): 

आपल्या चलनाचे परकीय राष्ट्राच्या चलनाच्या तुलनेत मूल्य कमी करणे. यामुळे परदेशातील वस्तू महाग होतात व आयात कमी होते आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त झाल्यामुळे निर्यात वाढते.

४. आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीचा ताळेबंद (Balance of payments): 

निर्यात केलेल्या विविध वस्तू व सेवा यांच्यासाठी राष्ट्राला मिळावयाची रक्कम व अशाच आयातीसाठी राष्ट्राने द्यावयाची रक्कम यांचा ताळेबंद. हा अनुकूल नसेल, तर संबंधित राष्ट्राला त्या प्रमाणात सोने निर्यात करावे लागते किंवा तेवढी तरतूद करण्यासाठी परकीय राष्ट्राकडून किंवा आंतरराष्ट्रीय चलननिधीसारख्या संस्थेकडून कर्ज घ्यावे  लागते.

५. खुला व्यापार (Free Trade): 

आयात व निर्यात यांवर कोणतेही कर किंवा इतर निर्बंध नसलेला आंतरराष्ट्रीय व्यापार.

६. अनुप्रयुक्त अर्थशास्त्र (Applied Economics):

अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा व्यावहारिक उपयोगांसाठी केलेला  अभ्यास.

७. खुल्या बाजारातील व्यवहार (Open Market Operations): 

बँकांच्या हातात असणारा रोख पैसा कमी करायचा असल्यास, आरबीआय द्वारे त्यांच्याजवळ असलेल्या सरकारी कर्जरोख्यांची  खुल्या बाजारात विक्री केली जाते. तर, रोख पैसा वाढवायचा असल्यास सरकारी कर्जरोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करते. या व्यवहारांना खुल्या

८. तुटीचे अर्थकारण (Deficit Financing): 

अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्याचा हा एक मार्ग आहे. यामध्ये चलनवाढ करून तूट भरून काढता येते. परंतु यामुळे भाववाढ होऊ शकते. मंदीच्या काळात किंवा अप्रगत राष्ट्रांच्या विकासाच्या कार्यक्रमात, या मार्गाचा धोरण म्हणून अवलंब करण्यात येतो.

९. सरकारी खर्च (Public expenditure): 

मध्यवर्ती व राज्य सरकारांनी अर्थसंकल्पानुसार जनहितासाठी व राष्ट्रहितासाठी केलेला खर्च.

१०. नाणेबाजार (Money Market): 

अल्प मुदतीची कर्जे देण्याघेण्याचे व्यवहार जेथे चालतात, असे व्यवसायक्षेत्र म्हणजे नाणेबाजार.

११. पतनियंत्रण (Credit control): 

बँकांकडून विविध कारणांसाठी केल्या जाणाऱ्‍या कर्जपुरवठ्यावर नियंत्रण.

१२. परागामी कर (Regressive Taxes): 

श्रीमंत लोकांना त्यांच्या मिळकतीच्या मानाने कमी प्रमाणात व गरिबांना त्यांच्या मिळकतीच्या मानाने अधिक प्रमाणात द्यावे लागतात, असे कर. अप्रत्यक्ष करांचा परिणाम सामान्यपणे या स्वरूपाचा असतो.

१३. बाजारभाव (Market Rate): 

अल्प मुदतीत तत्कालीन मागणीच्या व पुरवठ्याच्या परिस्थितीप्रमाणे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/  

Leave a Reply

Your email address will not be published.